२६ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२६ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 26 October 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२६ ऑक्टोबर चालू घडामोडी

सिंधूला पाचव्या स्थानी बढती:

 • दोन ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि थॉमस चषक विजेत्या संघात सहभागी असलेला एच एस प्रणॉय मंगळवारी जागतिक बॅडमिंटन महासंघाकडून (बीडब्ल्यूएफ) जागतिक क्रमवारीत महिला आणि पुरुष एकेरीत एका स्थानाच्या बढतीसह अनुक्रमे पाचव्या आणि १२व्या स्थानी पोहोचले.
 • ऑगस्टमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर दुखापतीमुळे स्पर्धात्मक बॅडमिंटनपासून दूर झालेल्या सिंधूचे २६ स्पर्धात ८७२१८ गुण आहेत. तीन वर्षांनंतर सिंधूने पुन्हा अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले. पुरुष एकेरीत प्रणॉयने डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठताना क्रमवारीत आपली आगेकूच कायम राखली. प्रणॉयचे २६ स्पर्धात ६४३३० गुण आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेता लक्ष्य सेन आणि कांस्यपदक विजेता किदम्बी श्रीकांत अनुक्रमे आठव्या व ११व्या स्थानी आहेत.
 • सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती जोडी पुरुष दुहेरीत आठव्या स्थानावर कायम आहे. एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला पुरुष दुहेरी क्रमवारीत दोन स्थानांच्या फायद्यासह १९व्या स्थानी पोहोचली आहे. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरी जोडी २७व्या स्थानावर आहे. सायना नेहवाल महिला एकेरी क्रमवारीत एका स्थानाच्या घसरणीसह ३३व्या स्थानी आहे.

ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान; दोनशे वर्षांतील सर्वात तरुण नेतृत्व:

 • भारतात दिवाळी साजरी होत असताना ब्रिटनच्या पंतप्रधानपदी प्रथमच भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवारी निवड झाल्याने एक नवा इतिहास रचला गेला. सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत, शिवाय ते माजी अर्थमंत्रीही आहेत. पंतप्रधानपदासाठी सत्ताधारी हुजूर पक्षात पेनी मॉरडाँट आणि ऋषी सुनक यांच्यात शर्यत होती. हुजूर पक्षाच्या ३५७ खासदारांपैकी सुनक यांना १४२ जणांनी पाठिंबा दिला होता, तर मॉरडाँट यांच्याकडे २९ सदस्यांचे पाठबळ होते. नेतेपदी निवड होण्यासाठी आवश्यक असलेला किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळणे अशक्यप्राय असल्याचे लक्षात येताच मॉरडाँट यांनी माघार घेतली आणि हुजूर पक्षाचे नवे नेते म्हणून सुनक यांची बिनविरोध निवड झाली.
 • ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी आपल्याकडे निर्धारित वेळेत (स्थानिक वेळेनुसार सोमवारी दुपारी २ वा.) केवळ एकच नामांकनपत्र आल्याचे हुजूर पक्षाच्या खासदारांच्या ‘१९२२ समिती’चे अध्यक्ष सर ग्रॅहम ब्रॅडी यांनी जाहीर करीत नेतेपदाच्या शर्यतीत सुनक विजेते ठरल्याची घोषणा केली. त्यामुळे लंडनमधील ‘१० डाऊिनग स्ट्रीट’ या ब्रिटिश राजकारणाच्या केंद्रस्थानाकडे सुनक यांची वाटचाल सुरू झाली आहे.
 • पंतप्रधानपदासाठी स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी जाहीर केला. त्यामुळे हुजूर पक्षाच्या नेतृत्वपदासाठी आणि पंतप्रधानपदासाठी सुनक यांचे पारडे जड झाले होते. पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेताना जॉन्सन म्हणाले की, आपण पुन्हा पंतप्रधानपदाची सूत्रे घ्यावीत, यासाठी ही योग्य वेळ नाही. नेतेपदासाठी आवश्यक खासदारांचा पाठिंबा मिळण्याची मुदत सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता संपली. तेव्हा सुनक यांनी १४२ सदस्यांचा पाठिंबा मिळवून आघाडी घेतली होती.
 • हुजूर पक्षाच्या जॉन्सनसमर्थक सदस्यांनीही सुनक यांना पाठिंबा जाहीर केला. त्यात माजी गृहमंत्री प्रीती पटेल, मंत्री जेम्स क्लेव्हर्ली, नदीम जहावी यांचा समावेश होता. गेल्या महिन्यात लिझ ट्रस यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यावर मंत्रिमंडळातून पायउतार झालेल्या भारतीय वंशाच्या माजी गृहमंत्री पटेल म्हणाल्या की, नवा नेता म्हणून सुनक यांना संधी देण्यासाठी आमच्या खासदारांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवणे आवश्यक आहे.

