८ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
८ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |8 April 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

८ एप्रिल चालू घडामोडी

दहावी, बारावीसाठी सत्र परीक्षा? राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ात शिफारस

  • दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे स्तोम कमी करण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुद्यात करण्यात आल्यानंतर आता राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाच्या मसुद्यात परीक्षांचे नवे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. दहावी आणि बारावी या महत्वाच्या टप्प्यांवरील मूल्यमापन हे फक्त वार्षिक परीक्षेच्या आधारे न करता सत्र पद्धत लागू करावी, तसेच बारावीच्या अंतिम निकालात अकरावीचे गुण विचारात घेण्यात यावेत, अशी शिफारस आराखडय़ात करण्यात आली आहे.
  • राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाचा अंतरिम मसुदा गुरुवारी जाहीर केला. त्यामध्ये अभ्यासक्रमांतील बदलांबरोबरच अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धतीतील बदलांचाही समावेश करण्यात आला आहे. दहावी म्हणजे माध्यमिक शालान्त परीक्षा आणि बारावी म्हणजेच उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा या दोन टप्प्यांवर पुढील प्रवेश, विद्याशाखेची निवड अशा अनेक बाबी अवलंबून आहेत. त्यामुळे या परीक्षांना अनन्यसाधारण महत्व आहे.
  • सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह (सीबीएसई) विविध राज्य मंडळांमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा वर्षांअखेरीस घेण्यात येते आणि त्या एकाच परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीनुसार अंतिम निकाल जाहीर करण्यात येतो.
  • नव्या शैक्षणिक धोरणानुसार करण्यात आलेल्या अभ्यासक्रम आराखडय़ात या परीक्षा पद्धतीत बदल सुचवण्यात आला आहे. नववी ते बारावी असा एकत्रित शैक्षणिक टप्पा विचारात घेण्यात येणार आहे.

कमी खर्चात घ्या अयोध्या आणि वैष्णोदेवीचे दर्शन! रेल्वेने दिली सुवर्णसंधी, फक्त ‘एवढे’ भाडे भरा

  • इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC (IRCTC) भारतातील विविध राज्ये आणि धार्मिक स्थळांसाठी अनेक प्रकारचे टूर पॅकेज घेऊन येते. तुम्हाला अयोध्या आणि वैष्णोदेवी या दोन प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट द्यायची असेल तर IRCTC तुम्हाला एक जबरदस्त संधी देत ​आहे. भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून तुम्ही दोन्ही ठिकाणी अतिशय कमी खर्चात प्रवास करू शकता.

११ दिवसांचे हे विशेष पॅकेज

  • अयोध्या राम मंदिर ते वैष्णो देवी पॅकेज हे संपूर्ण १० रात्री आणि ११ दिवसांचे पॅकेज आहे. आसाममधील दिब्रुगड येथून त्याची सुरुवात होईल आणि भारत गौरव टुरिस्ट ट्रेन येथून निघेल. यानंतर तुम्ही मारियानी, लुमडिंग, गुवाहाटी, न्यू कूचबिहार, न्यू जलपाईगुडी आणि कटिहार स्थानकांवरून प्रवास करू शकाल. या सर्व स्थानकांवर प्रवाशांना बोर्डिंग/डिबोर्डिंग सुविधा मिळेल.

कुठे मिळेल प्रवासाची संधी

  • या ट्रेन टूरद्वारे तुम्ही अयोध्येतील राम मंदिर आणि हनुमानगडला भेट देऊ शकाल. याशिवाय कटरा येथील श्री माता वैष्णो देवीच्या दर्शनाची संधी मिळेल. याशिवाय तुम्हाला प्रयागराजचा त्रिवेणी संगम आणि अलोपी देवाच्या मंदिराला भेट देण्याची संधी मिळेल. तुम्ही ट्रेनने बनारसच्या काशी विश्वनाथ मंदिरालाही भेट देऊ शकाल.

किती असेल शुल्क

  • अयोध्या ते वैष्णो देवी दरम्यान लक्झरी ट्रेन प्रवासाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही २७ मे २०२३ ते ५ जून २०२३ पर्यंत प्रवास करू शकता. या प्रवासाची एकूण दोन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिले इकोनॉमी आणि दुसरे स्टँडर्ड. इकोनॉमीचे भाडे प्रति व्यक्ती २०,८५० रुपये आहे. त्याच वेळी, स्टँडर्डसाठी ३१,१३५ रुपये शुल्क भरावे लागेल. या ट्रेनमध्ये बुक करण्यासाठी, तुम्हाला IRCTC वेबसाइट http://www.irctc.co.in/nget ला भेट द्यावी लागेल.

