५ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
५ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 5 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

५ जानेवारी चालू घडामोडी

‘चांद्रयान-3’ प्रक्षेपणासाठी सज्ज:

  • चांद्रयान-3 मोहिमेचे काम जवळपास पूर्ण झाले असून ते प्रक्षेपणासाठी सज्ज आहे.
  • येत्या जून-जुलै 2023 मध्ये त्याचे प्रक्षेपण केले जाईल,अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली.
  • चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 चा उद्देश सारखा आहे.
  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवणे हा चांद्रयान-2चा उद्देश होता.
  • चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान सप्टेंबर 2019 मध्ये लँडर ‘विक्रम’ चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले होते.
  • त्यानंतर चांद्रयान-3 ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

‘चांद्रयान-३’ प्रक्षेपणासाठी सज्ज,जून-जुलै मध्ये प्रक्षेपणाची शक्यता; इस्रोकडून माहिती: 

  • चांद्रयान- ३ मोहिमेचे काम जवळपास पूर्ण झाले असून ते प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. येत्या जून-जुलै २०२३ मध्ये त्याचे प्रक्षेपण केले जाईल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली.
  • नागपुरात आयोजित इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये ते बुधवारी पत्रकारांशी बोलत होते. डॉ. सोमनाथ म्हणाले, चांद्रयान-३ जवळपास सज्ज आहे. यासाठी आवश्यक सर्व गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. आम्ही आता योग्य वेळेची वाट बघतोय. यावर्षी जून-जुलै मध्ये प्रक्षेपण केले जाईल. चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ चा उद्देश सारखा आहे. यावेळी मात्र सुरक्षित ‘लँिडग’साठी आवश्यक घटनांचा अधिक सक्षमतेने विचार करण्यात आला आहे.
  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवणे हा चांद्रयान-२ चा उद्देश होता. चांद्रयान-२ मोहिमेदरम्यान सप्टेंबर २०१९ मध्ये लँडर ‘विक्रम’ चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले होते. त्यानंतर चांद्रयान-३ ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अवकाशातील ई-कचऱ्याबद्दल ते म्हणाले, अवकाशात दोन लाख टन ई-कचरा आहे. त्याचे सुमारे २० हजार तुकडे आहेत. ही गंभीर समस्या आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताच्या अंतराळ धोरणाची लवकरच घोषणा करण्यात येईल. फेब्रुवारी २०२२ मध्ये अंतराळ धोरणाच्या पहिल्या मसुद्यावर चर्चा झाल्यानंतर, अंतराळ विभागाने त्यावर काम केले. आता हा मसुदा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला आहे. हे धोरण लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना कायद्याचे बळ हवे आहे, असे डॉ. सोमनाथ म्हणाले.
  • ‘जी-२०’साठी इस्रोचे दोन कार्यक्रम – भारताकडे सध्या जी-२० चे अध्यक्षपद आहे. त्यानिमित्ताने देशात या समूहाचे वर्षभर कार्यक्रम होतील. यासाठी इस्रोच्या माध्यमातून दोन कार्यक्रम आखले आहेत. पहिला कार्यक्रम शिलाँगमध्ये होईल. यामध्ये राजदूतांसमोर इस्रोचे सादरीकरण केले जाईल. बंगळूरु येथे होणाऱ्या दुसऱ्या कार्यक्रमात अंतराळ तंत्रज्ञान व उद्योग यांची सांगड घालून अर्थव्यवस्थेला गती देण्याबाबत चर्चा करणार असल्याचे डॉ. सोमनाथ म्हणाले.
  • अंतराळ संशोधन क्षेत्रात खासगी कंपन्यांना संधी – नवीन धोरणात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) संशोधन, विकास आणि क्षमता विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. शिवाय या क्षेत्रात खासगी संस्थांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न राहणार आहे. अनेक भारतीय खासगी कंपन्या आणि स्टार्ट-अप्स अंतराळ सहभाग सेवा देण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत. त्यासाठी केंद्र सरकार अनुकूल असल्याचे डॉ. सोमनाथ यांनी सांगितले.

हरित डायड्रोजन उत्पादनाला प्रोत्साहन शुद्ध ; उर्जानिर्मितीसाठीच्या राष्ट्रीय मोहिमेला केंद्र सरकारची मंजुरी: 

