५ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
५ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 5 December 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

५ डिसेंबर चालू घडामोडी

सुंदर पिचाईंना ‘पद्म भूषण’ प्रदान:

 • गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म भूषण’ प्रदान करण्यात आला.
 • भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्या हस्ते व्यापार आणि उद्योग प्रकारात 2022 या वर्षासाठी पिचाई यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • यावर्षीच्या सुरवातीला ‘पद्म भूषण’ पुरस्कारासाठी 17 दिग्गजांची नावं सरकारकडून घोषित करण्यात आली होती.
सुंदर पिचाईं

अंदमानच्या बेटांना ‘परमवीर चक्र’ विजेत्यांची नावे:

 • केंद्र सरकारने अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील 21 निर्मनुष्य बेटांना देशाचा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार असलेल्या ‘परमवीर चक्र’प्राप्त शूर सैनिकांची नावे दिली आहेत.
 • या 21 बेटांपैकी 16 उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यात आहेत, तर पाच बेटे दक्षिण अंदमानमध्ये आहेत.
 • अंदमान-निकोबार बेटांचे खासदार कुलदीप राय शर्मा यांनी संरक्षण व स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने या शूर सैनिकांची नावे 21 बेटांना नाव देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले.
 • उत्तर व मध्य अंदमानमधील ‘आयएनएएन 370’ क्रमांकाच्या पहिल्या निर्जन बेटाला मेजर सोमनाथ शर्माचे नाव देण्यात आले. आता ते ‘सोमनाथ द्वीप’ म्हणून ओळखले जाईल.
 • ‘आयएनएएन 308’ क्रमांकाच्या बेटाला ‘करमसिंग द्वीप’ असे नाव देण्यात आले.
 • तसेच मेजर राम राघोबा राणे, नाईक जदुनाथसिंग, कंपनी हवालदार मेजर पिरूसिंग शेखावत, कॅप्टन गुरबचनसिंग सलारिया, लेफ्टनंट कर्नल धनसिंग थापा मगर, सुभेदार जोगिंदर सिंग साहनन, मेजर शैतानसिंग भाटी, कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुजरेरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, कर्नल होशियार सिंग दहिया, सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मल जीतसिंग सेखोन, मेजर रामस्वामी परमेश्वरन, कॅप्टन बाणा सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज कुमार पांडे आणि सुभेदार मेजर संजय कुमार या सर्व परमवीर चक्राने सन्मानित योद्धय़ांची नावे या बेटांना देण्यात आली आहेत.

बांगलादेशचा भारतावर रोमहर्षक विजय:

 • शकिब अल हसनची प्रभावी गोलंदाजी आणि त्यानंतर मेहदी हसन मिराज-मुस्तफीझूर रहमान यांच्यातील अखेरच्या गडय़ासाठी झालेल्या अविश्वसनीय 51 धावांच्या भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा एक गडी आणि 24 चेंडू राखून पराभव केला.
 • प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताचा डाव 41.2 षटकांत 186 धावांत संपुष्टात आला.

कर्णधार रोहित शर्माने मोडला ‘या’ दिग्गज खेळाडूचा विक्रम:

 • बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात येताच रोहित शर्माने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला.
 • वास्तविक, आता रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अझहरने केलेल्या धावांचा आकडा पार करण्यात यश मिळवले आहे.
 • मोहम्मद अझरुद्दीनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9376 धावा केल्या आहेत, तर आता रोहित त्याच्या पुढे गेला असून त्याने बाद होण्याआधी पर्यंतच्या केलेल्या धावांचा विचार करता त्याने 9378 धावा केल्या.
 • मर्यादित षटकांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहितने सहावे स्थान पटकावताना मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले.

गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान:

 • गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी आज, सोमवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात भाजप, काँग्रेस, ‘आप’ आदी पक्षांसह अन्य पक्ष आणि अपक्ष मिळून ८३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
 • गेल्या निवडणुकीत या टप्प्यातील ९३ पैकी भाजपने ५१, तर काँग्रेसने ३९ जागांवर विजय मिळवला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला ६३.३१ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
 • गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाचा घसरलेला टक्का दुसऱ्या टप्प्यात वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गुजरातसह हिमाचल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ८ डिसेंबरला होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आई हिराबा यांची गांधीनगरमधील निवासस्थानी भेट घेतली.

चीनने ‘शून्य कोविड धोरण’ शिथिल केल्यास काय होणार:

 • चीन सरकारचे वादग्रस्त ‘शून्य कोविड धोरण’ आणि सरकार लागू करत असलेल्या लॉकडाऊनविरोधात देशभरात उसळलेला जनउद्रेक कायम असून हे आंदोलन थोपावण्याचे प्रयत्न सरकारकडून होत असताना, आता हे शून्य कोविड धोरण शिथिल करण्यासाठी सरकार पावलं उचलत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे काहीसा दिलासा आणि त्यासोबतच काहीशी वाढती धाकधूक अशी संमिश्र अवस्था असलेच्या चीनच्या नागरिकांचे आता या निर्णयाचे आरोग्यावर काय परिणाम होणार आणि वैद्यकीय व्यवस्थेवर काय परिणाम होणार याकडे लक्ष लागले आहे.
 • या पार्श्वभूमीवर संशोधकांनी विश्लेषण केले आहे की, जर हे पूर्णपणे उघडले तर देशात किती मृत्यू होऊ शकतात. कारण, देशातील लोकसंख्येच्या तुलनेत कमी असणासा लसीकरण दर आणि लोकांमधील प्रतिकारशक्तीचा अभाव हे सर्वात हे दोन अतिशय गंभीर मुद्दे आहेत. शुक्रवारपर्यंत चीनमध्ये ५ हजार २३३ कोविड संबंधित मृत्यू आणि लक्षणांसह ३३१,९५२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
 • दक्षिण-पश्चिम गुआंग्शी प्रदेशातील रोग नियंत्रण केंद्राचे प्रमुख झोउ जियाटोंग यांनी मागील महिन्या शांघाय जर्नल ऑफ प्रव्हेंटेव्ह मेडिसनने प्रकाशित केलेल्या एका पेपरमध्ये म्हटले होते की, मुख्य भूभाग असणाऱ्या चीनने जर हाँगकाँगप्रमाणेच कोविड प्रतिबंध कमी केले तर दोन दशलक्षाहून अधिक मृत्यूंना सामोर जावे लागू शकते. याशिवाय संक्रमण २३३ दशलक्षांपेक्षा जास्त प्रमाणात वाढू शकते, असाही अंदाज दर्शवला गेला आहे.
 • तर कमी लसीकरण आणि बूस्टर दर दर तसेच प्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे चीनने शून्य कोविड धोरण मागे घेतल्यास १.३ दशलक्ष ते २.१ दशलक्ष लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे ब्रिटिश वैज्ञानिक माहिती आणि विश्लेषण कंपनी एअरफिनिटीने सांगितले आहे.

सुंदर पिचाईंना ‘पद्म भूषण’ प्रदान; म्हणाले, “मी जिथं जातो, तिथं माझ्यासोबत भारत…”:

 • गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म भूषण’ प्रदान करण्यात आला. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्या हस्ते व्यापार आणि उद्योग प्रकारात २०२२ या वर्षासाठी पिचाई यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. “भारत हा माझाच एक भाग आहे. मी जिथं जातो, तिथं भारत माझ्यासोबत असतो”, अशी प्रतिक्रिया यावेळी पिचाई यांनी दिली.
 • यावर्षीच्या सुरवातीला ‘पद्म भूषण’ पुरस्कारासाठी १७ दिग्गजांची नावं सरकारकडून घोषित करण्यात आली होती. “मी या पुरस्कारासाठी भारतीय नागरिक आणि सरकारचा अत्यंत आभारी आहे. ज्या देशाने मला घडवलं, त्या देशाकडून हा सन्मान मिळणं माझ्यासाठी मोठी बाब आहे”, असं हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर ५० वर्षीय पिचाई म्हणाले. “शिक्षण आणि ज्ञानाची आवड असलेल्या कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो, हे माझं भाग्य आहे. माझ्या आवडीनुसार क्षेत्र निवडता यावं, यासाठी आई-वडिलांनी मोठा त्याग केला”, अशी भावना पिचाई यांनी यावेळी व्यक्त केली.
 • “गुगल आणि भारत यांच्यातील महान भागीदारी सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे. तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत”, असं यावेळी पिचाई यांनी सांगितलं. सॅन फ्रान्सिस्कोतील या पुरस्कार सोहळ्यात भारताचे वाणिज्यदूत टी. व्ही. नागेंद्र प्रसाद यांच्यासह पिचाई यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
 • पिचाई यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून अमर्यादीत शक्यता निर्माण केल्याचं सांगत संधू यांनी त्यांचा गौरव केला. “जगाच्या विविध भागांमध्ये डिजिटल साधने आणि कौशल्ये समाजाच्या सर्व घटकांना उपलब्ध करून देण्याच्या दिशेने ते प्रयत्न करत आहेत”, असं यावेळी संधू म्हणाले. गुगलने यावर्षी मशीन लर्निंगमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भाषांतर सेवेमध्ये आणखी २४ भाषांचा समावेश केला आहे. यामध्ये भारतातील आठ भाषांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाला नमवत अर्जेटिना उपांत्यपूर्व फेरीत:

 • लियोनेल मेसीच्या गोलमुळे अर्जेटिनाने ऑस्ट्रेलियावर २-१ अशा फरकाने विजय मिळवत ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मेसीने आपल्या कारकीर्दीतील १०००वा सामना खेळताना विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील आपला पहिला गोल झळकावला.ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्जेटिनाचा विजय सोपा नव्हता. अर्जेटिनाच्या विजयात गोलरक्षक एमी मार्टिनेजची भूमिका महत्त्वाची राहिली. त्याने सामन्याच्या अखेरच्या सेकंदांमध्ये शानदार बचाव करत सामना अतिरिक्त वेळेपर्यंत नेण्यापासून रोखला.
 • मेसीने सामन्याच्या ३५व्या मिनिटाला अर्जेटिनाला आघाडी मिळवून दिली. यानंतर ज्यूलियन अल्वारेझने (५७वे मि.) गोल करत अर्जेटिनाची आघाडी २-० अशी केली. सामन्याच्या ७७व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या पुनरागमनाच्या आशा निर्माण झाल्या, जेव्हा एंजो फर्नाडेझने स्वयंगोल करत आघाडी कमी केली. उपांत्यपूर्व फेरीत अर्जेटिनाचा सामना नेदरलँड्सशी होईल.
 • सामन्यात ०-२ अशा पिछाडीनंतर अखेरच्या २० मिनिटांमध्ये ऑस्ट्रेलियाने चांगला खेळ केला. ७७व्या मिनिटाला क्रेग गुडविनचा फटका अर्जेटिनाच्या फर्नाडेझला लागून गोल झाला. ऑस्ट्रेलियाने यानंतर आपले आक्रमण अधिक तीव्र केले. संघाला अखेरच्या काही मिनिटांमध्ये बरोबरी साधण्याची संधी होती. त्यांच्या गेरेंग कुओलचा फटका अर्जेटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझने रोखला. अर्जेटिनाला विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाकडून पराभूत व्हावे लागले. यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन केले आणि संघाने सलग तीन सामने जिंकले.
 • आपला पाचवा आणि संभवत: अखेरचा विश्वचषक खेळणाऱ्या मेसीच्या नावे ७८९ गोल आहेत. सात वेळा वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरलेल्या मेसीच्या नजरा १८ डिसेंबरच्या अंतिम सामन्याकडे आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये हजारो चाहत्यांची गर्दी होती आणि ते संघाला पाठिंबा देत होते.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

५ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.