२ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |2 March 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२ मार्च चालू घडामोडी

सुनियोजित शहरे देशाचे भवितव्य : मोदी

 • ‘‘सुनियोजित भारतीय शहरे देशाचे भवितव्य ठरवतील. स्वातंत्र्यानंतर ७५ नियोजित शहरे विकसित केली असती तर आज भारताचे जगात वेगळे स्थान झाले असते,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. अर्थसंकल्पानंतर आयोजित ‘वेबिनार’ मालिकेतील ‘शहरी नियोजन, विकास आणि स्वच्छता’ या विषयावरील चर्चेदरम्यान ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत देशात केवळ एक किंवा दोनच नियोजित शहरे विकसित झाली आहेत.
 • मोदी म्हणाले, की भारतात झपाटय़ाने होत असलेल्या शहरीकरणामुळे पायाभूत सुविधा निर्माण करणेही महत्त्वाचे आहे. भारतातील सुनियोजित शहरेच देशाचे भवितव्य ठरवतील. जेव्हा नियोजन चांगले असेल तेव्हा आपली शहरे हवामानास अनुकूल व पुरेशा पाण्याची उपलब्धता असणारे सुसह्य ठिकाणे होतील.
 • मोदींनी यावेळी शहरी नियोजन आणि विकासासाठी विशेष लक्ष द्यावयाच्या तीन क्षेत्रांचा उल्लेख केला. त्यानुसार राज्यांत शहरी नियोजन परिसंस्था तंत्र मजबूत कसे करावे, शहरी नियोजनासाठी खासगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या कौशल्याचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग कसा करता येईल व शहरी नियोजनास नव्या उंचीवर घेऊन जातील अशा उत्कृष्ट केंद्रांचा विकास कसा करता येईल, यावर मोदींनी भर दिला.

‘भारत संशोधनाचे केंद्र होऊ शकतो’,करोना साथीचा आरोग्य यंत्रणेला फटका – बिल गेट्स

 • जागतिक आरोग्याच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांत झालेली सुधारणा करोना साथीच्या पहिल्या २५ आठवडय़ांनी नष्ट केली. आता तीन वर्षांनंतरही अनेक देशांच्या आरोग्य यंत्रणा अद्याप पूर्णत: रुळावर आलेल्या नाहीत, असे प्रतिपादन बिल गेट्स यांनी बुधवारी केले. ही महासाथ भारतातील आरोग्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी उत्प्रेरक ठरल्याचेही ते म्हणाले.
 • लस निर्मितीमधील विक्रमी कामगिरी आणि सार्वजनिक क्षेत्रात डिजिटल प्रणालीच्या प्रभावी वापरामुळे ‘सृजनशीलता आणि कल्पकता’ याचे जागतिक केंद्र होण्याची क्षमता भारताने सिद्ध केली असून गंभीर समस्यांचा सामना करण्यासाठी नव्या जागतिक सहकार्य युगाचा दूत भारत होऊ शकतो, असे गेट्स म्हणाले. पाचव्या ‘रामनाथ गोएंका स्मृती व्याख्याना’मध्ये ते बोलत होते.
 • जगाला विभाजित करणाऱ्या घटनांमधला दुवा होण्यासाठी नाविन्याची गरज आणि त्यात भारताची भूमिका विषद करताना गेट्स म्हणाले, की मी मायक्रोसॉफ्टमध्ये असताना १९९८ साली आम्ही येथे एक विकासकेंद्र स्थापण्याचा निर्णय घेतला. आम्ही हे केले, कारण भारत आगामी काळात मोठी भूमिका बजावणार आहे आणि केवळ नव्या शोधांचे लाभार्थी म्हणून नव्हे, तर स्वत: संशोधन हे आम्हाला माहिती होते.
 • चांगल्या दर्जाच्या आणि तरीही सर्वाना परवडण्याजोगी निर्मिती आणि त्याचा जलदगतीने स्वीकार भारत करू शकतो आणि लसी हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. वातारवण बदल, आरोग्य यासारख्या जागतिक आव्हानांमध्ये भारताला मोठी भूमिका बजावायची असल्याचे गेट्स यांनी नमूद केले. यासाठी भारतात संशोधन झालेले आणि जगभरात प्रभावी ठरलेली रोटाव्हायरस लस, जैवइंधन आणि खतांमधील संशोधन त्यांनी अधोरेखित केले.

