८ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
८ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |8 March 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

८ मार्च चालू घडामोडी

चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पीएम मोदी राहणार उपस्थित, सोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही असणार

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर ९ मार्चपासून दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हेही स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. दोघेही कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळाचा आनंद लुटतील.
  • ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ’फॅरेल म्हणाले, “क्रिकेट ही दोन देशांना जोडणारी एक गोष्ट आहे. अहमदाबादमध्ये सामन्याच्या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना सामना बघताना पाहणे खूप आनंददायी ठरेल.”
  • भारताला चौथी कसोटी जिंकणे आवश्यक – चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. टीम इंडियाने नागपुरातील पहिली कसोटी एक डाव आणि १३२ धावांनी जिंकली होती. त्यानंतर दिल्ली कसोटी ६ गडी राखून जिंकली. तिसरा सामना इदोरमध्ये पार पडला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने ९ गडी राखून विजय मिळवला. त्याचबरोबर मालिकेत पुनरागमन केले. चौथी कसोटी जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल, तर भारताला ही कसोटी जिंकावीच लागेल. जर टीम इंडिया हा सामना हरला, तर न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल.

एका सुंदर सापाच्या प्रजातीला मिळाले विदेशात अस्तित्व; भारतीय संशोधकांचाही मोलाचा वाटा

  • तुर्कमेनिस्तान देशातून नुकत्याच एका सुंदर सापाच्या प्रजातीला त्याचे अस्तित्व मिळवून देण्याचे काम वन्यजीव संशोधकांनी केले आहे. या संशोधनामध्ये ११ देशांमधील विविध संशोधकांचा समावेश आसून, भारतामधून अमीत सैय्यद, विवेक शर्मा, एस. आर. गणेश, तसेच एच. टी. लारेमसंगा यांचा मोलाचा वाटा आहे.
  • ‘लायकोडॉन बायकलर’ असे याचे नाव असून, हा ‘लायकोडॉन’ कुळातील साप आहे. या कुळातील सापांना इंग्रजीत ‘उल्फ स्नेक्स’, तर मराठीत ‘कवड्या’ जातीचा साप म्हणतात.
  • ‘लायकोडॉन’ कुळात आतापर्यंत ७३ प्रजातींच्या सापांची नोंद आहे. ‘लायकोडॉन बायकलर’ हा पूर्वी ‘लायकोडॉन स्टेयेटस’ नामक एका प्रजातीच्या नावाने ओळखला जात होता. भारत, अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, तसेच तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये या सापाची नोंद असल्याचे नमूद केले गेले होते. भारतातील तसेच इतरही देशांतील काही वन्यजीव संशोधक ‘लायकोडॉन’ या सापांवर गेली कित्येक वर्षे अभ्यास करीत होते. या अभ्यासात विविध देशांमध्ये असलेले सापांचे नमुने अभ्यासणे, त्यांच्या नोंदी घेणे, जनुकीय चाचण्या करणे, असे सर्व शास्त्रीय परीक्षण करण्यात आले.

नेफ्यू रियो पाचव्यांदा नागालँडच्या मुख्यमंत्रीपदी

  • ‘नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे (एनडीपीपी) नेते नेफ्यू रियो यांनी मंगळवारी पाचव्यांदा नागालँडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल ला गणेशन यांनी ७२ वर्षीय रियो यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
  • ‘एनडीपीपी’चे टी. आर. झेलियांग व भाजपचे वाय. पॅटन यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रियो यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनीही शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आपल्या विनोदी शैलीने समाजमाध्यमांवर लोकप्रिय असलेले तेमजेन इम्ना अलॉन्ग व नागालँड विधानसभेवर प्रथमच निवडून आलेल्या दोन महिलांपैकी एक सलहौतुओनुओ क्रूस यांचा समावेश आहे. क्रूस आणि हेकानी जाखलू प्रथमच नागालँड विधानसभा सदस्यपदी निवडून आल्या आहेत.
  • यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि आसामचे मुख्यमंत्री व ईशान्य लोकशाही आघाडीचे (एनईडीए) निमंत्रक हिमंता बिश्व शर्मा उपस्थित होते. रियो यांच्या मंत्रिमंडळात ‘एनडीपीपी’चे सात आणि भाजपचे पाच मंत्री आहेत. क्रूस आणि पी. बाशंगमोनबा हे फक्त दोन मंत्रिमंडळातील नवीन चेहरे आहेत.

