३१ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
३१ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 31 October 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

३१ ऑक्टोबर चालू घडामोडी

कनिष्ठ जागतिक बॅडिमटन स्पर्धा – शंकर मुथूस्वामीला रौप्यपदक:

 • भारताच्या शंकर मुथूस्वामीने ‘बीडब्ल्यूएफ’ कनिष्ठ जागतिक अजिंक्तपद  बॅडिमटन स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात शंकरला चायनीज तैपेईच्या कुओ कुआन लिनकडून पराभूत व्हावे लागले.
 • तमिळनाडूच्या शंकरने ४८ मिनिटे चाललेल्या लढतीत लिनकडून १४-२१, २०-२२ अशी हार पत्करली. यापूर्वी अपर्णा पोपट (१९९६), सायना नेहवाल (२००६) आणि सिरिल वर्मा (२०१५) यांनी प्रतिष्ठेच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा शंकर दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला.
 • अंतिम सामन्याच्या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. एकवेळ गेम १३-१३ असा बरोबरीत होता. मात्र लिनने आपला खेळ उंचावत गेम जिंकला आणि सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये लिनने ४-० अशी आघाडी घेतली. यानंतरही लिनने शंकरपेक्षा दर्जेदार खेळ करत गेमसह सामना जिंकला.

अंतराळ, सौर क्षेत्रात भारताची विस्मयजनक कामगिरी : मोदी ; ‘मन की बात’मध्ये ‘इस्रो’च्या यशाची प्रशंसा:

 • ‘‘भारत सौर आणि अंतराळ क्षेत्रात विस्मयजनक कामगिरी करत आहे. या यशामुळे अवघे जग चकित झाले आहे,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आपल्या आकाशवाणीवरील मासिक संवाद सत्रात काढले.
 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नुकतेच ३६ उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्याची मोहीम यशस्वी केली. शास्त्रज्ञ युवकांनी ही देशाला दिलेली विशेष दिवाळी भेट ठरली, असे सांगून मोदी म्हणाले, की या मोहिमेच्या यशामुळे संपूर्ण देशातील संपर्कयंत्रणा अत्याधुनिक आणि वेगवान होण्यास मदत होईल. अतिदुर्गम भागही उर्वरित देशाशी या संपर्कमाध्यमांद्वारे जोडले जातील.
 • आपल्या सरकारने प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मिळालेल्या यशाचे हे बोलके उदाहण आहे. जर देश स्वावलंबी झाला, तर उत्तुंग यशोशिखरे कशी गाठतो, याचेही हे उत्तम उदाहरण आहे. एके काळी भारताला ‘क्रायोजेनिक रॉकेट तंत्रज्ञान’ देणे विदेशांनी नाकारले होते. मात्र, भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून, या यशाला गवसणी घातली.

भारत आता मोठे उत्पादन केंद्र ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन:

 • भारतात नवी मानसिकता आणि कार्यसंस्कृती तयार झाली असून, त्या बळावर देश जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून उदयास आला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. ‘टाटा-एअरबस’च्या ‘सी-२९५’ मालवाहू विमाननिर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळय़ात ते बोलत होत़े
 • ‘‘सरकारच्या स्थिर, विश्वासार्ह आणि भविष्यवेधी धोरणांमुळे देश आर्थिक प्रगतीच्या वाटेवर आहे. मेक-इन-इंडिया आणि मेक-फॉर-वल्र्ड या दृष्टिकोनामुळे आपली ताकद अधिक वाढली,’’ असे  पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
 • भारत विमाननिर्मितीच्या क्षेत्रात एक महत्त्वाचे केंद्र होईल. त्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल आज टाकण्यात आले आहे. सुटय़ा भागांपासून संपूर्ण विमाननिर्मिती, असा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. ‘सी-२९५’ विमानांचे उत्पादन बडोद्यात होत असल्यामुळे केवळ लष्करालाच फायदा होईल असे नव्हे, तर त्यामुळे देशात विमाननिर्मितीचे क्षेत्र विकसित होणार असल्याचे मोदी म्हणाले.
 • या सोहळय़ाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, एअरबसचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिलूम फुरी आदी उपस्थित होते.