राष्ट्रपर्ती, पंतप्रधान यांच्या देशवासीयांना दिवाळी शुभेच्छा:

 • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी शुभेच्छा देताना म्हंटले आहे, की दिवाळीच्या महापर्वाने सर्व देशवासीयांच्या जीवनात सुख-समृद्धी वृद्धिंगत होवो, यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
 • प्रकाश आणि आनंद-उत्साहाच्या या पवित्र सणानिमित्त आपण ज्ञान, ऊर्जास्वरूपी दीप प्रज्ज्वलित करून गरजू-वंचितांचे जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न करावा.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘ट्वीट’द्वारे दिवाळी सण आनंद आणि समृद्धी घेऊन येवो अशा शुभेच्छा देशवासीयांना दिल्या. त्यांनी ‘ट्वीट’ केले, की तुम्हा सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिव्यांचा हा सण सर्वाच्या आयुष्यात आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. तुमची दिवाळी तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत आनंदात जावो.

“शक्य होईल त्या मार्गाने देश सोडा”; मोदी सरकारकडून युक्रेनमधील भारतीयांना सूचना:

 • युक्रेनमधील भारतीय नागरिकांनी शक्य तिकक्या लवकर आणि उपलब्ध असेल त्या मार्गाने युक्रेनमधून बाहेर पडावे, अशी सूचना किव्हमधील भारतीय दुतावासाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजीही भारतीय दुतावासाडून अशाच प्रकारची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर अनेक भारतीयांना युक्रेनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
 • सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे भारतीय दुतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच युक्रेनमधील भारतीय नागरीक हंगरी, सोल्वाकिया, मोल्डोवा, पोलंड आणि रोमानिया सारख्या सीमेवरील देशांच्या मदतीने युक्रेनमधून बाहेर पडू शकता, असेही ही दुतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 • याबरोबरच ज्या युक्रेनधील भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी दुतावासाकडून +३८०९३३५५९९५८, +३८०६३५९१७८८१, + ३८०६७८७४५९४५ तीन हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.

जावई सुनक यांचा अभिमान – नारायण मूर्ती:

 • आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो व त्यांच्या यशासाठी शुभेच्छा, अशा शब्दांत ‘इन्फोसिस’चे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आपले जावई ऋषी सुनक यांच्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया दिली. ४२ वर्षीय सुनक यांनी रविवारी ब्रिटनमधील हुजूर पक्षाच्या नेतृत्वस्पर्धेत बाजी मारली. ते भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत.
 • यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मूर्ती यांनी सांगितले, की ऋषी यांचे अभिनंदन. आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. आम्ही त्यांच्या यशासाठी शुभेच्छा देतो. ब्रिटनच्या जनतेसाठी सर्वोत्तम सेवा ते देतील, असा विश्वास आहे.
 • कॅलिफोर्नियातील ‘एमबीए’साठी स्टॅनफोर्ड येथे असताना इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यानंतर २००९ मध्ये सुनक यांनी अक्षतासोबत विवाह केला. या दाम्पत्याला कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२६ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.