Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 08 August 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
८ ऑगस्ट चालू घडामोडी
भारताने तब्बल २२ सुवर्णपदकांसह राष्ट्रकुल गाजवलं, पदकतालिकेत पटकावलं मानाचं स्थान
- indian medals in cwg 2022 : भारताच्या कुस्तीपटूंनी या स्पर्धेत ६ सुवर्णांसह एक रौप्य आणि पाच कांस्यपदकांची कमाई केली आहे. त्यामुळए भारताने कुस्तीमध्ये एकूण १२ पदकं मिळाली. कुस्तीनंतर भारताला सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची पदकं जिंकवून दिली ती वेटलिफ्टिंगने. भारताच्या वेटलिफ्टिंगपटूंनी यावेळी चमकदार कामगिरी करत तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली. त्यामुळे भारताला या स्पर्धेत वेटलिफ्टिंग या खेळाने १० पदकं मिळवून दिली.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पी.व्ही. सिंधूला सुवर्णपदक.
- बर्मिंगहम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली शानदार कामगिरी कायम ठेवत आजही पदकांची लयलूट केली.
- बडमिंटन महिला एकेरीत पी.व्ही. सिंधूने कॅनडाच्या मिशेल ली चा २१- १५, २१- १३ असा सरळ सेटमधे पराभव करुन सुवर्णपदकावर नाव कोरलं.
- राष्ट्रकुल स्पर्धेत काल निखत झरीन, अमित पंघल आणि नितू घनघास या भारतीय मुष्टिपटूंनी काल सुवर्णपदकांची कमाई केली.
- तर मुष्टियुद्धेत पुरुषांच्या ९२ किलो वजनी गटात सागर अहलावतने रौप्य पदक मिळवलं.
- टबल टेनिस मध्ये मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत अचंता शरत् कमल आणि श्रीजा अकुला या जोडीने सुवर्ण पदक पटकावलं.
भारतीय वंशाच्या आर्या वाळवेकरने जिंकला ‘मिस इंडिया यूएसए’चा किताब
व्हर्जिनिया इथल्या भारतीय अमेरिकन आर्या वाळवेकर हिने यावर्षी ‘मिस इंडिया यूएसए 2022’चा (Miss India USA 2022) किताब पटकावला आहे.
18 वर्षीय आर्याला न्यू जर्सी इथं पार पडलेल्या वार्षिक स्पर्धेत ‘मिस इंडिया यूएसए 2022’चा मुकुट परिधान करण्यात आला.
या सौंदर्यस्पर्धेत व्हर्जिनिया विद्यापिठाची विद्यार्थिनी सौम्या शर्मा ही दुसऱ्या क्रमांकावर होती तर न्यू जर्सीची संजना चेकुरी तिसऱ्या क्रमांकावर होती.
या वर्षी या स्पर्धेचा 40 वा वर्धापन दिन असून भारताबाहेर आयोजित करण्यात येणारी ही सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय विजेतेपद स्पर्धा आहे. वर्ल्डवाईड पेजेंट्सच्या बॅनरखाली ही स्पर्धा प्रथम न्यूयॉर्कमधील भारतीय-अमेरिकन धर्मात्मा आणि नीलम सरन यांनी आयोजित केली होती. “गेल्या काही वर्षांत जगभरातील भारतीय समुदायाकडून मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे”, अशी प्रतिक्रिया धर्मात्मा सरन यांनी दिली.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
Q.1 भारताचे चौदावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत कोणचा पराभव केला?
उत्तर:- मार्गारेट अल्वा
Q.2 भारतीय अंतराळ संस्था ISRO ने अंतराळात तिरंगा दाखवण्यासाठी कोणत्या नावाचा उपग्रह अवकाशात सोडला?
उत्तर:-आजादी Sat
Q.3 धनोरी ही चंद्र मोहीम कोणत्या देशाची आहे?
उत्तर:-दक्षिण कोरिया
Q.4 रिझर्व बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी चलनवाढीचा दर किती ठेवला आहे?
उत्तर:- ६.७%
Q.5 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवीन मलिक यांनी सुवर्णपदक जिंकले ते किती वर्षाचे आहे?
उत्तर:- 19 वर्ष
Q.6 खालीलपैकी कोणत्या देशाला भारत तेजस लढाऊ विमानांचा पुरवठा करणार आहे?
उत्तर:-मलेशिया
Q.7 भारत सरकारने खालीलपैकी कोणाच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले आहे?
उत्तर:- पिंगली वेंकय्या
Q.8 नुकताच डॉक्टर सी नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:-डॉक्टर प्रतिभा रे
Q.9 जगदीप धनकड हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहेत?
उत्तर:-१४ वे
Q.10 कोणते शहर 2028 उन्हाळी ऑलिंपिक आणि प्यारा ऑलिंपिक गेम्स आयोजित करेल?
उत्तर:-लॉस एंजलिस युनायटेड स्टेट्स
_
दिनविशेष
८ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी :
- ७ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- ६ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- ५ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- ४ ऑगस्ट२०२२ चालू घडामोडी
- ३ ऑगस्ट२०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |