१ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 1 November 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

नोव्हेंबर चालू घडामोडी

फ्रेंच खुली बॅडिमटन स्पर्धा – सात्विक-चिराग जोडीला जेतेपद:

 • सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या तारांकित जोडीने बॅडिमटन विश्वातील आपली भरारी कायम राखताना फ्रेंच खुल्या स्पर्धेचे (सुपर ७५० दर्जा) जेतेपद पटकावले. पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत सात्विक-चिराग जोडीने चायनीज तैपेईच्या लू चिंगा याओ आणि यांग पो हान जोडीला सरळ गेममध्ये पराभूत केले. 
 • जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या भारतीय जोडीने लू आणि यांग जोडीवर ४८ मिनिटे चाललेल्या अंतिम लढतीत २१-१३, २१-१९ अशी सरशी साधली. सात्विक-चिराग जोडीने या वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय खुली स्पर्धेचे (सुपर ५०० दर्जा) विजेतेपद, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, थॉमस चषकाचे विजेतेपद आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्याची सात्विक-चिराग जोडीने किमया साधली आहे.
 • रोख पुरस्कारांनी गौरव – फ्रेंच खुल्या बॅडिमटन स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या सात्विक-चिराग जोडीला भारतीय बॅडिमटन संघटनेकडून (बाइ) पाच लाख रुपयांच्या रोख पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. तसेच कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या शंकर मुथुस्वामीलाही पाच लाखांच्या रोख पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

जगातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी तिसऱ्या स्थानावर; जेफ बेझोस यांना टाकलं मागे:

 • भारतीय उद्योगपती तथा अब्जाधीश गौतम अदानी यांनी फोर्ब्सकडून जारी करण्यात येणाऱ्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पुन्हा एकदा तिसरे स्थान पटकावले आहे. त्यांनी अॅमोझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकले आहे. श्रीमंतांच्या यादीत प्रथम स्थानावर एलॉन मस्क कायम आहेत.
 • गौतम अदानी यांची संपत्ती १३१.९ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. याच कारणामुळे ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. लुईस व्हिटॉन आणि बर्नार्ड अरनॉल्ट हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती १५६.५ अब्ज डॉर्लर्स आहे. मागील आठवड्यात अॅमोझॉनवरील विक्री घटल्यामुळे बेझोस यांच्या संपत्तीत घट झाली. त्यामुळे सध्या त्यांची संपत्ती १२६.९ अब्ज डॉर्लर्सवर पोहोचली आहे. जागतिक बाजारपेठेत मोठे चढउतार होत असल्यामुळे या अब्जाधीशांची संपत्तीही कमी-अधिक होत आहे. याच कारणामुळे श्रीमंतांच्या यादीत अदानी यांनी बेझोस यांना मागे टाकले आहे.
 • मागील काही दिवसांपासून गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानापर्यंत घसरले होते. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी या यादीत दुसरा क्रमांक गाठला होता. पहि्ल्या क्रमांकावर टेस्ला कारचे सीईओ तथा अब्जाधीश एॅलोन मस्क हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती २२३.८ अब्ज डॉलर आहे.

ब्राझीलच्या अध्यक्षपदी पुन्हा डाव्या विचारांचे डिसिल्वा:

 • ब्राझीलच्या नागरिकांनी विद्यमान अध्यक्ष जाइर बोल्सनारो यांच्या अतिउजव्या राजकारणाविरोधात कौल देत डाव्या विचारांचे माजी अध्यक्ष लुईझ इनाशिवो लुला डिसिल्वा यांना पुन्हा संधी दिली आहे. अध्यक्षीय निवडणुकीत डिसिल्वा यांनी मोठा विजय मिळवला आहे.
 • ब्राझीलच्या निवडणूक यंत्रणेच्या आकडेवारीनुसार डिसिल्वा यांना ५०.९ टक्के, तर बोल्सोनारो यांना ४९.१ टक्के मते मिळाली. निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर विद्यमान अध्यक्ष बोल्सोनारो यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती वा आपला पराभवही मान्य केला नव्हता. दरम्यान, बोल्सोनारो यांच्याविरोधात देशभर निदर्शने करण्यात आली, तर अनेक ठिकाणी ट्रकचालकांनी आपली वाहने भररस्त्यात उभी करून रस्ते अडवून निषेध व्यक्त केला.
 • बोल्सोनारो यांनी प्रचारादरम्यान निवडणुकीत गैरव्यवहार होण्याचे निराधार दावे केले होते. आपण पराभूत झालो तरीही पराभव मान्य करणार नाही, इतकेच नव्हे तर निवडणूक निकालालाही आव्हान देऊ, असा इशाराही त्यांनी दिला होता.
 • आज फक्त ब्राझीलचे नागरिक जिंकले आहेत, अशी भावना नवनिर्वाचित अध्यक्ष डिसिल्वा यांनी रविवारी संध्याकाळी विजयी भाषणात व्यक्त केली. डिसिल्वा यांनी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन शासन करण्याची ग्वाही दिली असली आणि २००३ ते २०१० या काळात माझ्या अध्यक्षीय कारकीर्दीत अनुभवलेली समृद्धी पुन्हा आणण्याचा निर्धार व्यक्त केला असला तरी त्यांना समाजातील राजकीय ध्रुवीकरणामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.

ट्विटरकडून पहिल्या फेरीत २५ टक्के कर्मचारी कपात शक्य:

 • गेल्या आठवडय़ात ट्विटरवर मालकी मिळविलेल्या अब्जाधीश इलॉन मस्क यांच्याकडून पहिल्या टप्प्यातील अपेक्षित मनुष्यबळ कपातीचा भाग म्हणून एक चतुर्थाश कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याची योजना आखली जात आहे, असे वृत्त वॉिशग्टन पोस्टह्णने या घडामोडींशी परिचित असलेल्या सूत्रांचा हवाला देऊन सोमवारी दिले.
 • नियामकांकडे सादर केलेल्या विवरणानुसार २०२१ अखेरीस ट्विटरची एकूण कर्मचारी संख्या ७,००० पेक्षा जास्त होती. यापैकी एक चतुर्थाश कर्मचाऱ्यांची कपात म्हणजे जवळपास २,००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाईल अशी शक्यता आहे. मस्क यांनी या आधी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याबाबतच्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्ताचा इन्कार केला आहे. तथापि, ताज्या घडामोडींवर ट्विटरकडून अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 
 • मस्क यांनी सरलेल्या गुरुवारी ४४ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मोबदल्यात ट्विटरच्या अधिग्रहणाचा व्यवहार पूर्ण केल्यावर, सर्वप्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल आणि कायदेशीर व्यवहार व धोरण प्रमुख विजया गड्डे यांना कामावरून कमी करून बाहेरचा रस्ता दाखविला आहे.

इलॉन मस्क यांचा आणखी एक मोठा निर्णय; ट्विटरचे संचालक मंडळच केले बरखास्त:

 • मागील आठवडय़ात ट्विटरवर मालकी मिळविलेल्या अब्जाधीश इलॉन मस्क यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्विटरचे संचालक मंडळच बरखास्त केले असून, आता संपूर्ण संचालक मंडळाची जबाबदारी ते एकटेच सांभाळणार आहेत.
 • या अगोदर मस्क यांनी कंपनीची मालकी मिळताच मागील आठवड्यातच कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल आदी अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता मस्क यांनी ट्विटरचे संचालक मंडळही बरखास्त केल्याचे समोर आले आहे.
 • मस्क यांच्याकडून पहिल्या टप्प्यातील अपेक्षित मनुष्यबळ कपातीचा भाग म्हणून एक चतुर्थाश कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याची योजना आखली जात आहे, असे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने या घडामोडींशी परिचित असलेल्या सूत्रांचा हवाला देऊन काल (सोमवार) दिले आहे.
 • नियामकांकडे सादर केलेल्या विवरणानुसार २०२१ अखेरीस ट्विटरची एकूण कर्मचारी संख्या ७,००० पेक्षा जास्त होती. यापैकी एक चतुर्थाश कर्मचाऱ्यांची कपात म्हणजे जवळपास २,००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाईल अशी शक्यता आहे. मस्क यांनी या आधी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याबाबतच्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्ताचा इन्कार केला आहे. तथापि, ताज्या घडामोडींवर ट्विटरकडून अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.