बोर्डाच्या परीक्षेला आज होणार सुरुवात, परीक्षेला जाण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ मार्गदर्शक तत्त्वे

 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (MSBSHSE) २०२२-२३ शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या परीक्षेची सुरुवात उद्या (२ मार्च २०२२) पासून होणार आहे. या परीक्षेची सुरुवात प्राथमिक भाषेच्या पेपरने होणार आहे. उद्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी या भाषांमध्ये हजारो विद्यार्थी पेपर देणार आहेत. तसेच जर्मन, फ्रेंच या विषयांसाठी द्वितीय किंवा तृतीय भाषेची परीक्षाही उद्याच होणार आहे. २ मार्च ते २५ मार्च असा या परीक्षेतचा कालावधी आहे. दहावीचे वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वपूर्ण असते.  या परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून असते. 
 • महाराष्ट्र राज्य बोर्डाची दहावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहेत. यानुसार SSCची परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी सकाळी ११ वाजता पेपर देतील, तर उरलेले विद्यार्थी दुपारी ३ वाजता परीक्षेला बसणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या ३० मिनिटांपूर्वी परीक्षा केंद्रात हजर राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडे शाळेचे ओळखपत्र आणि  MSBSHE दहावीचे प्रवेशपत्र अनिवार्य आहे. याशिवाय त्यांना परीक्षेला बसता येणार नाही. तीन तासांच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये अधिक दहा मिनिटे जोडण्यात आली आहेत. परीक्षा देणाऱ्यांनी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी शिक्षण मंडळाने या दहा मिनिटांमध्ये वेळ दिला आहे. 
 • यंदाची एसएससीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण मंडळाने काही योजना आखल्या आहेत. कॉपीमुक्त परीक्षा या मोहिमेअंतर्गत, दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या काळात परीक्षा केंद्रांच्या ५० मीटरच्या परिसरातील फोटोकॉपीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय गैरप्रकार घडू नये म्हणून केंद्रांभोवती पोलिस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

बीआरएसने महाराष्ट्रात सहा विभागीय समन्वयक नेमले

 • तेलंगना राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसने महाराष्ट्रात सहा विभागीय समन्वयक नेमले आहेत, अशी माहिती चेन्नुरचे आ.बी. सुमन यांनी दिली. या समन्वयकांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भारत राष्ट्र समितीने जाळे विणन्याचे काम करावे, अशी सूचना पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे.
 • भारत राष्ट्र समितीच्या हैद्राबाद येथील मुख्य कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बीआरएसने नाशिक विभागाच्या समन्वयकपदी दशरथ सावंत (अहमदनगर), पुणे विभागाच्या समन्वयकपदी बाळासाहेब जयराम देशमुख (पुणे), मुंबई विभागाच्या समन्वयकपदी विजय तानाजी मोहिते (रायगड), औरंगाबाद विभागाच्या समन्वयकपदाची जबाबदारी अहमदनगरचे सोमनाथ थोरात यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच अमरावती विभागाचे समन्वयक म्हणून निखील देशमुख (अमरावती) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या स्वाक्षरीनिशी महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, मुंंबई, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या विभागातील समन्वयकांची घोषणा करण्यात आली आहे. जहिराबादचे खा. बी.बी.पाटील, चेन्नूरचे आ.बलकासुमन, बोधनचे आ.शकिल,भारत राष्ट्र समितीचे किसान सेल महाराष्ट्र अध्यक्ष माणिक कदम यांच्यासह इतरांनी समन्वयक निवडीसाठी मोलाची भूमिका घेतली.

मुंबई इंडियन्सच्या महिला संघाचे हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व

महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या हंगामासाठी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरकडे मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.हरमनप्रीतने नुकतेच १५० आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने पूर्ण केले. गेल्या दशकभरात भारतीय संघाने मिळवलेल्या यशात हरमनप्रीतने महत्त्वाचे योगदान दिले आहे. अर्जुन पुरस्कारप्राप्त हरमनप्रीतच्या नावे महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक नाबाद १७१ धावांचा विक्रमही आहे.

डायबिटीज, ब्लड प्रेशरच्या औषधांच्या दरांची केली निश्चिती:

 • केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA) या विभागाने मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांवर घेतल्या जाणाऱ्या 74 औषधांचे दर निश्चित केले आहेत.
 • या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांच्या आधारे ऑर्डर 2013 अंतर्गत किरकोळ औषधांच्या किंमती निश्चित केल्या गेल्या.
 • National Pharmaceutical Pricing Authority म्हणजेच NPPA या विभागाने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहावे यासाठी घेतल्या जाणाऱ्या Dapagliflozin, Sitagliptin आणि मधुमेहावरील Metformin Hydrochloride यांच्या एका टॅब्लेटची किंमत 27.75 रुपये असेल अशी घोषणा करण्यात आली.
 • तसेच उच्च रक्तदाबावर उपयुक्त असलेल्या Telmisartan, Bisoprolol Fumarate या औषधांची किंमतही कमी करण्यात आली आहे.
 • प्राधिकरण विभागाने 80 अधिसूचित केलेल्या औषधांच्या दरांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
 • न्युट्रोपेनिया आणि एपिलेप्सी अशा आजारांवर उपचार म्हणून दिल्या जाणाऱ्या औषधांचाही या यादीमध्ये समावेश आहे.

