५ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
५ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 5 September 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

_

५ सप्टेंबर चालू घडामोडी

दुबई खुली बुद्धिबळ स्पर्धा – प्रज्ञानंदला नमवत अरविंद विजेता:

  • आर. प्रज्ञानंदला अखेरच्या फेरीत पराभूत करत भारताच्या २२ वर्षीय अरविंद चिथंबरमने दुबई खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
  • अरविंदने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने आठव्या फेरीत अर्जुन इरिगेसीवर मात करत गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले होते. या पराभवामुळे इरिगेसीची सलग २९ सामने अपराजित राहण्याची मालिका खंडित झाली. मग नवव्या फेरीत अरिवदने प्रज्ञानंदला नमवत जेतेपद निश्चित केले.
  • स्पर्धेअखेरीस ग्रँडमास्टर अरिवदच्या खात्यावर ७.५ गुण होते. प्रज्ञानंदला सात गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तसेच इरिगेसीने (६.५ गुण) संयुक्तरीत्या तिसरे स्थान मिळवले.

राज्यातील ३१ गावे बँक व्यवहाराविना ; राज्यस्तरीय समितीसमोर लवकरच चर्चा:

  • केंद्र सरकार ‘डिजिटल’ व्यवहारासाठी आग्रही असतानाच राज्यातील ३१ गावांमध्ये अद्याप बँक व्यवहारच होत नाहीत. या संदर्भातील आकडेवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीसमोर ठेवण्यात आली आहे.
  • राज्यातील १ हजार ८०० गावांमध्ये बँका पोहोचल्याच नाहीत काय, असा प्रश्न अलीकडेच मुख्य सचिवांनी उपस्थित करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने ५६ गावांची यादी राज्य सरकारला पाठविली आणि त्यातील ३१ गावांमध्ये अजूनही व्यवहारालाही बँक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत हा मुद्दा तिसऱ्या क्रमांकावर चर्चेत ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 
  • बँकच नसल्याने डिजिटल बँक, डिजिटल रुपया, व्यवहारातील पारदर्शकता हे ओघानेच येणारे विषय अनेक गावांत नाहीत. अनेक गावांत बँक प्रतिनिधी असले तरी आंतरजाल सुरू राहण्यासाठी आवश्यक असणारी ‘रेंज’च उपलब्ध नसल्याने व्यवहार काही पुढे सरकत नाहीत.
  • सार्वजनिक बँकांच्या शाखांची संख्या दोन वर्षांत मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. २०१९ मध्ये सार्वजिक बँकांची संख्या आठ हजार ५९४ होती. आता ती घसरून सात हजार ६३२  आहे. गेल्या काही दिवसांत बँकांचे विलीनीकरण झाल्यानेही ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. बँक ऑफ बडोदामध्ये देना आणि विजया या बँकांचे विलीनीकरण झाले. सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकेत विलीन झाली तसेच इंडियन बँकेत अलाहबाद बँकचे विलीनीकरण झाले. त्यामुळेही शाखा कमी झाल्याचे सांगण्यात येते. एक बाजूला व्यवहार ‘डिजिटल’ करा असा आग्रह असताना सुमारे १ हजार ८०० बँकांचे व्यवहार रडतखडत सुरू आहेत. तर ३१ गावांत बँक व्यवहाराच होत नाहीत. त्यावर सोमवारी बैठकीत चर्चा होईल असे सांगण्यात येते.

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन, पालघरमध्ये अपघातात ओढवला मृत्यू:

  • टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे.
  • दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारासा सूर्या नदीवरील पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
  • पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला.
  • अपघातात दोघे जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ही मर्सिडीज कार होती. गाडीचा क्रमांक MH-47-AB-6705 असा आहे. पुढील प्रक्रिया सध्या सुरु आहे”. दुभाजकाला गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

विश्लेषण : कुर्की म्हणजे काय? शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरणाऱ्या कायद्याचं पंजाबमधील भीषण वास्तव काय आहे:

  • पंजाबमधील ६५ वर्षीय शेतकरी बलविंदर सिंग यांनी २९ ऑगस्ट रोजी मुक्तसर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्महत्या केली आहे. त्यांनी स्थानिक सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. पण या कर्जाची परतफेड करण्यास ते असमर्थ ठरले होते. त्यामुळे स्थानिक सावकारानं त्यांच्याविरोधात कुर्की अंतर्गत न्यायालयीन खटला दाखल केला होता. त्यामुळे बलविंदर सिंग हे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत होते. दरम्यान, त्यांनी २९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. पंजाबमध्ये कुर्कीचा मुद्दा सध्या खूपच चर्चेत आहे. कुर्की म्हणजे काय? आणि कुर्की कायद्याचं भीषण वास्तव नेमकं काय आहे, याचं विश्लेषण करणारा हा लेख.
  • कुर्की म्हणजे काय – कुर्की म्हणजे एखाद्या शेतकऱ्याची जमीन, कर्ज देणाऱ्या संस्थेकडे किंवा व्यक्तीकडे गहाण ठेवणे. संबंधित शेतकरी कर्जाची परतफेड करू शकला नाही, तर संबंधित जमीन कुर्कीअंतर्गत जप्त केली जाते. बँकांशिवाय खासगी सावकार, कमिशन एजंट यांच्या पैशांसाठी शेतकऱ्यांविरुद्ध अशाप्रकारचे आदेश काढले जातात.
  • कुर्की कायद्याची अंमलबजावणी कशी केली जाते – सिव्हिल प्रोसिजर कोड -१९०८ च्या कलम ६० अन्वये कुर्की आदेश अंमलात आणला जातो. या कलमान्वये शेतकर्‍याची गहाण ठेवलेली जमीन बँकेच्या किंवा सावकाराच्या नावावर नोंदवली जाते. काही ठिकाणी अशा जमिनीचा लिलाव केला जातो. शेतकरी कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यास सावकार न्यायालयातून कुर्की आदेश मिळवू शकतो. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर कुर्की प्रक्रिया सुरू होते. या कलमाअंतर्गत शेतकऱ्यांची जमीन किंवा ट्रॅक्टर गहाण ठेवला जाऊ शकतो.
  • पंजाबमध्ये कुर्की कायद्यावर बंदी नव्हती का – पंजाबमध्ये यापूर्वी सत्तेत असणाऱ्या अकाली दल आणि काँग्रेस या दोन्ही सरकारांनी कुर्कीवर बंदी घातल्याचा दावा केला आहे. ‘कर्ज कुर्की खतम, फसल दी पुरी रकम’ (karza kurki khatam, fasal di poori rakam) या घोषणेवर काँग्रेसने २०१७ ची विधानसभा निवडणूक लढवली होती.

के. के. शैलेजा यांनी नाकारला प्रतिष्ठित ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार, ‘या’ कारणासाठी नाकारला सन्मान:

  • केरळच्या माजी आरोग्य मंत्री के. के. शैलेजा यांनी प्रतिष्ठित ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार नाकारला आहे. करोना आणि निपाह विषाणूच्या प्रसारादरम्यान केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना २०२२ सालाचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार देण्यात येणार होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या CPI(M) नेत्या शैलेजा यांनी पक्षाशी चर्चा केल्यानंतर या संदर्भात निर्णय घेतला आहे. या पुरस्काराला आशियाचा नोबल पुरस्कार असे देखील संबोधले जाते.
  • २०१६ ते २०२१ या कालावधीत शैलेजा केरळच्या आरोग्य मंत्री होत्या. याच काळात देशभरासह केरळात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार झाला होता. केरळमध्ये करोनाचा प्रसार रोखण्यासाठी शैलेजा यांचे मोठे योगदान आहे.
  • फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. “मॅगसेसे हे कम्युनिस्ट विरोधी होते. एक व्यक्ती म्हणून माझा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. मात्र मी एक राजकारणी असल्यामुळे यासंदर्भात पक्षाशी चर्चा केली. त्यानंतरच हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार करण्यात आला, याबाबत मी पुरस्कार समितीची आभारी आहे”, अशी प्रतिक्रिया शैलेजा यांनी दिली आहे.
  • “मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीची सदस्य आहे. हा एक मोठा पुरस्कार असला तरी तो एका गैर सरकारी संस्थेकडून देण्यात येतो. ही संस्था सामान्यत: कम्युनिस्टांच्या तत्वांचे समर्थन करत नाही”, असेही शैलजा म्हणाल्या आहेत. ‘रॅमन मॅगसेसे’ हा आशियातील सर्वोच्च पुरस्कार आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना १९५७ पासून हा पुरस्कार देण्यात येतो.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 5 सप्टेंबर 2022 रोजी चार दिवसांच्या दौऱ्यावर नवी दिल्लीत आल्या. या दौऱ्यात त्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

५ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.