  • वातावरण बदलाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी जगभर हरित डायड्रोजनच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात असून देशातही २०३० पर्यंत वार्षिक ५० लाख टन हरित हायड्रोजन उत्पादनाची क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यासाठी महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
  • या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात केंद्र सरकार १९ हजार ७४४ कोटी खर्च करणार आहे. योजनेत ८ लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून २०३० पर्यंत ६ लाख रोजगार निर्माण होऊ शकतील, असा दावा असे केंद्र सरकारने केला आहे. हरित हायड्रोजनचे देशांतर्गत उत्पादन वाढणार असून इंधन आयातीचे प्रमाण कमी होऊन १ लाख कोटींची बचत होईल.
  • कार्बन उत्सर्जनामुळे हरित वायूच्या प्रमाणात वाढ होत असून तापमानाचा पाराही चढू लागला आहे. हरित हायड्रोजनच्या वापरामुळे फक्त पाण्याची वाफ हवेत मिसळते. त्यामुळे हे इंधन शुद्ध उर्जा मानली जाते. म्हणूनच प्रदुषणविरहित हरित हायड्रोजन इंधनावरील वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वांतत्र्यदिनी केलेल्या भाषणात हरित हायड्रोजन मोहिमेचा उल्लेख केला होता. 
  • ‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेमुळे ५० लाख टन हरित वायूंचे उत्सर्जन कमी होईल,’ असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. या क्षेत्रात चीन आणि जपानने आघाडी घेतली असून संयुक्त अरब अमिराती, ओमान, सोदी अरेबिया, दक्षिण कोरिया या देशांनीही हरित हायड्रोजनच्या उत्पादनावर भर दिला आहे.

महत्त्वाची उद्दिष्टे

  • हरित हायड्रोजन उत्पादन, निर्यातीचे जागतिक केंद्र होणे
  • ८ लाख कोटींची गुंतवणूक, ६ लाख रोजगारनिर्मिती
  • अपारंपरिक उर्जेत १२५ गिगावॉटची वाढ – हरित वायूंच्या उत्सर्जनात ५० लाख टन घट
  • ६०-१०० गिगावॉट इलेक्ट्रोलायझर क्षमता
  • इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी ५ वर्षांसाठी अनुदान

अर्थसंकल्प कसा तयार केला जातो? कोण सादर करते? जाणून घ्या: 

  • केंद्रीय अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पामध्ये आर्थिक वर्षातील केंद्राचा महसूल, खर्च यांचा समावेश असतो. उत्पन्नाचे इतर स्रोत आणि इतर खर्च यांचाही यात समावेश असतो. यावर्षीचा म्हणजेच २०२३ चा अर्थसंकल्प कधी सादर केला जाणार आहे आणि तो कसा तयार केला जातो जाणून घ्या.
  • केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ ची तारीख – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दरवर्षी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. पण यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीला सुरू होणार असून ते ८ एप्रिलला संपण्याची शक्यता आहे
  • केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ ची वेळ – २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये १ फेब्रुवारी (बुधवारी) सकाळी ११ वाजता सादर केला जाईल.
  • अर्थसंकल्प कोण सादर करते – गेल्यावर्षीप्रमाणे २०२३ – २०२४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन १ फेब्रुवारीला सादर करतील. २०२३ – २०२४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा हा सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्प सादर करण्यात येण्याच्या एक दिवस आधी ३१ जानेवारीला निर्मला सीतारमन आर्थिक सर्वेक्षण सादर करतील.
  • अर्थसंकल्प कसा तयार केला जातो – अर्थसंकल्प सादर करण्याच्या ६ महिने आधीपासून म्हणजे ऑगस्ट- सप्टेंबरपासून अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली जाते. ही खुप मोठी प्रक्रिया असते. यात तज्ञांचा सल्ला, नियोजन, अंमलबजावणी या गोष्टींचा समावेश असतो.

पंतप्रधानांपाठोपाठ राष्ट्रपतींनीही नाकारले भारतीय विज्ञान काँग्रेसच्या समारोपाचे निमंत्रण: 

  • एकूण गैरव्यवस्थापन आणि अनागोंदीने मंगळवारी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पहिल्याच दिवशी गोंधळ घातला. नागपूर विद्यापीठ आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (आयएससीए) यांचा समावेश असलेल्या आयोजकांनी दिलेल्या निकृष्ट सुविधांबाबत मान्यवर, विद्यार्थी आणि अगदी माध्यमातील व्यक्तींकडूनही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी वैयक्तिक कारणांमुळे कार्यक्रमाला प्रत्यक्षरित्या येऊ न शकल्याने आधीच कार्यक्रमाची शोभा गेली. त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील समारोपीय सोहळ्याचे निमंत्रण नाकारले आहे. काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक पाहुण्यांनी कार्यक्रमाचे आमंत्रण नाकारल्याने विद्यापीठाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना चिल्ड्रन सायन्स काँग्रेस आणि वूमेन्स सायन्स काँग्रेसचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. विज्ञान काँग्रेसच्या नियोजनासंदर्भात संशोधकांच्याही अनेक तक्रारी आहेत. विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचे संकेतस्थळावरही अनेक तक्रारी आहेत. येथे कार्यक्रमासंदर्भात कुठलीही अद्ययावत माहिती नाही. प्रदर्शनाकडे जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याबद्दल अभ्यागतांनी तक्रार केली आहे.
  • प्रदर्शनासाठी विद्यापीठाच्या विभागांनाच मागितले १३ हजार रुपये – विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विज्ञान काँग्रेसचे २० कोटी रुपयांचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे. असे असतानाही विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांना येथे प्रदर्शन लावण्यासाठी जागा देण्यास कंत्राटदाराकडून नकार दिला जात आहे. शिवाय प्रति प्रदर्शनासाठी १३ हजार रुपये मागितले जात आहेत. अनेक महाविद्यालये येथे नवनवीन प्रदर्शन मांडण्यासाठी उत्सुक आहेत. असे असतानाही त्यांना कंत्राटदाराच्या धोरणामुळे उपस्थित राहता येत नसल्याची माहिती आहे.

भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका: भारताचे विजयी आघाडीचे लक्ष्य: 

  • भारतीय संघाचे लक्ष्य दुसऱ्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे असेल. यासह पॉवरप्लेमधील शुभमन गिलच्या कामगिरीवरही नजरा असणार आहेत. गिल चांगली कामगिरी करताना सलामी फलंदाज म्हणून संघात आपली जागा भक्कम करण्याचा प्रयत्न करेल.
  • सलामीला गिल, इशानकडून अपेक्षा- सलामीच्या स्थानासाठी गिलला त्याचा प्रतिस्पर्धी ऋतुराज गायकवाडचे आव्हान असेल, त्यामुळे चांगली कामगिरी करून संघातील आपले स्थान भक्कम करण्याकडे त्याचे लक्ष्य असेल. भारताला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले असले, तरीही त्यांना दोन धावांनी विजय मिळवण्यात यश आले. या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार असून ट्वेन्टी-२० प्रारूपाला कमी प्राथमिकता असेल. तरीही, गिलला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. गेल्या सामन्यात ट्वेन्टी-२० पदार्पण करणाऱ्या गिल लयीत दिसला नाही. गिल गुजरात टायटन्सच्या आघाडीच्या फळीचा महत्त्वाचा भाग आहे. जलदगतीने धावा न केल्याने केएल राहुलला ट्वेन्टी-२० संघातील आपले स्थान गमवावे लागले. भारताकडे ट्वेन्टी-२० प्रारूपासाठी चांगले खेळाडू आहेत. ऋतुराज आणि राहुल त्रिपाठी संधीच्या प्रतीक्षेत आहेत. गिल आणि इशान किशनला उर्वरित सामन्यांसाठीही सलामीची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. या दोघांनीही आक्रमक सुरुवात केल्यास उर्वरित फलंदाजांचे काम सोपे होईल.
  • सूर्यकुमारवर मध्यक्रमाची मदार – भारताचा प्रयत्न दुसऱ्या सामन्यात अधिक धावा करण्याचा असणार आहे आणि यासाठी उपकर्णधार सूर्यकुमार यादववर संघ अवलंबून असेल. पहिल्या सामन्यात सूर्यकुमारला स्वस्तात माघारी परतावे लागले. श्रीलंकेची गोलंदाजी फिरकी गोलंदाज वािनदु हसरंगा आणि महेश तीक्षणा यांच्यावर अवलंबून आहे. या दोघांनीही पहिल्या सामन्यात मिळून आठ षटकांत ५१ धावा देत दोन बळी मिळवले. दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांनीही या सामन्यात आपल्या फलंदाजीने प्रभावित केले. या सामन्यातही या दोन्ही खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
  • चहलच्या कामगिरीकडे नजरा – भारताचा लेग स्पिनर यजुर्वेद्र चहलकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. चहलने पहिल्या सामन्यात केवळ दोन षटके टाकताना २६ धावा दिल्या. यानंतर त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. या सामन्यात तो आपल्या कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करेल. वेगवान गोलंदाज शिवम मावीच्या पदार्पणामुळे कर्णधार हार्दिक पंडय़ाला समाधान मिळाले असेल. पंडय़ानेही नवीन चेंडूने गोलंदाजी करताना प्रभावित केले.

गोव्यातील नव्या मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर पहिले विमान:

  • पणजी येथील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सकाळी पहिले प्रवासी विमान उतरले.
  • याबरोबरच गोव्यातील या नव्या विमानतळाचे औपचारिक कामकाज सुरू झाले.
  • हैदराबाद येथून 179 प्रवाशांना घेऊन आलेले इंडिगोचे विमान उत्तर गोव्यातील मोपा येथील नव्या विमानतळावर सकाळी नऊ वाजता पोहोचले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी नव्या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते.
  • या विमानतळाला माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे नाव देण्यात आले आहे.