सातव्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत वाढणार पगार:

 • केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत पगार वाढ, महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मिळण्याची शक्यता आहे.
 • सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो.
 • मार्च 2023 मध्ये यामध्ये सुधारणा केल्याने होळीनंतर सरकारद्वारे या संबंधित अधिकृत घोषणा होऊ शकते असे म्हटले जात आहे.
 • 8 मार्च पर्यंत महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरमझ्ये सुधारणा करण्याचा सरकारचा मानस आहे.
 • सध्या कॉमन फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के इतका आहे.

5G च्या लॉन्चिंगनंतर भारताचा Download Speed पोहोचला 115 टक्क्यांवर:

 • देशभरात सध्या अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपली 5 जी सर्व्हिस सुरु केली आहे.
 • देशाच्या अनेक शहरांमध्ये 5जी नेटवर्क सुरु झाले आहे.
 • सध्या नेटवर्क स्पीड टेस्ट साईट असणाऱ्या Ookla च्या नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये भारतात 5 जी सर्व्हिस अत्यंत वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे.
 • स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये भारताची स्थिती मजबूत होताना दिसत आहे.
 • जानेवारी 2023 मध्ये भारत हा 69 व्या स्थानावर होता परंतु भारतात 5जी च्या वेगामुळे भारत 49 व्या स्थानावर पोहोचला आहे.
 • या आकडेवारीवरून भारत आता रशिया आणि अर्जेटिना सारख्या G20 राष्ट्रांच्याही पुढे गेला आहे.

तिहेरी उडीपटू ऐश्वर्यावर चार वर्षांची बंदी:

 • भारताची आघाडीची तिहेरी उडीपटू ऐश्वर्या बाबूवर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (नाडा) शिस्तपालन समितीने चार वर्षांची बंदी घातली आहे.
 • गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या चाचणीत ऐश्वर्याने ‘ओस्टारीन’ या बंदी घातलेल्या उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले होते.
 • ऐश्वर्याला 13 फेब्रवारी रोजी ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीकडून बंदीचे पत्र मिळाले होते.
 • ऐश्वर्या गेल्या वर्षी बर्मिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार होती, परंतु जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) बंदी घातलेले उत्तेजक द्रव्य शरीरात आढळल्याने ऐश्वर्या आणि धावपटू एस. धनलक्ष्मी यांना राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या भारतीय चमूतून वगळण्यात आले होते.

अश्विन अण्णा ठरला टेस्टमध्ये नंबर 1 गोलंदाज:

 • भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने ताज्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे.
 • त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला मागे टाकत नंबर-1 कसोटी अव्वलस्थान पटकावला आहे.
 • आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली होती, ज्याचा त्याला ताज्या क्रमवारीत फायदा झाला आहे.
 • आर अश्विन 2015 मध्ये प्रथमच नंबर-1 कसोटी गोलंदाज बनला आणि त्यानंतर तो या खुर्चीवर अनेकदा बसला आहे.
 • त्याचवेळी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह एका स्थानाच्या फायदा घेऊन चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
 • अशाप्रकारे ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत तीन भारतीय गोलंदाजांचा टॉप-10 मध्ये समावेश करण्यात आला आहे.

फ्रान्सचे माजी फुटबॉलपटू जस्ट फॉन्टेन यांचे निधन:

 • फ्रान्सचे माजी दिग्गज फुटबॉलपटू, 1958च्या विश्वचषक स्पर्धेत विक्रमी 13 गोल झळकावणारे जस्ट फॉन्टेन यांचे बुधवारी निधन झाले.
 • स्वीडन येथे झालेल्या 1958 सालच्या विश्वचषक स्पर्धेसाठी फॉन्टेन यांचा अखेरच्या क्षणी फ्रान्सच्या संघात समावेश करण्यात आला होता.
 • मात्र, या स्पर्धेच्या सहा सामन्यांत त्यांनी 13 गोल झळकावले आणि एका विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावे केला.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.