९ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
९ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |9 November 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

९ नोव्हेंबर चालू घडामोडी

बेन स्टोक्सने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला इंग्लंडचा पहिला खेळाडू

 • इंग्लंड संघाने एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ४० व्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करून या स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला आहे. सलग सहा पराभवानंतर इंग्लिश संघाने हा सामना जिंकला. इंग्लंडच्या विजयासह आता एकूण चार संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याचबरोबर भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. दरम्यान या सामन्यात बेन स्टोक्सने शतक झळकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
 • इंग्लिश अष्टपैलू खेळाडूने ४७.५ षटकांत चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. स्टोक्सने अवघ्या ७८ चेंडूत आपले वनडेतील पाचवे आणि विश्वचषकातील पहिले शतक झळकावले. बेन स्टोक्सने ८४ चेंडूत ६ चौकार आणि तितक्याच षटकारांच्या मदतीने १०८ धावांची शतकी खेळी खेळली. आपल्या शतकी खेळीदरम्यान स्टोक्सने एक मोठा पराक्रम आपल्या नावावर केला आहे.
 • आपला ११४ वा एकदिवसीय सामना खेळणारा बेन स्टोक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० हून अधिक विकेट्स घेणारा आणि १०,००० हून अधिक धावा करणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. इंग्लंड संघाने १९२ धावांवर ६ विकेट गमावल्या असताना ३२ वर्षीय स्टोक्स फलंदाजीसाठी क्रीझवर आला. मात्र, त्यानंतर त्याने ख्रिस वोक्ससोबत सातव्या विकेटसाठी ८१ चेंडूत १२९ धावांची भागीदारी करत इंग्लंडला ३०० च्या पुढे नेले. स्टोक्सशिवाय डेव्हिड मलानने ७४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८७ धावांची खेळी केली. वोक्सनेही ४५ चेंडूत पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली.
 • इंग्लंड संघाने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात शानदार विजय संपादन केला. त्यानी नेदरलँडचा १६० धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या खात्यात दोन गुण जमा झाले. आठ सामन्यांत त्याचे चार गुण होते. इंग्लंडला सहा सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत इंग्लंड दहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, नेदरलँडचा संघ आठ सामन्यांतील सहाव्या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ५० षटकांत नऊ बाद ३३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ ३७.२ षटकांत १७९ धावांवर गारद झाला. या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडणारा हा चौथा संघ ठरला आहे.

NZ vs SL सामना पावसामुळे होणार रद्द? पाकिस्तानला सुवर्णसंधी, पुन्हा IND vs PAK महासंग्राम रंगणार, पण कसा?

 • १० नोव्हेंबरपर्यंत बंगळुरूच्या काही भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या चार-पाच दिवसांत शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने हवामान खात्याने सोमवारपासून येलो अलर्ट जारी केला आहे. बंगळुरूच्या काही भागात सोमवारपासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक भागात पाणी साचले होते. अशातच आता चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषक २०२३ सामना पावसाने प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे. दिवसभरात चार वेळा वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आल्याने आता ऐन सामन्याच्या वेळी पाऊस पडल्यास काय होणार याविषयी प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे.
 • चिन्नास्वामी स्टेडियममध्ये देशातील सर्व क्रिकेट मैदानांपैकी सर्वात उत्तम ड्रेनेज सुविधा आहे. म्हणजेच जरी पाऊस झाला तरी अर्ध्या तासात स्थिती नियंत्रणात येऊ शकते. परंतु जर सलग व मुसळधार पाऊस असेल तर सामना होणे कठीण आहे. परिणामी हा सामना वॉशआउट झाल्यास, विश्वचषकातील गुणतालिकेत महत्त्वपूर्ण परिणाम दिसून येऊ शकतात.

NZ vs SL वॉशआउट झाल्यास काय होईल?

 • आजचा सामना वॉश आउट झाल्यास न्यूझीलंड आणि श्रीलंका दोघांनाही पॉइंट वाटून दिले जातील. यामुळे न्यूझीलंडच्या खात्यात ९ गुण असतील तर श्रीलंका ५ गुणांवर पोहचेल. यामुळे श्रीलंकेला विश्वचषक उपांत्य फेरीत जाण्याची संधी गमवावी लागू शकते. परंतु फक्त श्रीलंकाच नव्हे तर याचा फटका न्यूझीलंडला सुद्धा बसू शकतो, कारण नऊच पॉईंट असल्याने न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता कमी होऊ शकते.
 • केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघाने सलग चार विजयांसह स्पर्धेची सुरुवात केली परंतु त्यानंतर त्यांना अनेक पराभव पत्करावे लागले. त्यांना १० गुणांचा टप्पा गाठण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवण्याची गरज आहे.
 • दुसरीकडे, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात पावसाने धुव्वा उडवला तर पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची सुवर्ण संधी मिळेल. पाकिस्तानचे सध्या ८ सामन्यांत ८ गुण झाले असून रविवारी त्यांचा सामना इंग्लंडशी होणार आहे. जर त्यांनी गतविजेत्याला पराभूत केले, तर ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
 • चौथ्या स्थानासाठी आता न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात स्पर्धा आहे. चौथ्या स्थानी असलेला संघ उपांत्य फेरीत भारताविरुद्ध लढणार आहे.

वस्रोद्योग अडचणीत असताना कामगारांना १२ टक्के बोनस

 • विटा शहरातील यंत्रमागकामगारांना चालु वर्षी १२ टक्के बोनस देण्याचा निर्णय विटा यंत्रमाग संघाच्या सभागृहात बुधवारी झालेल्या यंत्रमागधारकांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.विटा शहर, औद्योगिक वसाहत व परीसरातील यंत्रमागकामगार, वहिफणीवाले ,जॅाबर्स, घडीवाले ,कांडीवाले अशा २००० कामगारांना सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपयांचे वितरण या माध्यमातुन होत आहे.
 • गेल्या काही वर्षापासुन जागतीकरण, केंद्र व राज्य शासनाची उदासीन धोरणे व कोरोना महामारीने वस्त्रोद्योग कमालीचा अडचणीत सापडला आहे.चार वर्षापासुन कापसाच्या व सुताच्या दरातील अस्थिरता व साठेबाजी, संगनमताने होणारे गैरप्रकार, वीजेचे वाढलेले दर, परदेशातून करचुकवेगीरी करुन आयात होणारे कापड, नोटबंदी,जीएसटी, प्रादेशीक व सहकारी-खाजगी उद्योगांतील शासकिय भेदभाव यासारख्या कारणाने व राज्य व केंद्र शासनाची चुकीची धोरणे व दुर्लक्षामुळे सात्तत्याने अडचणीतुन सुरु आहे.चालु वर्षात कापुस व सुत दरातील सततच्या तेजीमंदीच्या खेळामुळे समस्त वस्त्रसाखळी अडचणीत सापडली आहे तर सततच्या नुकसाणीमुळे शहरातील जवळपास शेकडो यंत्रमाग भंगारमध्ये विकले गेले असतानाही आपल्या कामगारांना दिवाळी साजरी करता यावी या विचाराने सदर बोनस देण्याचा निर्णय चर्चेअंती घेण्यात आला आहे.
 • या बैठकीस यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर, बाबुराव म्हेत्रे, वैभव म्हेत्रे, शिवाजी कलढोणे, शशीकांत तारळेकर, मिलिंद चोथे, राम तारळेकर, विवेक चोथे, अशोक रोकडे, विनोद तावरे, नितीन तारळेकर, कन्हैय्या शेंडे, विकास वाघमोडे, सुनिल लिपारे, डी. के. चोथे, राजधन चोथे यांच्यासह शहरातील यंत्रमागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘क्यू एस मानांकनां’त भारताची चीनवर मात; यादीत १४८ भारतीय विद्यापीठांना स्थान; मुंबई आयआयटी देशात सर्वोत्तम

 • उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘क्यू एस वल्र्ड युनिव्हर्सिटी रँकिंग-एशिया’ यादीत यंदा प्रथमच सर्वाधिक भारतीय संस्थांनी स्थान मिळविले आहे. भारतातील १४८ संस्थांचा यादीत समावेश झाला असून चीनच्या १३३ संस्था आहेत. आशियामध्ये ४०व्या क्रमांकासह मुंबई आयआयटीने देशातील अव्वल नंबर कायम राखला आहे.
 • २०२४च्या क्यू एस मानांकनामध्ये चीनमधील पेकिंग विद्यापीठ आशियातील सर्वोत्तम विद्यापीठ ठरले असून हाँगकाँग विद्यापीठ दुसऱ्या, तर सिंगापूरमधील राष्ट्रीय विद्यापीठ तिसऱ्या स्थानी आहे. मात्र या यादीत यंदा तब्बल ३७ भारतीय शिक्षणसंस्थांनी नव्याने प्रवेश केला आहे. चीनखालोखाल जपानच्या ९६ संस्था असून म्यानमार, कंबोडिया आणि नेपाळमधील विद्यापीठांचा या यादीत प्रथमच समावेश झाला आहे. मुंबईसह दिल्ली, मद्रास, खडकपूर व कानपूर आयआयटी, आयआयएसी बंगळूरु व दिल्ली विद्यापीठाने पहिल्या १०० संस्थांमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. क्यू एस मानांकनामध्ये भारतीय विद्यापीठांची संख्या सर्वाधिक होणे हे भारतातील उच्च शिक्षणामधील विकासाचे द्योतक असल्याचे क्यू एचे वरिष्ठ उपाध्यक्ष बेन सॉटर यांनी म्हटले आहे.

संशोधन क्षेत्राची वाढ आव्हानात्मक

 • संशोधनातील आंतरराष्ट्रीय निर्देशंकामध्ये भारताचे गुण १५.४ असून १८.८च्या विभागीय सरासरीपेक्षा ते कमी असल्याचे क्यू एस मानांकन यादीतून स्पष्ट झाले आहे. भारतीय शिक्षण संस्थांची दोन प्रमुख उद्दिष्टे आहेत. पहिले म्हणजे मोठय़ा संख्येने असलेल्या देशांतर्गत विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे त्याच वेळी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनाही आकर्षित करणे महत्त्वाचे आहे. जागतिक कल बघून या दोन्हीमध्ये समतोल साधणे आव्हानात्मक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अमेरिका, चीन, युरोप, भारत… ‘एआय’ नियंत्रणासाठी कोणत्या देशांमध्ये प्रयत्न सुरू?

 • आर्टिफिशियल इंटिलिजन्स (एआय) म्हणजेच कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असले, तरी त्याचे भविष्यातील संभाव्य धोकेही लक्षात आले आहेत. विविध क्षेत्रांत या तंत्रज्ञानावरील अवलंबित्वही वाढणार असून मानवी बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती, गोपनीयता, व्यक्तिस्वातंत्र्य यांसाठी हे तंत्रज्ञान धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचे नियमन करण्यासाठी विविध देशांनी पुढाकार घेतला आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या नियंत्रित वापराबाबत विविध देश करत असलेल्या प्रयत्नांविषयी…

‘एआय’ निर्बंधांसाठी अमेरिकेने कोणता निर्णय घेतला?

 • कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचे संभाव्य धोके लक्षात घेऊन अमेरिकी सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नुकतीच एका सरकारी आदेशपत्रावर स्वाक्षरी केली. ‘एआय’वर निर्बंध लागू करण्यासाठी अमेरिकी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘एआय’वर निर्बंध लागू करण्यासाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये नागरिकांच्या सुरक्षितता आणि गोपनीयता यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे, असे अमेरिकी प्रशासनाने सांगितले. बायडेन यांनी दिलेल्या कार्यकारी आदेशानुसार आता ‘एआय’ विकासकांना आपल्या एआयचे सर्व सुरक्षा चाचण्यांचे निकाल अमेरिकी सरकारला द्यावे लागणार आहेत. अमेरिकी प्रशासन लवकरच बायोलॉजिकल सिंथेसिस स्क्रीनिंगसाठी काही नियमावली तयार करणार आहे. अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजी’ हे एआयबाबत काही मागदर्शक तत्त्वे तयार करणार आहेत. ‘‘येत्या पाच ते दहा वर्षांमध्ये तंत्रज्ञानात मोठे बदल होणार असून आपण सर्व चहूबाजूंनी तंत्रज्ञानाने वेढलेले असू. मात्र त्यामुळे मोठे धोके निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही नियमावली तयार करण्यात येणार आहे,’’ असे जो बायडेन यांनी सांगितले.

‘एआय’ नियमनासाठी ब्रिटनचे प्रयत्न काय?

 • गूगलची एआय लॅब डीपमाइंड आणि एआय व्हिडीओ मेकर सिंथेसिया यांसारख्या एआय कंपन्यांची कार्यालये असलेल्या ब्रिटनला नावीन्यपूर्ण गोष्टींना अडथळा आणणारे कायदे टाळायचे आहेत. मात्र एआयच्या नियमनासाठी सुरक्षा, पारदर्शकता, निष्पक्षता व जबाबदारी या तत्त्वांवर आधारित कायदे तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एआय सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर नियमावली तयार करण्यासाठी लंडनमध्ये नुकतेच ‘एआय’ सुरक्षा शिखर परिषदेचे आयोजन ब्रिटनच्या माध्यमातून करण्यात आले होते. अमेरिका, चीन, भारतासह २८ राष्ट्रांनी एआयसाठी नियमन आवश्यक असल्याचे या परिषदेत सांगितले. एआयच्या सुरक्षित वापरासाठी ‘ब्लेचली जाहीरनामा’ नावाचा करार करण्यात आला. प्रत्येक देशाने आपल्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार एआय नियमनाचे धोरण आखावे. परंतु त्यात आवश्यक तिथे सर्व राष्ट्रांत एकवाक्यता असावी, असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे. ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विलक्षण संधींचा पूर्णपणे स्वीकार करण्यासाठी, पुढील वर्षांमध्ये ती सुरक्षित विकसित होईल याची खात्री करण्यासाठी आम्ही जोखीम स्वीकारणे आणि हाताळणे आवश्यक आहे,’’ असे ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी नुकतेच एआय नियमनाविषयी सांगितले.

युरोपीय महासंघ काय पावले उचलत आहेत?

तंत्रज्ञान उद्योगावर कठोर नियम लागू करण्यासाठी २०२१ पासून युरोपीय महासंघ प्रयत्न करत आहे. ‘एआय’ कायदा संमत करण्यासाठी प्रयत्न केले जात असून पाश्चिमात्य देशांतील हा पहिलाच एआय कायदा असेल. हा कायदा एआय प्रणालीचे जोखमीनुसार वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव देतो. प्रस्तावित नियम एआयच्या अनाहूत आणि भेदभावपूर्ण वापरांना प्रतिबंधित करतात. गेल्या महिन्यात युरोपियन आयोग समितीचे सदस्य थेयरी ब्रेटन यांनी सांगितले की, ‘‘युरोपीय महासंघ एआय करार विकसित करत आहे. ज्यामुळे कंपन्यांना एआय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यास मदत होईल.’’ मात्र नवउद्योजकांनी या नियमनाला विरोध केला आहे. युरोपीय महासंघाचे प्रस्तावित नियमन खूप प्रतिबंधात्मक आहे, असे नवउद्योजकांनी म्हटले आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

 नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.