१४ हजार ९५६ जागांसाठी होणारी पोलीस भरती पुढे ढकलली, नवीन जाहिरात कधी:

 • करोना विषाणूच्या संसर्गामुळे मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निराशा आहे. असं असताना अलीकडेच सरकारने नोव्हेंबरपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेनंतर सरकारने लगेच यू-टर्न घेतला आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही भरती पुढे ढकलल्याची माहिती मिळत आहे.
 • खरं तर, राज्य पोलीस मुख्यालयाकडून एकूण १४ हजार ९५६ जागांसाठी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. पण प्रशासकीय कारणास्तव ही भरती पुढे ढकलण्यात आली. ही भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संबंधित भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पोलीस भरतीबरोबर राज्य राखीव दलातील पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.
 • खरं तर, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ३ नोव्हेंबरला अर्ज भरायला सुरुवात होणार होती. पण या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांचा पुन्हा हिरमोड झाला. आज पोलीस महासंचालक कार्यालयाकडून एक प्रसिद्धपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच पोलीस भरतीची नवी जाहिरात लवकर जाहीर करण्यात येईल, असंही प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

Indian Cricket महिला क्रिकेटपटूंनाही समान मानधन… पण:

 • बीसीसीआयने गेल्या आठवड्यात देशातील महिला क्रिकेटपटूंसाठी एक उत्साहवर्धक घोषणा केली.त्यानुसार आता भारतातर्फे कसोटी, एकदिवसीय आणि टी२० या तिन्हींपैकी कोणत्याही प्रकारामध्ये क्रिकेट खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूस पुरुष क्रिकेटपटू एवढेच म्हणजे कसोटीसाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख तर टी२० साठी तीन लाख रुपये एवढे मानधन देण्यात येईल .या आधी महिला क्रिकेटपटूंना अनुक्रमे कसोटीसाठी अडीचलाख तर टी२० साठी एक लाख रुपये एवढीच रक्कम मिळत होती! हे आकडे पाहाता भारतीय महिला क्रिकेटमध्ये आता येऊ घातलेल्या मोठया स्थित्यंतराची ही नांदी आहे असे म्हणावे लागेल.
 • २०१७ मध्ये तत्कालीन प्रशिक्षक डब्लू. व्ही. रामन यांच्या कारकिर्दीत भारताने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली,यंदा तर कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सिल्व्हर मेडल नंतर इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये ३/० असा ‘वन डे’ मालिकेतील विजय, बांगलादेशमध्ये आशिया चषक स्पर्धेत जेतेपद असा प्रगतीचा चढता आलेख क्रिकेट रसिक अनुभवत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने उचललेले पाऊल समयोचित म्हणावे लागेल. पुढील वर्षापासून महिला क्रिकेटच्या आयपीएलला देखील सुरुवात होत आहे.
 • बीसीसीआयच्या या ‘गेम चेजिंग’ निर्णयाचे भारतीय कर्णधार हरमनप्रित कौर ने ‘रेड लेटर डे’ अशा शब्दात स्वागत केले आहे. माजी कर्णधार शांता रंगास्वामी म्हणतात,” १९७३ ते १९९४ या माझ्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत मी क्रिकेट खेळून काहीही अर्थप्राप्ती केली नाही” . १९७६ ते १९९३ या दरम्यान भारतासाठी २०कसोटी व ३४ ‘एकदिवसीय’ सामने खेळलेल्या डायना एदुलजी म्हणतात, “ही बातमी म्हणजे खेळाडूंसाठी एक चांगली दिवाळी भेट आहे!” त्यानी स्वतः २०१७ पासून तीन वर्षे बीसीसीआय वर प्रशासक म्हणून काम पाहिले आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

३१ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.