५ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
५ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |5 March 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

५ मार्च चालू घडामोडी

भारताची कौतुकास्पद प्रगती : बिल गेट्स

  • विकास, आरोग्य व पर्यावरणासारख्या क्षेत्रांत भारताच्या प्रगतीची प्रशंसा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी शनिवारी केली. ‘विविध क्षेत्रांत नाविन्यपूर्ण गुंतवणूक केली जाते, तेव्हा काय काय होऊ शकते,’ याचे हे निदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
  • ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’चे सह अध्यक्ष बिल गेट्स यांनी सुरक्षित, प्रभावी व किफायतशीर लसनिर्मिती करण्याच्या भारताच्या अभूतपूर्व क्षमतेची प्रशंसा केली. यातील बहुसंख्य लसमात्रा विकसित करण्यासाठी ‘गेट्स फाउंडेशन’ने सहाय्य केले आहे. गेट्स म्हणाले, की या लसमात्रांमुळे करोना महासाथीत लाखो नागरिकांचे प्राण वाचण्यास मदत झाली. तसेच जगभरात इतर आजारांचाही प्रादुर्भाव रोखण्यास भारताने विकसित केलेल्या लशींमुळे मोठी मदत झाली आहे.
  • गेट्स यांनी आपल्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटही घेतली. मोदींनी शनिवारी केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की बिल गेट्स यांना भेटून व त्यांच्याशी महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा करून आनंद वाटला. आपल्या वसुंधरेला अधिक सुंदर आणि त्याच्या शाश्वत अस्तित्वासाठी गेट्स यांची बांधिलकी, झपाटलेपण आणि त्यांची विनम्रता भावते.
  • ‘डिजिटल’ तंत्रज्ञानाचा सरकारकडून प्रभावी वापर!’ – गेट्स यांनी नमूद केले, की महासाथीच्या काळात भारताने २० कोटी महिलांसह ३० कोटी नागरिकांना आपत्कालीन ‘डिजिटल पेमेंट’ केले. हे केवळ शक्य झाले कारण भारताने ‘आधार’सारख्या ‘डिजिटल आयडी प्रणाली’मध्ये गुंतवणूक करून ‘डिजिटल बँकिंग’साठी नाविन्यपूर्ण व्यासपीठ तयार केले. त्याद्वारे आर्थिक व्यवहारातील सहभागास प्राधान्य दिले. त्यामुळे उत्तम आर्थिक गुंतवणूक होण्यास मदत झाली.

आता तुम्ही बोलताच रेल्वे तिकीट होणार बुक, कसे ते जाणून घ्या?

  • भारतीय रेल्वे प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी सातत्याने सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करते. आता आयआरसीटीसी (IRCTC) प्रवाशांसाठी अशी एक सुविधा आणत आहे ज्यात तुम्ही बोलताच तुमचं रेल्वे तिकीट बुक होणार आहे. यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीद्वारे तिकीट बुक करताना माहिती भरण्याची गरज भासणार नाही. आता तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करताना टाईप करून माहिती भरावी लागते. मात्र भविष्यात तुम्ही फक्त बोलून सर्व माहिती भरू शकता. यासाठी आयआरसीटीसी नवी सुविधा घेऊन येत आहे. आस्क दिशा २.० या नावाने प्रवाशांना ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे.
  • तिकीट बुक करणे होईल सोपे – आयआरसीटीसी सध्या AI वर आधारित आस्क दिशा २.० या नव्या प्लॅटफॉर्मची यशस्वी चाचणी झाली आहे. यामुळे प्रवाशांना आयआरसीटीसीच्या चॅटबॉटमध्ये व्हॉइस कमांड वापरून संपूर्ण ऑनलाईन तिकीट बुकिंग करता येणार आहे. यात प्रवासी बोलून सहज आपलं रेल्वे तिकीट बुक करू शकतात. IRCTC च्या या नवीन अपडेटमुळे तिकीट बुक करणे आता सोपे होणार आहे.
  • आयआरसीटीसीचे म्हणणे आहे की, व्हॉईस कमांडद्वारे तिकीट बुकिंगची चाचणी सुरू यशस्वी झाली आहे. आता प्रवाशांना लवकरच ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. एवढेच नाही तर प्रवाशांना तिकिट रद्द करण्यासह प्रिंट आणि शेअरही ऑप्शन देण्यात येईल. यात प्रवासी ट्रेनशी संबंधित कोणतीही माहिती व्हॉईस कमांडद्वारेच मिळू शकतात.
  • आरआयसीटीसीने प्रवाशांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आस्क दिशा नावाचं फिचर तयार केलं आहे. या फीचरद्वारे प्रवासी प्रश्न इंग्रजी आणि हिंदीमध्ये विचारू शकतात. याच फिचरमध्ये काही बदल करत व्हॉईस कमांड ऑप्शन अॅड केल जात आहे.

देशभर नव्या फ्लूची साथ; ‘आयसीएमआर’, ‘आयएमए’च्या मार्गदर्शक सूचना

  • देशभर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून फ्लूसदृश लक्षणे असलेल्या आजाराची साथ पसरली असून हा फ्लूचाच एक प्रकार असल्याचे आणि ‘फ्लू ए’चा उपप्रकार ‘एच३एन२’ या विषाणूमुळे त्याचा प्रादुर्भाव होत असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
  • फ्लूच्या इतर उपप्रकारांपेक्षा ‘एच३एन२’मुळे रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्दी, खोकला आणि तापाबरोबरच मळमळ, उलटय़ा, घसादुखी, अंगदुखी, अतिसार ही या आजाराची अन्य लक्षणे आहेत. त्यावर उपचार करताना सरसकट प्रतिजैवकांचा वापर करू नये आणि डॉक्टरांनी सध्या फक्त लक्षणांवर औषधे द्यावीत असा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिला आहे. हा हंगामी ताप पाच ते सात दिवस येतो, असेही ‘आयएमए’ने स्पष्ट केले. हा ताप तीन दिवसांनी जातो, तर खोकला मात्र तीन आठवडय़ांपर्यंत राहू शकतो, असे ‘आयएमए’च्या समितीने सांगितले. 
  • या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यत: हवेतून होत आहे. १५ पेक्षा कमी आणि ५०हून अधिक वयाच्या रुग्णांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक आहे. विषाणूचा संसर्ग श्वासनलिकेच्या वरील भागाला होतो आणि ताप येतो, असा निष्कर्ष १५ डिसेंबरपासून करण्यात आलेल्या पाहणीवरून काढण्यात आला आहे. हा आजार जीवघेणा नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले असले तरी काही रुग्णांच्या बाबतीत श्वसनयंत्रणेला संसर्ग होत असल्याने रुग्णालयात दाखल करावे लागूू शकते.

अयोध्येतील मशिदीच्या आराखडय़ास अंतिम मंजुरी; रुग्णालय, स्वयंपाकघर, ग्रंथालयाची योजना 

  • बाबरी मशीद-रामजन्मभूमी निकालात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अयोध्या विकास प्राधिकरणाने येथे धन्नीपूर मशिदीच्या बांधकामाच्या आराखडय़ाला अंतिम मंजुरी दिली. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या पाच एकर जागेवर ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्ट’द्वारे (आयआयसीएफ) एक मशीद, रुग्णालय, संशोधन संस्था, समूदाय स्वयंपाकघर आणि ग्रंथालय बांधले जाणार आहे.
  • अयोध्या विकास प्राधिकरणाद्वारे मंजुरीस विलंब, जमीन वापरातील बदलाच्या प्रकरणांमुळे हे बांधकाम दोन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित होते. अयोध्येचे विभागीय आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितले, की शुक्रवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत आम्ही अयोध्या मशिदीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मंजूर नकाशे ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’कडे काही विभागीय औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सुपूर्द केले जातील. ही प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होईल.
  • धनीपूर मशिदीचे ठिकाण अयोद्धेतील राम मंदिराच्या ठिकाणापासून सुमारे २२ किलोमीटरवर आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी ऐतिहासिक निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचे आदेश दिले व सरकारला जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा देण्यास आदेश दिले होते.
  • ‘आयआयसीएफ’चे सचिव अतहर हुसेन यांनी सांगितले, की सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्यानंतर ‘ट्रस्ट’ एक बैठक घेईल व मशिदीच्या बांधकामाच्या योजनेस अंतिम स्वरूप देईल. २१ एप्रिल रोजी संपणाऱ्या ‘रमजान’नंतर ट्रस्टची बैठक होणार आहे. त्यात मशिदीचे बांधकाम सुरू करण्याची तारीख निश्चित केली जाईल. आम्ही २६ जानेवारी २०२१ रोजी मशिदीची पायाभरणी केली. आम्ही तो दिवस निवडला, कारण या दिवशी सात दशकांपूर्वी भारताची राज्यघटना देशात लागू झाली होती. धन्नीपूर मशीद बाबरी मशिदीपेक्षा मोठी असेल. अयोध्येत पूर्वीच्या संरचनेनुसार ती तयार केली जाणार नाही.
  • मशिदीच्या बांधकामासाठी स्थापण्यात आलेल्या ‘आयआयसीएफ’ ट्रस्टने मशिदीसह एक रुग्णालय, एक सामुदायिक स्वयंपाकघर, एक ग्रंथालय आणि संशोधन संस्था बांधण्याची घोषणा केली. हुसेन यांनी सांगितले, की नियोजित रुग्णालय १४०० वर्षांपूर्वी पैगंबरांच्या शिकवणीनुसार इस्लामच्या खऱ्या मानवतवादी श्रद्धेतून सेवा करेल.

दहशतवादविरोधी गट स्थापण्याची ‘क्वाड’ची घोषणा

मुक्त आणि खुल्या हिंदू-प्रशांत प्रदेशासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा दिली. या भागामध्ये कायद्याचे राज्य, स्वायत्तता, प्रादेशिक अखंडता आणि विवादांवर शांततापूर्ण समझोता या बाबींना जोरदार समर्थन देत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. क्वाड गटाची ही भूमिका म्हणजे नाव न घेता चीनला इशारा दिल्याचे मानले जात आहे.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन, जपानचे परराष्ट्रमंत्री आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांची शुक्रवारी बैठक झाली. त्या वेळी या दहशतवादविरोधी गटाची घोषणा करण्यात आली. हा गट दहशतवादाचे नवे स्वरूप, धार्मिक मूलगामित्वामध्ये वाढ आणि हिंसक अतिरेकी गट यांचा सामना करण्याच्या उपाययोजनांचा शोध घेईल.

या बैठकीनंतर चारही परराष्ट्रमंत्र्यांनी रायसीना चर्चेतील एका सत्राला हजेरी लावली, या वेळी त्यांनी क्वाड सदस्य देशांच्या सामायिक हितसंबंधांबद्दल चर्चा केली. या बैठकीनंतर चारही परराष्ट्रमंत्र्यांनी रायसीना चर्चेला हजेरी लावली, या वेळी त्यांनी क्वाड सदस्य देशांच्या सामायिक हितसंबंधांबद्दल चर्चा केली.

तसेच त्यांनी एकमताने सर्व स्वरूपांतील दहशतवादाचा निषेध केला आणि दहशतवादी गटांचा वापर करण्यास, तसेच दहशतवादी कारवायांसाठी त्यांना आर्थिक किंवा लष्करी पाठबळ देण्यास विरोध केला. या वेळी २६/११ चा मुंबई हल्ला आणि पठाणकोट हल्ल्यांसह सर्व दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करण्यात आला. आरोग्य सुरक्षितता, हवामानातील बदल, हरित ऊर्जा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाबद्दलही परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा झाली.

कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:

  • ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी देशातील अन्यायाचा सामना करण्यासाठी इन्साफ या मंचाची स्थापना करण्याची घोषणा केली.
  • देशातील विरोधी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री यांच्यासह सर्वानी आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन सिबल यांनी केले.
  • या मंचातर्फे 11 मार्चला जंतर मंतर येथे सार्वजिक सभा आयोजित केली जाईल असे त्यांनी सांगितले.
  • देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अन्याय होत आहे, नागरिक, संस्था, राजकीय विरोधक, पत्रकार, शिक्षक, आणि मध्यम व लघु उद्योगांना अन्यायाचा सामना करावा लागतो असे सिबल म्हणाले.
  • त्यासाठी इन्साफ का सिपाही ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे, त्यावर कोणीही नाव नोंदवू शकतो अशी माहिती सिब्बल यांनी दिली.

अयोध्येतील मशिदीच्या आराखडय़ास अंतिम मंजुरी:

  • बाबरी मशीद-रामजन्मभूमी निकालात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अयोध्या विकास प्राधिकरणाने येथे धन्नीपूर मशिदीच्या बांधकामाच्या आराखडय़ाला अंतिम मंजुरी दिली.
  • उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या पाच एकर जागेवर ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्ट’द्वारे (आयआयसीएफ) एक मशीद, रुग्णालय, संशोधन संस्था, समूदाय स्वयंपाकघर आणि ग्रंथालय बांधले जाणार आहे.
  • शुक्रवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत आम्ही अयोध्या मशिदीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
  • मंजूर नकाशे ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’कडे काही विभागीय औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सुपूर्द केले जातील.
  • 9 नोव्हेंबर 2019 रोजी ऐतिहासिक निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचे आदेश दिले व सरकारला जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा देण्यास आदेश दिले होते.

_

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी रेल्वेचं हे नवं फिचर:

  • भारतीय रेल्वे प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी सातत्याने सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करते.
  • आता आयआरसीटीसी (IRCTC) प्रवाशांसाठी अशी एक सुविधा आणत आहे ज्यात तुम्ही बोलताच तुमचं रेल्वे तिकीट बुक होणार आहे.
  • यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीद्वारे तिकीट बुक करताना माहिती भरण्याची गरज भासणार नाही.
  • यासाठी आयआरसीटीसी नवी सुविधा घेऊन येत आहे.
  • आस्क दिशा 2.0 या नावाने प्रवाशांना ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे.

हरमनप्रीत कौर आणि मुंबई इंडियन्सने रचला इतिहास:

  • महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जात आहे.
  • मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • मुंबईने पहिल्याच सामन्यात 200 धावांचा टप्पा पार केला.
  • त्याचबरोबर मुंबई इंडियन्स आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे.
  • ती या स्पर्धेतील अर्धशतक झळकावणारी पहिली फलंदाज ठरली आहे.
  • त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने पहिल्याच डावात 200 धावांचा टप्पा पार करत इतिहास रचला आहे.

यशस्वी जैस्वाल ठरला ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय:

  • मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात द्विशतक झळकावल्यानंतर रेस्ट ऑफ इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावातही आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली.
  • इराणी चषकाच्या चौथ्या दिवशी यशस्वी जैस्वालने लंच टाईमपूर्वी यशस्वीने आक्रमक खेळी करत शतक पूर्ण केले.
  • त्याचबरोबर त्याने एक इतिहास रचला आहे.
  • इराणी चषकाच्या एकाच सामन्यात द्विशतक आणि शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
  • या सामन्यात यशस्वीने आता 300 हून अधिक धावा पूर्ण केल्या आहेत.
  • इराणी चषकात अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.
  • याआधी भारताचा सलामीवीर शिखर धवनने इराणी चषकात एका सामन्यात 300 धावांचा टप्पा पार केला होता.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

५ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.