आकाशाला गवसणी घालणारी कॅप्टन कृतज्ञा

  • पारंपारिक मासेमारी व्यवसायाला फाटा देत तिने लहानपणापासूनच आकाशात उंच उडण्याचे स्वप्न उरी बाळगले होते. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने आपले स्वप्न प्रत्यक्षात साकारले. अनेक अडचणींवर मात करत तिने आज एक यशस्वी वैमानिक म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. आज अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलींसाठी कॅप्टन कृतज्ञा खऱ्या अर्थाने प्रेरणा स्त्रोत बनली आहे.
  • अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील कॅप्टन कृतज्ञा हाले हिने लहानपणापासूनच वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिले होते. २००९ तिने साळाव येथील इंग्रजी माध्यम शाळेत बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने थेट फिलिपिन्सला जाण्याचा निर्णय घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने घर सोडले. हा निर्णय धाडसी होता. पण आई वडील दोघेही तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहीले.
  • परदेशात वैमानिक प्रशिक्षण घेतांना तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण ती डगमगली नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने वैमानिक बनण्यासाठी आवश्यक चार वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. नागरी उड्डयन विभागाकडे वैमानिक परवान्यासाठी अर्ज केला. पाच वर्ष पाठपुरावा केल्यानंतर तिला अखेर वैमानिक परवाना प्राप्त झाला. त्यानंतर गो एअरवेझ कंपनीत वैमानिक पदावर ती रुजू झाली. पाच वर्षांची तपश्चर्या फळाला आली. यानंतर तीने कधीच मागे वळून पाहीले नाही.
  • आज प्रथितयश वैमानिक म्हणून ती नावारुपास आली आहे. देशविदेशात विमाने उडविण्याचा प्रदीर्घ अनुभव तिच्या पाठीशी आहे. अनेक आव्हानांना सामोरे जात तिने हे यश संपादित केले आहे. हवामानात होणारे बदल, विमानाच्या तांत्रिक बाबी याचे सखोल ज्ञान तिने आत्मसात केले. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत विमानांची हाताळणी करण्याचे कसब आत्मसात केले. आज या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींसाठी ती रोल मॉडेल आहे. अनेक तरुणींसाठी ती मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहे. कोळी समाजातील पहिली महिला वैमानिक म्हणूनही ती ओळखली जात आहे.

नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी:

  • भारत आणि इस्राईल यांनी संयुक्तरित्या विकसित केलेल्या जमिनीवरुन हवेतील लक्ष्य भेदणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची नौदलाची नुकतीच यशस्वी चाचणी केली.
  • नौदलाच्या आयएनएस विशाखापट्टनम या युद्धनौकेवरुन ही रात्रीच्या सुमारास चाचणी घेण्यात आली.
  • जमिनीवरुन हवेतील लक्ष्य भेदणाऱ्या क्षेपणास्त्राला तांत्रिकदृष्ट्या MR-SAM म्हणजेच medium range mobile surface to air missile म्हंटलं जातं, नौदलाने विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आहे Barak 8.
  • नौदलाचे हे एक प्रमुख क्षेपणास्त्र असून यामुळे नौदलाच्या प्रहार क्षमतेत मोलाची भर पडली आहे.
  • 70 किलोमीटर अंतरापर्यंत आणि 16 किलोमीटर उंचीपर्यंतचे कोणतेही लक्ष्य मग ते लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन भेदण्याची क्षमता क्षेपणास्त्रामध्ये आहे.
  • ध्वनीच्या दुप्पट वेगाने संचार करण्याची क्षमता असल्याने या क्षेपणास्त्राचा मारा चुकवणे अवघड समजले जाते.