पट्टेरी वाघांच्या संख्येत वाढ;  देशात ३८००, तर महाराष्ट्रात ३७५ वाघांचा अधिवास

  • भारतामध्ये ठिकठिकाणी ३८०० पट्टेरी वाघांचा अधिवास असल्याचे भारतीय वन्यजीव संस्थेने अलिकडेच केलेल्या वाघ्रगणनेत आढळले असून मागील वर्षी त्यांची संख्या सुमारे ३७०० इतकी होती. कर्नाटक आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक पट्टेरी वाघ आढळल्याचे भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.
  • ‘प्रोजेक्ट टायगर काउंट’ या मोहिमेला ५० वर्ष झाली असून या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पात नवीन उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला लागून असलेल्या सह्याद्रीच्या पट्ट्यात पाच पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. यामध्ये चांदोली अभयारण्य, भैरवगड, रांजणगड आणि दाजीपूर या सह्याद्रीच्या टापूंचा समावेश आहे.
  • तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेच्या अहवालात देशभरात २९५० वाघांचा अधिवास असल्याचे नमुद करण्यात आले होते. देशातील २२ राज्यांमधील जंगलांमध्ये व्याघ्रगणना करण्यात आली होती. सध्या सर्वाधिक ६०० वाघांची कर्नाटकात, तर ५५० वाघांची मध्य प्रदेशात नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात चंद्रपूरसह, बोर, नवे गाव, मेळघाट, नागझिरा, पेंच, सह्याद्री वाघ प्रकल्प, तोडोबा येथे ३७५ पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. दरम्यान, भारतात आफ्रिकन चित्ते आणण्यात आले आहेत.
  • या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. मात्र यापैकी काही चित्ते संरक्षित जंगलातून बाहेर लोकवस्तीजवळ गेल्याने निदर्शनास आले होते. त्यामुळे नामिबीयातून आणलेल्या चित्त्यांच्या संरक्षणासाठी नवी मोहीम राबवली जाणार आहे. बाहेर गेलेला एक चित्ता पुन्हा कुनो राष्ट्रीय उद्यानातील मुक्तसंचार क्षेत्रात सोडण्यात येणार आहे.

अदाणींपेक्षा भारतासमोर ‘हे’ तीन सर्वात महत्त्वाचे मुद्दे : शरद पवार

  • अदाणी प्रकरणावर शरद पवारांनी घेतलेली भूमिका चर्चेत आहे. अशात अदाणी प्रकरणात संसदीय समिती नेमणं हे काही योग्य नाही. कारण संसदीय समिती निम्म्यापेक्षा जास्त लोक हे सत्ताधारी पक्षाचे असतात. उदाहरणार्थ २१ लोकांची समिती तयार करण्यात आली तर त्यात १५ लोक सत्ताधारी पक्षाचे असतात. असं असताना सत्य कसं बाहेर येईल असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला आहे. तसंच देशात अदाणी यांच्या प्रश्नापेक्षा तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?

  • मला असं वाटतं की आपल्या देशासमोर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. उदाहरणार्थ बेरोजगारी, वाढती महागाई आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या. हे तीन प्रश्न देशासमोरचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. अदाणींना जाणीवपूर्वक टार्गेट केलं गेलं असं वाटतं आहे. हिंडेनबर्ग हे नावही मी कधी ऐकलेलं नाही. अशात अदाणी यांच्या प्रश्नांपेक्षा महत्त्वाचे मुद्दे देशात आहेत. ते सोडवण्यावर विरोधकांनी भर दिला पाहिजे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
  • सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर राज्य सरकार अस्थिर होण्याची शक्यता आहे असं वाटतं आहे याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शरद पवार म्हणाले की येऊ देत निर्णय तसा आम्ही वाट बघतोय. तसा निर्णय आला तर योग्य भूमिका घेऊ. एवढंच नाही तर वीर सावरकर यांच्या मुद्द्यावर आमची मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी चर्चा झाली असंही त्यांनी सांगितलं. एखाद्या प्रश्नावरून मतभेद असू शकतात त्यावर चर्चा करता येते त्यातून प्रश्न मार्गी लागतात असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
  • एक काळ असा होता की त्या काळात सत्ताधारी पक्षावर टीका करायची असेल तर आम्ही टाटा बिर्लांचं नाव घेत असू. पण आता ही नावं घेतली जात नाहीत. कारण आता देशालाही समजलं आहे की टाटा आणि बिर्लांचं देशासाठी काय योगदान आहे. त्याचप्रमाणे अंबानी आणि अदाणी यांचंही देशासाठी योगदान आहे हे विसरता येणार नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

८ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.