Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 27 October 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२७ ऑक्टोबर चालू घडामोडी
सलग दुसऱ्या विजयासाठी न्यूझीलंड उत्सुक:
- गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला सनसनाटी सुरुवात करणारा न्यूझीलंड संघ आता तीच मालिका दुसऱ्या सामन्यातही कायम ठेवण्याच्या इराद्यानेच अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेव्हॉन कॉन्वेचा धमाका, जेम्स नीशामची निर्णायक आक्रमकता आणि मिचेल सॅंटनेरचा प्रभावी फिरकी मारा असे तिहेरी वर्चस्व न्यूझीलंडने राखले होते. अष्टपैलू डॅरिल मिचेलदेखील तंदुरुस्त झाल्याने न्यूझीलंडची ताकद अधिक वाढणार आहे. आक्रमकतेचा नवा चेहरा बनू पाहणारा फिन अॅलनही न्यूझीलंडसाठी तारणहार बनू शकतो.
- दुसरीकडे अफगाणिस्ताननेदेखील अलीकडच्या काळात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये प्रगती केली आहे. रशीद खान, मुजीब उर रेहमान, मोहम्मद नबी यांच्यापाठोपाठ फझलहक फरुकी आणि नवीन उल हक हे गोलंदाजही चांगल्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे तीनही फिरकी गोलंदाजांना बिग बॅशच्या निमित्ताने ट्वेन्टी-२० क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. फलंदाजांच्या कामगिरीत असलेला सातत्याचा अभाव आणि क्षेत्ररक्षण हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मेलबर्नसारख्या मोठय़ा मैदानावर खेळताना त्यांच्या फलंदाजांची कसोटी लागणार आहे.
- इब्राहिम झद्रान हा त्यांचा प्रमुख फलंदाज असला, तरी त्याच्याकडे रहमानुल्ला गुरबाज किंवा हजरतुल्ला झझाई यांच्यासारखी ताकद नाही. अर्थात, तंत्र आणि डाव उभारणीसाठी लागणारा संयम ही इब्राहिमची जमेची बाजू असल्याने इब्राहिमकडून अफगाणिस्तानला मोठय़ा आशा असतील. खेळपट्टी आणि हवामान वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असल्यामुळे गोलंदाजांची निवड आणि नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरू शकतो.
बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने राज्यात ७०० दवाखाने सुरु होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा:
- गेली दोन वर्षे आपल्याला निर्बंध होते. पण, यावर्षी सर्व सण मुक्त आणि मोकळ्या वातावरणात साजरे करत आहोत. सकारात्मक बदल सगळीकडे पाहायला मिळत आहे. आपल्या सर्वांसाठी हे शिवधनुष्य आम्ही पेललं असून, आमचाही आत्मविश्वास वाढला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं आहे.
- दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी दिवाळीच्या सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, शिंदे-भाजपा सरकारमधील कामांची माहिती दिली आहे. “बाळासाहेबांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला प्रधान्य द्यायला, तर आनंद दिघेंनी सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या हक्कासाठी लढायलं शिकवलं. त्यामुळे शेतकरी कष्टकरी, वंचित, शोषित अशा सर्वांच्या विकासाचा आमचा ध्यास आहे. तो पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करत आहोत.”
- “आपत्तीने आपण कधीच डगमगलो नसल्याने, काही चांगल्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला. त्या यशस्वी होत आहेत, याचं समाधान आहे. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांनी एसटी मोफत सुरु केली. ५२ दिवसांत एक कोटी नागरिकांनी याचा लाभ घेतला. दिवाळीत रेशनकार्ड धारकांसाठी ‘आनंदाचा शिधा’ केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय घेतला. अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांना एनडीआरफच्या मदतीच्या दुप्पट आणि २ ऐवजी ३ हेक्टरमध्ये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे ३० लाख शेतकऱ्यांना ४ हजार कोटींची रुपयांची मदत मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.
भारत-चीन व्यापार १०० अब्ज डॉलपर्यंत:
- भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार वाढत असून पहिल्या नऊ महिन्यात तो १०० अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक आहे, तर या काळात भारताचा व्यापारात ७५ अब्ज डॉलरची घट झाली आहे. याच कालावधीत द्विपक्षीय व्यापार १०३.६३ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. ही वाढ गेल्यावर्षीच्या तुलनेत १४.६ टक्के अधिक आहे.
- चीनच्या सीमा शुल्क विभागाच्या सामान प्रशासनाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. भारताला चीनने केलेल्या निर्यातीमध्ये ३१ टक्के वाढ आहे. म्हणजे ही वाढ ८९.९९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. दुसरीकडे या जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात भारताची निर्यात ३६.४ टक्के घट असून १३.९७ अब्ज डॉलर आहे.
- यामुळे एकूण व्यापारातील घट ७५.६९ अब्ज डॉलरहून अधिक झाली आहे. गेल्यावर्षी भारत आणि चीन दरम्यान द्विपक्षीय व्यापार विक्रमी १२५ अब्ज डॉलरवर पोहचली होती. गेल्यावर्षी भारताला चीनकडून ४६.२ टक्के निर्यातीत वाढ झाली होती. हा व्यापार ९७.५२ अब्ज डॉलर झाला होता. याच काळात चीनला भारताकडून ३४.२ टक्के निर्यात वाढ झाली होती.
भारतात आता १२ ‘ब्ल्यू बीचेस’:
- जगातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत आणखी दोन भारतीय समुद्रकिनारे समाविष्ट झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी बुधवारी दिली.
- ‘अभिमानाचा क्षण! आणखी दोन भारतीय समुद्रकिनाऱ्यांनी ‘ब्ल्यू बीच’ यादीत स्थान मिळवले आहेत. लक्षद्वीपमधील मिनीकॉय, थुंडी समुद्रकिनारा आणि कदमत समुद्रकिनारा या दोन समुद्रकिनाऱ्यांनी ‘ब्ल्यू बीचेस’च्या प्रतिष्ठित यादीत अभिमानाने प्रवेश केला आहे.’ असे ट्वीट यादव यांनी केले आहे. यामुळे भारतातील ‘ब्ल्यू बीचेस’ची संख्या १२ झाली आहे.
- ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक शाश्वत वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने भारताच्या अथक प्रवासाचा हा एक भाग आहे,’ असेही त्यांनी ट्वीट केले. थुंडी समुद्रकिनारा हा लक्षद्वीप द्वीपसमूहातील सर्वात नयनरम्य आणि नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे, जेथे पांढऱ्या वाळूने सरोवराच्या नीलमणी निळ्या पाण्याने रेषा केलेली आहे. तर कदमत समुद्रकिनारा हे जलक्रीडा करण्यासाठी क्रूझ पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२७ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २६ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी
- २५ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी
- २४ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी
- २३ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी
- २२ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |