१ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |1 March 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१ मार्च चालू घडामोडी

राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धा: मिथुन, अनुपमाला विजेतेपद

  • रेल्वेच्या मिथुन मंजुनाथ आणि हरियाणाची अनुपमा उपाध्याय यांनी ८४व्या राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेत विजेतेपद मिळवले. मिथुनचे एकतर्फी वर्चस्व, तर अनुपमाला विजेतेपदासाठी करावा लागलेला संघर्ष हा अंतिम लढतीच्या निर्णयातील महत्त्वाचा फरक ठरला. मिथुनने मध्य प्रदेशाच्या प्रियांशु राजावतचा२१-१६, २१-११ असा सहज पराभव केला. महिला एकेरीत अनुपमाने छत्तीसगडच्या आकर्षि कश्यपचे आव्हान २०-२२, २१-१७, २४-२२ असे तीन गेमच्या लढतीत मोडून काढले.
  • कारकीर्दीत श्रीकांतवर दुसऱ्यांदा विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या मिथुनने अंतिम लढतीत थॉमस चषक विजेत्या संघातील प्रियांशु राजावतविरुद्ध एकतर्फी वर्चस्व राखले. राष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीकांतवर विजय मिळविल्यावर मिथुनने अंतिम लढतीत विजेतेपदाच्या निर्धारानेच खेळ केला. पहिल्या गेममध्ये आघाडीनंतर गेमच्या मध्याला एका गुणाने मागे पडल्यानंतरही उत्तरार्धात मिथुनने आक्रमक खेळ करताना प्रियांशुवर दडपण आणले आणि पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममधील मिथुनचे वर्चस्व लक्षणीय होते. मिथुनच्या वेगवान आणि आक्रमक फटक्यांना प्रियांशु उत्तर देऊ शकला नाही. दुसऱ्या गेमच्या मध्यात ११-८ अशा आघाडीनंतर मिथुनने उत्तरार्धात प्रियांशुला केवळ तीनच गुणांची कमाई करून दिली यावरूनच त्याच्या एकतर्फी वर्चस्वाची कल्पना येते.
  • महिला एकेरीत अनुपमाने १ तास १८ मिनिटांच्या कडव्या प्रतिकारानंतर सामना जिंकला. फटक्यांवर राखलेले अचूक नियंत्रण आणि फटक्यांची अचूक दिशा ही अनुपमाच्या खेळाची ताकद ठरली. या जोरावरच पहिली गेम गमावल्यानंतरही अनुपमाने विजेतेपद मिळवले. तिसऱ्या निर्णायक गेमला मात्र आकर्षिने अगदी अखेरच्या टप्प्यात आपला खेळ उंचावल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली होती. त्यामुळे ४-२, १०-६, ११-६, १५-१० अशा आघाडीनंतरही आकर्षिने सलग पाच गुण घेत पिछाडी भरून काढत १९व्या गुणाला बरोबरी साधून एकवेळ २०-१९ अशी आघाडी घेतली. मात्र, मॅचपॉइंट साधण्यात आकर्षिला अपयश आले. निर्णायक क्षणी सामना पुन्हा २०-२० असा बरोबरीत आला. यावेळी अनुपमाने संयमाने दोन गुण मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
  • मिश्र दुहेरीत हेमनागेंद्र बाबू आणि कनिका कन्वल या रेल्वेच्या जोडीने तेलंगणाच्या सिद्धार्थ एलान्गो आणि दिल्लीच्या खुशी गुप्ता जोडीचा
  • २१-१७, २१-१६ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. महिला दुहेरीत अव्वल मानांकित केरळची ट्रिसा जॉली आणि तेलंगणाच्या गायत्री गोपीचंद जोडीने दिल्लीच्या काव्या गुप्ता-दीपशिखा सिंगला संधीच मिळू दिली नाही. ट्रिसा-गायत्रीने २१-१०, २१-९ अशी अंतिम लढत सहज जिंकली. पुरुष दुहेरीत कर्नाटकच्या कुशल-प्रकाश राज जोडीने महाराष्ट्राच्या दीप रामभिया-अक्षन शेट्टी जोडीचे आव्हान ८-२१, २१-१९, २१-८ असे संपुष्टात आणले.

झळांचा कहर! फेब्रुवारी २०२३ ठरला १२२ वर्षांमधला सर्वात उष्ण महिना

  • फेब्रुवारी २०२३ हा मगाच्या १२२ वर्षांमधला सर्वात उष्ण महिना ठरला आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये अंगाची लाही होऊ लागलीच होती. फेब्रुवारी महिन्यातच एप्रिल-मे सारखं वातावरण जाणवत होतंच अशात आता IMD ने दिलेल्या महितीनुसार १२२ वर्षांमध्ये हा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १९०१ नंतर फेब्रुवारीत पहिल्यांदाच पारा इतका वाढला की १२२ वर्षात हा महिना इतका उष्ण ठरला आहे. १९८१ ते २०१० या कालावधीत वाढलेलं तापमान हे सर्वसाधारण होतं.
  • देशाच्या अनेक भागांमध्ये अधिक तीव्रतेच्या तापमानाची नोंद होते आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जेवढं तापमान असते ते तापमान फेब्रुवारीतच वाढल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही पाच दिवसांपूर्वी हेदेखील हवामान विभागाने हे स्पष्ट केलं होतं की पुढील पाच दिवसांमध्ये वायव्य, मध्य आणि पूर्व भारतातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान हे तीन ते पाच अंशांनी जास्त असणार आहे. पाच दिवसांपूर्वी हा इशारा दिलेला असतानाच आता ही माहिती समोर आली आहे.
  • १९८१ ते २०२० या तीस वर्षांच्या कालावधीत फेब्रुवारी महिन्यात भारतात तापमान किती होते? याच्या तपशीलावर नजर मारली असता असे निदर्शनास येते की मागचे तीस वर्ष फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान हे २८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहत होते. तर किमान तापमान हे १५ अंशांच्या आसपास राहायचे. ही आकडेवारी आतापर्यंत सामान्य मानली जात होती. अर्थात प्रत्येक प्रदेशानुसार या आकडेवारीत थोडेफार बदल व्हायचे. वायव्य, पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये सामान्य तापमान अधिक असते.

Lionel Messi ने जिंकला Fifa सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब: Kylian Mbappe चा पराभव करत रोनाल्डोच्या विक्रमाची केली बरोबरी

  • अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू आणि विश्वचषक विजेता लिओनेल मेस्सीला फिफाचा पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळाला आहे. त्याचबरोबर महिला गटात स्पेनच्या अलेक्सिया पुटेलासने ही कामगिरी केली. पुटेलासने २०२२ मध्ये बॅलन डी’ओर जिंकला.
  • पॅरिसमधील सल्ले येथे झालेल्या समारंभात मेस्सी म्हणाला की, ”एवढ्या मोठ्या संघर्षानंतर त्यामागे जाऊन आणि खूप मेहनत घेतल्यानंतर माझे स्वप्न पूर्ण करणे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.” मात्र, फ्रान्सच्या एम्बाप्पेलाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मात्र मेस्सीने त्याला येथेही हरवून हा पुरस्कार पटकावला. सर्वोत्तम खेळाडूसाठी मेस्सीला एम्बाप्पेपेक्षा सर्वाधिक मते मिळाली.
  • यादरम्यान मेस्सी म्हणाला की, ”ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात सुंदर गोष्ट आहे. हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि फार कमी लोक ते पूर्ण करू शकतात. मी हे करू शकलो, त्यासाठी देवाचे आभार.” मेस्सीचा देशबांधव लिओनेल स्कालोनी याने वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक आणि एमिलियानो मार्टिनेझने वर्षातील सर्वोत्तम गोलकीपरचा पुरस्कार जिंकला. त्यांच्या समर्थकांना सर्वोत्कृष्ट चाहत्यांचा पुरस्कार देखील मिळाला, तर इंग्लंडला महिला युरो २०२२ चषकाने पुरस्कृत करण्यात आले.
  • राष्ट्रीय संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या जागतिक पॅनेलद्वारे, फिफाच्या २११ सदस्य देशांपैकी प्रत्येकी निवडलेल्या पत्रकारांनी आणि ऑनलाइन चाहत्यांनी केलेल्या मतदानाद्वारे तीन खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली होती. ३५ वर्षीय मेस्सीने फिफाद्वारे विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या गोल्डन बॉल ट्रॉफीच्या शर्यतीत एम्बाप्पेचा पराभव केला.

“अंबानी कुटुंबीयांना विदेशातही Z+ सुरक्षा द्या, या सुरक्षेचा खर्च…”, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश

  • जगातील सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत नुकतेच गौतम अदाणींना मागे टाकत मुकेश अंबानींनी अव्वल स्थान पटकाववंल आहे. त्यामुळे साहजिकच मुकेश अंबानी हे देशातील एक महत्त्वाचे व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा मानला जातो. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला आव्हान देणाऱ्या अर्जावरील सुनावणीदरम्यान यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. त्यानुसार मुकेश अंबानी यांना फक्त महाराष्ट्र किंवा भारतातच नाही, तर जगभरात सर्वोच्च दर्जाची सुरक्षा दिली जावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
  • नेमकं प्रकरण काय – मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी आणि त्यांची तीन मुलं आकाश, अनंत आणि इशा यांना आलेल्या धमकी प्रकरणातील मूळ कागदपत्र आणि पुरावे सादर करण्याचे निर्देश नुकतेच त्रिपुरा उच्च न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले होते. या प्रकरणी केंद्राकडून विशेष सुट्टीकालीन याचिकाही करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने त्रिपुरा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण निकाली काढत याबाबत अंतिम आदेश दिले आहेत.
  • काय आहेत आदेश – न्यायालयाने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना देशातील सर्वोच्च दर्जाची अर्थात Z+ सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, ही सुरक्षा फक्त मुंबईपुरतीच मर्यादीत न ठेवता भारतभर आणि जगात सगळीकडे पुरवण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रात ही सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, तर भारतभर आणि जगात जिथे जिथे ते जातील, त्या सर्व ठिकाणी ती सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची असेल, असंही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केलं आहे.
  • खर्च कोण करणार – फक्त मुंबईपुरती सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी कमी खर्चिक असली, तरी जगभरात सर्वोच्च दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा खर्च मोठा आहे. मात्र, हा खर्च अंबानी कुटुंबीय करतील, असं न्यायालयाने नमूद केलं आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा पूर्ण खर्च हा तेच करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

PLI Scheme: लेऑफचे काय घेऊन बसलात ? सरकारच्या ‘या’ स्कीममुळे Apple ने भारतात निर्माण केल्या तब्बल १ लाख नोकऱ्या, जाणून घ्या

Apple ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय हे अमेरिकेमध्ये असून, सध्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत या कंपनीमधून हजारो कमर्चाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. मात्र टेक्नॉलॉजी कंपनी असणाऱ्या Apple ने भारतामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.

Apple ने भारतामध्ये गेल्या १९ महिन्यांमध्ये तब्बल १ लाख नवीन नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. यानंतर ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये ब्ल्यू कॉलर जॉबची सर्वात मोठी निर्माती बनली आहे. भारतातील एक लाख नोकऱ्या या Apple च्या भारतातील प्रमुख विक्रेते आणि त्यांच्या पुरवठादारांनी निर्माण केल्या आहेत. एका अहवालातून ही बाब समोर आली आहे.

वानखेडेत सचिन तेंडुलकरचा भव्य पुतळा पुतळा बसवला जाणार:

  • सचिन तेंडुलकरने भारतासाठी खेळताना ज्या मैदानात यशाची अनेक शिखरे जिथे पादाक्रांत केली अशा वानखेडे स्टेडियममध्ये आता क्रिकेटच्या देवाचा एक भव्य दिव्य पुतळा बसवला जाणार आहे.
  • क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेतल्यानंतर 10 वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • 24 एप्रिलला, तेंडुलकरच्या 50व्या वाढदिवसाला किंवा वर्षाच्या अखेरीस 50 षटकांच्या विश्वचषकादरम्यान या पुतळ्याचे अनावरण केले जाईल.
  • वानखेडे स्टेडियममध्ये सध्या सचिनचे नाव असलेले स्टँड आहे.
  • एमसीएने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना कॉर्पोरेट बॉक्स आणि फलंदाजीतील दिग्गज दिलीप वेंगसरकर यांच्या नावाचा स्टँड उभारून त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होत.
  • मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दिवंगत शेन वॉर्नचा क्रिकेटपटूंचा सर्वात प्रसिद्ध पुतळा आहे.

न्यूझीलंडने एका धावेने विजय मिळवत रचला इतिहास:

  • न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा शानदार पराभव करून इतिहास रचला आहे.
  • त्याचबरोबर इंग्लंडचा 146 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे.
  • तसेच मालिकेत 1-1 अशी बरोबरीत साधली.
  • कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावांनी सामना जिंकणारा न्यूझीलंड हा जगातील दुसरा संघ ठरला आहे.
  • यापूर्वी 1993 मध्ये अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1 धावेने विजय मिळवून वेस्ट इंडिजने हा विक्रम केला होता.
  • तब्बल 30 वर्षांनंतर न्यूझीलंडने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय नोंदवून या यादीत आपले नाव नोंदवले आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.