६ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
६ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 06 August 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

६ ऑगस्ट चालू घडामोडी

कुस्तीपटू रविकुमार दहिया, विनेश फोगट, नवीन कुमार यांना सुवर्णपदक.

कुस्तीपटू रविकुमार दहिया, विनेश फोगट, नवीन कुमार यांना सुवर्णपदक.
  1. बर्मिंगहम येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय पैलवानांनी कुस्तीमध्ये हॅटट्रीक करत आणखी एका सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.
  2. रविकुमार दहिया, नवीन कुमार यांनी त्यांच्या गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
  3. तर 54 किलो वजनी गटाच विनेश फोगट हिने सुवर्ण पदक मिळवले.
  4. सलग तीन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचा विक्रम करणारी विनेश फोगट पहिली महिला कुस्तीगीर ठरली आहे.
  5. महिलांच्या 76 किलो वजनी गटात पूजा सिहागला कास्य पदकावर समाधान मानावे लागले.

8 व्या दिवशी कॉमनवेल्थ गेम्स 2022: भारताने 3 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकले

8 व्या दिवशी कॉमनवेल्थ गेम्स 2022: भारताने 3 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकले

१. कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या 8 व्या दिवशी, भारताने कुस्तीमध्ये अनेक प्रकारांमध्ये 3 सुवर्ण आणि एक रौप्यपदकांसह जबरदस्त कामगिरी केली आहे.

२. बजरंग पुनिया: भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारताचे 7 वे सुवर्णपदक जिंकले. बजरंग पुनियाने पुरुषांच्या 65 किलो गटातील कुस्तीमध्ये कॅनडाच्या लचलान मॅकनीलचा अंतिम फेरीत पराभव केला.

३. अशू मलिक: अंशू मलिकने राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये महिला कुस्ती फ्रीस्टाइल 57 किलो गटात रौप्य पदक मिळवले

४. साक्षी मलिक : साक्षी मलिकने महिलांच्या ६२ किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले . तिने कॅनडाची कुस्तीपटू एमना गोडिनेझ गोन्झालेसचा पराभव केला.

५. दीपक पुनिया: दीपक पुनियाने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये पहिले सुवर्ण जिंकले. त्याने दोन वेळा कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक विजेता पाकिस्तानी कुस्तीपटू मुहम्मद इनामचा पराभव केला.

जगदीप धनकड देशाचे नवे उपराष्ट्रपती :-

जगदीप धनकड देशाचे नवे उपराष्ट्रपती :-

तयांच्याबद्दल माहिती :

  1. झुनझुनु राजस्थान येथे जन्म.
  2. पहिले OBC उपराष्ट्रपती
  3. 2019 पासून पश्चिम बंगालचे गव्हर्नर.

१. सध्याचे उपराष्ट्रपती – व्यंकय्या नायडू

२. नवीन उपराष्ट्रपती शपथ घेतील – 11 ऑगस्ट

३. उमेदवार : मार्गारेट अल्वा ( UPA) vs जयदीप धनकड ( NDA)

४. धनकड – पश्चिम बंगाल राज्याचे माजी गव्हर्नर

५. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदार मतदान करतात

६. लोकसभा आणि राज्यसभा मिळून 788 खासदार आहे

७. त्यापैकी 8 जागा रिक्त असल्यामुळे जास्तीत जास्त 780 मत देऊ शकतात.

अविनाश साबळेला आणि प्रियांका गोस्वामी ला रौप्य, तसेच लॉन बाऊलमध्ये भारतीय पुरूष संघाला रौप्यपदक..

अविनाश साबळेला आणि प्रियांका गोस्वामी ला रौप्य, तसेच लॉन बाऊलमध्ये भारतीय पुरूष संघाला रौप्यपदक..

१. अविनाश साबळेनं 3,000 मीटर स्टीपलचेस प्रकारात 8 मिनिटे 11 पॉईटचा नवा विक्रम नोंदवत रौप्य पदकाला गवसणी घातली.

२. महिलांच्या 10,000 मीटर रेसवॉकच्या अंतिम फेरीत प्रियांका गोस्वामीने दुसरं रौप्य पदक जिंकले.

३. तर लॉन बाऊल मध्ये भारतीय पुरूष संघानं रौप्य पदक मिळवलं.

४. राष्ट्रकुल स्पर्धेतील महिलांच्या मर्यादित वीस षटकांच्या सामन्यात भारतीय महिला संघानं इंग्लंडचा चार धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

५. राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत भारताने 13 सुवर्ण, 11 रौप्य आणि 16 कास्य पदके मिळवली आहेत.

२० वर्षांखालील सैफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारताला अजिंक्यपद.

२० वर्षांखालील सैफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारताला अजिंक्यपद.

१. भवनेश्वर इथल्या कलिंगा क्रीडांगणात झालेल्या २० वर्षांखालील सैफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं विजेतेपद पटकावले.

२. भारताने बांग्लादेशच्या ५-२ असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं.

३. गरकिरत सिंगचे चार गोल आणि हिमांशू झांगरा याने केलेल्या एकमेव गोलमुळे अतिरिक्त वेळेत गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं जोरदार मुसंडी मारली.

४. भारतानं हे अजिंक्यपद सलग दुसऱ्यांदा पटकावलं आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

Q.1 खालीलपैकी कोणत्या दोन देशांना नाटोचा सदस्यत्व देण्यासाठी अमेरिकेने मान्यता दिली आहे?
उत्तर:- फिनलँड स्वीडन

Q.2 राजस्थान सरकारने गर्भवती महिलांसाठी कोणती विशेष अभियान सुरू केले?
उत्तर:- आचल अभियान

Q.3 खालीलपैकी कोणाची केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- सुरेश पटेल

Q.4 खालीलपैकी कोणाची पी एम ओ च्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर:- श्वेता सिंग

Q.5 लीडिंग वेल्थी वुमन अहवाल 2021 नुसार भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला कोण?
उत्तर:- रोशनी नादर

Q.6 सेमी कंडक्टर धोरण 2022 – 27 लॉन्च करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर:- गुजरात

Q.7 भारतामध्ये आता एकूण किती रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आले आहे?
उत्तर:- ६४

Q.8 भारतीय रेल्वेने कोणत्या वर्षापर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे लक्ष ठेवले आहे?
उत्तर:-२०३०

Q.9 खालीलपैकी कोणी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उंच उडी या क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकले?
उत्तर:- तेजस्विन शंकर

_

दिनविशेष

६ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी :

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu GhadamodiMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.