अंतराळवीरांना अवकाशातून जमिनीवर घेऊन येणाऱ्या यानावरील पॅराशुटची यशस्वी चाचणी:

  • भारताची अंतराळ संशोधन संस्था म्हणजे Indian Space Research Organisation ( ISRO ) संस्था पुढील वर्षी म्हणजे 2024 ला भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे.
  • स्बबळावर अवकाशवीरांना अंतराळात पाठवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे.
  • यासाठी इस्रोने गगनयान ( Gaganyaan ) मोहिम हाती घेतली आहे.
  • या मोहिमेत अवकाश यानातून तीन अंतराळवीर अवकाशात पाठवले जाणार आहे.
  • याचाच एक भाग म्हणून अंतराळवीर ज्या अवकाश यानातून अवकाशात संचार करत परत पृथ्वीवर येणार आहेत त्या यानाच्या विविध चाचण्या सुरु आहेत.
  • त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या पॅराशुटची यशस्वी चाचणी चंदीगढ इथे पूर्ण केल्याचं इस्रोने नुकतंच जाहिर केलं आहे.
  • अवकाश यानाला दोन पॅराशुट असणार आहेत.
  • पहिलं पॅराशुट हे अवकाशातून जमिनीच्या दिशेने येणाऱ्या अवकाश यानाचा प्रचंड वेग कमी करण्यास मदत करणार आहे.
  • तर दुसरं पॅराशुट जे अत्यंत मोठं असणार आहे ते अलगदपणे यानाला जमिनीवर उतरवणार आहे.

नेफ्यू रियो पाचव्यांदा नागालँडच्या मुख्यमंत्रीपदी:

  • ‘नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे (एनडीपीपी) नेते नेफ्यू रियो यांनी मंगळवारी पाचव्यांदा नागालँडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
  • राज्यपाल ला गणेशन यांनी 72वर्षीय रियो यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
  • ‘एनडीपीपी’चे टी. आर. झेलियांग व भाजपचे वाय. पॅटन यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
  • क्रूस आणि हेकानी जाखलू प्रथमच नागालँड विधानसभा सदस्यपदी निवडून आल्या आहेत.

टेलिमेडिसीन सेवा विस्ताराची आरोग्य विभागाची महत्त्वाकांक्षी योजना:

  • ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी सुमारे दीड दशकापूर्वी आरोग्य विभागाने सुरू केलेल्या टेलिमेडिसीन उपक्रमाचा, तसेच इ – संजीवनी योजनेचा व्यापक विस्तार करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
  • ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून आरोग्य विभागाच्या या दोन योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत 67 लाख 44 हजार 383 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
  • आरोग्य विभागाने ‘इस्रो’च्या मदतीने महाराष्ट्रात सप्टेंबर 2006 साली ही टेलिमेडिसीन सेवा सुरू केली होती.
  • केंद्र सरकारने कालांतराने यात पुढाकार घेऊन देशभरात ‘इ – संजीवनी’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून टेलिमेडिसीन योजना राबविण्यास सुरुवात केली.
  • आरोग्य विभागाच्या टेलिमेडिसीन सेवेचा लाभ प्रामुख्याने जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, तसेच ग्रामीण व स्त्री रुग्णालयांमध्ये उपचारासाठी केला जातो.
  • तर इ – संजीवनी ही केंद्र शासनाअंतर्गत येणाऱ्या योजनेच्या माध्यमातून आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राबविण्यात येते.

मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक वि. वि. करमरकर यांचं निधन:

  • चिकित्सक पत्रकारिता व विश्लेषणात्मक लेखनशैलीचा आयाम मराठी क्रीडा पत्रकारितेमध्ये रुजवणारे आणि मराठी दैनिकांमध्ये क्रीडा पान ही संकल्पना प्रथम राबवणारे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, संपादक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक विष्णू विश्वनाथ तथा वि. वि. करमरकर यांचे निधन झाले. ते
  • 1960च्या आधी मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान नव्हते. ते करमरकर यांनी मिळवून दिले.
  • 1962मध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’ हे दैनिक सुरू झाल्यानंतर या दैनिकाच्या पहिल्या चमूमध्ये करमरकर यांचा सहभाग होता.
  • करमरकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कालांतराने संपूर्ण पान खेळांच्या पानाला मिळाले.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

८ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.