Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |31 October 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
३१ ऑक्टोबर चालू घडामोडी
सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे उद्या अनावरण
- भारत आणि मुंबईकडून वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट खेळताना सचिन तेंडुलकरने एकापेक्षा एक संस्मरणीय खेळी साकारल्या आहेत. विक्रमांच्या राशी रचणाऱ्या या महान खेळाडूकडून कायम नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण बुधवार १ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.
- वानखेडे स्टेडियमच्या ‘एमसीए’ लाउंजमध्ये होणाऱ्या या सोहळय़ात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या हस्ते या पुतळय़ाचे अनावरण होईल.या सोहळय़ासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह, कोषाध्यक्ष आशीष शेलार आदी उपस्थित असतील.
- या सोहळय़ासाठी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वत: उपस्थित राहणार आहे. सचिन आणि वानखेडे यांचे नाते वादातीत आहे. या स्टेडियमवर त्यांनी धावांच्या राशी उभारल्या आहेत. भारताने २०११ मध्ये याच ठिकाणी विश्वचषक उंचावला. त्यामुळे सचिनच्या पुतळय़ासाठी यापेक्षा चांगली जागा कोणती असेल, अशी प्रतिक्रिया मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमोल काळे यांनी दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र थंड; मुंबई व कोकण विभागात तापमानात वाढ
- विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात घट होत असताना मुंबई तसेच कोकण विभागात कमाल तापमानात पुन्हा एकदा वाढ होत आहे. हे तापमान किमान पाच दिवस तरी असेच चढते राहील.
- कोकण विभागात अनेक ठिकाणी कमाल तापमानात ३५ अंशाच्या वर वाढ झाली आहे. तर मुंबईत देखील सांताक्रूझ, कुलाबा, डहाणू आणि रत्नागिरी येथेही तापमान ३५ अंशाच्या वर नोंदवण्यात आले आहे. कमालच नाही तर किमान तापमानातही वाढ होत आहे. गेला आठवडाभर राज्यात इतर ठिकाणी किमान तापमान उतरले असताना तसेच थंडीची जाणीव वाढलेली असताना मुंबई व कोकण विभागात मात्र दिलासा मिळताना दिसत नाही. गुजरातवर प्रत्यावर्तीय चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे.
- हे वारे समुद्रावरून हवा घेऊन मध्य भारताजवळ आदळतात. त्यातच कोरड्या वाऱ्यांची भर पडते. त्यामुळे २५ ऑक्टोबरनंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये गारवा निर्माण झाला आहे. परिणामी जळगावचे किमान तापमान १० ते ११ अंशांपर्यंत खाली उतरले आहे. कोकण आणि मुंबईत मात्र उच्च दाबाचे हवेचे क्षेत्र आहे. ही हवा उष्णता धारण केलेली आहे. त्यामुळे मुंबईचे कमाल तापमान सातत्याने चढत आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयांत डॉक्टरांची २० हजारांहून अधिक पदे रिक्त, राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली
- राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये विविध स्तरांवरील डॉक्टरांच्या मंजूर ५७ हजार ७१४ पदांपैकी २० हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याची कबुली राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात दिली. त्यात विशेष अभ्यासक्रमाच्या (सुपर स्पेशालिटी) एक हजार ७०७ मंजूर पदांपैकी ८९३ पदे रिक्त असल्याचेही सरकारने म्हटले आहे.
- ही रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याचा दावाही सरकारने प्रतिज्ञापत्रात केला आहे. राज्याच्या आरोग्य क्षेत्राच्या बळकटीकरणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यात, विभागाला अतिरिक्त अर्थसंकल्पीय वाटप आणि पूरक तरतूद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावाही सरकारने केला आहे. औषधे आणि उपकरणांच्या खरेदीकरिता २०२३-२४ या वर्षासाठी ८६७४.८५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याचेही सरकारने म्हटले आहे.