‘यूजीसी’ची नियमावली:

  • परदेशातील नामांकित किंवा जागतिक क्रमवारीनुसार अव्वल 500 विद्यापीठांसाठी भारतातील शैक्षणिक बाजारपेठेची दारे आता पूर्णपणे उघडली आहेत.
  • भारतातील विद्यापीठांसाठी असलेले नियम, आरक्षण, शुल्कनियमन परदेशी विद्यापीठांना लागू होणार नसल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने गुरुवारी स्पष्ट केले.
  • विद्यापीठ अनुदान आयोगाने नियमावलीचा अंतरिम मसुदा तयार केला असून, त्यावर आलेल्या सूचना, हरकतींचा विचार करून तो या महिनाअखेरीस अंतिम केला जाणार आहे.
  • सध्या साधारण 18 लाख भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत.
  • परदेशांतील विद्यापीठांकडे धाव घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात राहूनच परदेशी विद्यापीठांत शिकण्याची मुभा येत्या काळात मिळू शकेल.
  • विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या 500 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवणाऱ्या विद्यापीठांना भारतात केंद्र किंवा शाखा सुरू करता येईल.
  • सर्वसाधारण क्रमवारी, विद्याशाखानिहाय किंवा विषयनिहाय क्रमवारी यापैकी कोणत्याही क्रमवारीत पहिल्या 500 विद्यापीठांमध्ये स्थान असलेली विद्यापीठे त्यासाठी पात्र असतील.
  • त्याचप्रमाणे क्रमवारीत सहभागी न होणारी नामांकित विद्यापीठेही पात्र ठरतील. प्रवेश प्रक्रिया, शुल्क ठरवण्याचे अधिकार विद्यापीठांकडेच राहतील.
  • त्यावर आयोगाचे किंवा इतर अधिकार मंडळांचे कोणतेही नियंत्रण राहणार नाही.
  • मात्र, भारतात विद्यापीठांना प्रत्यक्ष वर्ग भरवावे लागतील.
  • ऑनलाइन किंवा दूरशिक्षण वर्ग सुरू करण्यास आयोगाने मज्जाव केला आहे.

दासुन शनाकाने झंझावाती अर्धशतकाद्वारे रचला मोठा विक्रम:

  • श्रीलंका आणि भारत संघांत तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी पार पडला.
  • या सामन्यात श्रीलंका संघाने भारतावर 16 धावांनी विजय मिळवला.
  • त्याचबरोबर मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.
  • या विजयात कर्णधार दासुन शनाकाने महत्वाची भूमिका बजावली.
  • त्याने आपल्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर दोन मोठे विक्रम केले.
  • शनाकाने आपल्या झंझावाती अर्धशतकाद्वारे दोन मोठे विक्रम केले.
  • तो श्रीलंकेसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा क्रिकेटपटू ठरला आहे.
  • त्याने माजी दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांना मागे टाकले आहे, ज्यांनी आतापर्यंत श्रीलंकेसाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे.

आयसीसी क्रमवारीत इशान किशनची मोठी झेप:

  • भारताचा सलामीवीर इशान किशनने 10 क्रमांकांनी झेप घेत 23व्या स्थानावर झेप घेतली आहे, तर दीपक हुड्डाने गुरुवारी जारी केलेल्या टी20 फलंदाजांच्या नुकत्याच जाहीर केलेल्या आयसीसी क्रमवारीत पुन्हा टॉप-100 मध्ये प्रवेश केला आहे.
  • मंगळवारी मुंबईत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने दोन धावांनी विजय मिळविला.
  • हिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांच्या प्रभावी कामगिरीनंतर दोघांनीही चार्टमध्ये वरच्या दिशेने वाटचाल केली.
  • हुडाने 23 चेंडूत नाबाद 41 धावा केल्यानंतर 40 क्रमांकांनी पुढे जात 97 व्या स्थानावर पोहोचला आहे तर सलामीवीर किशनला क्रमवारीत 37 धावांच्या शानदार खेळीचे बक्षीस मिळाले.

जगातील सर्वात मोठे राउरकेला स्टेडीयम हॉकी वर्ल्ड कपसाठी सज्ज:

  • ओडिशाच्या राउरकेला येथे बनवलेले देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम 13 जानेवारीपासून विश्वचषक हॉकी सामन्यांसाठी सज्ज आहे.
  • याआधी, 5 जानेवारीला जेव्हा या स्टेडियमचे उद्घाटन होईल, तेव्हा ही तारीख ओडिशा आणि झारखंडच्या क्रीडा इतिहासात एक संस्मरणीय क्षण म्हणून नोंदवली जाईल.
  • स्टेडियमच्या उद्घाटनानिमित्त येथे झारखंड आणि ओडिशाच्या ज्युनियर पुरुष संघांमध्ये पहिला हॉकी सामना खेळवला जाईल.
  • स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी आयकॉन बिरसा मुंडा यांच्या नावावर असलेल्या नवीन स्टेडियममध्ये एकूण 20 सामने खेळवले जातील.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

५ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.