- या महिन्याच्या सुरुवातीला उघडकीस आलेल्या नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयातील मृत्युसत्राची उच्च न्यायलयाने स्वतःहून दखल घेतली होती. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची, आरोग्यासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची आणि या रुग्णालयांत किती तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत याची प्राथमिक माहिती सादर करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण या चार विभागांनी सरकारी वकील पी. पी. काकडे यांच्यामार्फत सोमवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले.
रद्दबातल सिंगूर नॅनो प्रकल्प : टाटा मोटर्सला पश्चिम बंगाल सरकारकडून ७६६ कोटींची भरपाई
- बंद पडलेल्या सिंगूर प्रकल्पातील भांडवली गुंतवणुकीची भरपाई म्हणून पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळाकडून ७६५.७८ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा निवाडा आपल्या बाजूने आल्याचे टाटा मोटर्सने सोमवारी स्पष्ट केले. तत्कालीन विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या आंदोलनाने प्रकल्पासाठी जबरदस्तीने शेतजमीन ताब्यात घेतल्याचा आरोप केल्यानंतर, टाटा मोटर्सने २००८ मध्ये महत्त्वाकांक्षी ‘नॅनो’ कार तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या सिंगूर प्रकल्पामधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.
- नियामकांकडे दाखल निवेदनांत, टाटा मोटर्सने स्पष्ट केले आहे की, ‘तीन सदस्यीय लवादाच्या न्यायाधिकरणासमोरील प्रलंबित लवादाच्या कार्यवाहीचा निकाल आता देण्यात आला आहे. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी आलेल्या या निवाड्यानुसार, कंपनीला पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळाकडून नुकसानभरपाईपोटी ७६५.७८ कोटी रुपये अधिक ११ टक्के दराने व्याज देण्यात येईल. न्यायाधिकरणाच्या अंतिम निवाड्यासह, लवादाची ही कार्यवाही संपुष्टात आली आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.
स्थिर सरकारने केलेल्या विकासाने देशाची जगात प्रशंसा; पंतप्रधान
- ‘‘स्थिर सरकार देणाऱ्या जनतेच्या सामर्थ्यांमुळेच देशाचा वेगाने विकास होत आहे. त्यामुळे भारताची जगभरात प्रशंसा होत आहे,’’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला. गुजरातमधील महेसाणा जिल्ह्यातील खेरालू येथे पाच हजार ९५० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करत होते.राज्यात दीर्घ काळ स्थिर सरकार राहिल्याने एकापाठोपाठ एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास कशी मदत झाली आणि त्याचा कसा फायदा झाला, हे गुजरातने अनुभवले आहे, असे सांगून मोदी म्हणाले, की आपण एखादा संकल्प केला की त्याची पूर्तता करतोच.
- देशात होत असलेल्या गतिमान विकासामुळे जगात भारत प्रशंसेस पात्र ठरत आहे. त्या विकासामागे व्यापक जनशक्तीचा लाभलेला पाठिंबा आहे. या जनतेनेच देशासाठी स्थिर सरकारची निवड केली आहे. मोदी म्हणाले की, जनतेला हे चांगले ठाऊक आहे, की मोठय़ा विकास प्रकल्पांमागे घेतलेले धाडसी निर्णय आणि गुजरातचा झपाटय़ाने होणारा विकास हा गेल्या अनेक वर्षांमध्ये रचलेला मजबूत पाया आहे.
- तुम्ही आपल्या नरेंद्रभाईंना चांगले ओळखताच. पंतप्रधानपदापेक्षाही तुम्ही मला आपल्यातला नरेंद्र भाई म्हणून पाहता आणि तुमचा नरेंद्रभाई कोणताही संकल्प केल्यानंतर त्याची पूर्तता करतोच.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
३१ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ३० ऑक्टोबर २०२३ चालू घडामोडी
- २९ ऑक्टोबर २०२३ चालू घडामोडी
- २८ ऑक्टोबर २०२३ चालू घडामोडी
- २७ ऑक्टोबर २०२३ चालू घडामोडी
- २६ ऑक्टोबर २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |