Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |9 September 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
९ सप्टेंबर चालू घडामोडी
फौजदार व्हायचयं! ‘एमपीएससी’तर्फे ६१५ पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी जाहिरात, अशी राहणार परीक्षेची पद्धत…
- महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण ६१५ पदांच्या भरतीसाठी महराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील सात जिल्हाकेंद्रांवर यासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.
- पीएसआय पदासाठी विद्यार्थ्यांना ११ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर पीएसआयची पूर्व परीक्षा ही २ डिसेंबरला होणार आहे. अनेक वर्षांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ६१५ जागांची जाहिरात आल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- या पदभरतीसाठी विद्यार्थी अनेक दिवसांपासून वाट बघत होते. पीएसआय पदासाठी अमागास उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे तर मागासवर्गीय उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० राहणार आहे.
- पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणीनंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. ६१५ पदांसाठीची ही जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून विद्यार्थ्यांना येथे भेट देऊन सविस्तर माहिती घेता येणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांकडून महागाई भत्त्यात वाढ, आता ‘एवढा’ मिळणार भत्ता!
- राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
- गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मान्यता दिली. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे ९० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.
- सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर ९ कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २०३ टक्क्यांवरून वाढवून २१२ टक्के महागाई भत्ता देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
‘ग्लोबल साऊथ’ संकल्पना नेमकी काय आहे?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारत हा ग्लोबल साऊथचा आवाज बनत आहे,’ असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते.
- नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेत ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांच्या समस्यांवर चर्चा केली जाईल, असे त्यांनी नुकतेच सांगितले.
- जी-२० परिषदेचे शेर्पा किंवा निमंत्रक अमिताभ कांत यांनी ही परिषद ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज असेल, असे म्हटले आहे. जपानच्या पंतप्रधानांनीही ‘ग्लोबल साऊथ’चे महत्त्व प्रतिबिंबित केले होते. मात्र ‘ग्लोबल साऊथ’ म्हणजे नेमके काय? याविषयी…
जागतिक नेत्यांचे दिल्लीत आगमन; पारंपरिक भारतीय नृत्य, संगीताने स्वागत
- G20 Summit Delhi 2023 जी २० परिषदेसाठी जागतिक नेत्यांचे शुक्रवारी दिल्लीत आगमन झाले. यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा आदींचा समावेश आहे. येत्या दोन दिवसांत या सर्वच नेत्यांबरोबर भरीव फलदायी चर्चा होईल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
- विमानतळावर पारंपरीक नृत्य- संगीताने त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी स्वागतादरम्यान सुहास्य वदनाने वाद्यांच्या तालावर ठेका धरला. त्यांनी या विशेष स्वागताचा उल्लेख ‘एक्स’वरही केला. त्यांनी भारतीय संस्कृतीविषयी दाखविलेल्या या आपलेपणाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नंतर ‘एक्स’वर केला.
पाहुण्यांचे बहुभाषिक स्वागत
- जी२०चे प्रतिनिधी आणि इतर आंतरराष्ट्रीय पाहुणे हे परिषदस्थळी येतील, तेव्हा त्यांचे स्वागत त्यांच्या भाषेत केले जाणार आहे. त्यानुसार जर्मनमध्ये ‘विलकोमेन’, तुर्कीमध्ये ‘होसगेल्डिनिझ’, फ्रेंचमध्ये ‘बिनेव्हेन्यु’, स्पॅनिशमध्ये ‘बिनेव्हेनिडो’, इंडोनेशियनमध्ये ‘सेलामत दातांग’ अशा शब्दांसह स्वागत फलक रंगविले आहेत.
कराडला सर्वांत मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र!, नाईट लॅंडिंग झाले यशस्वी
- कराड विमानतळावर विद्यार्थ्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही फ्लाईंग क्लबच्यावतीने सुरू असल्याची माहिती अँबिशिएन्स एव्हीएशान फ्लाईंग क्लबचे संचालक परवेझ दमानिया यांनी दिली. विमानतळ व्यवस्थापक कुणाल देसाई, प्रशिक्षण केंद्राचे पंकज पाटील आदी उपस्थित होते. परवेझ दमानिया म्हणाले की, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने कराड विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. नुकतेच येथे नाईट लॅंडिंग यशस्वी झाले आहे.
- कराड विमानतळाची विस्तारवाढ झाल्यानंतर येथे राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल. या विमानतळावर विद्यार्थ्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण देणे सुरू आहे. हे ज्यादाची हवाई वाहतूक नसलेले विमानतळ आहे. त्यामुळे याचा वापर वैमानिक प्रशिक्षण केंद्रासाठी सुरू करता येईल असा मानस होता. त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. कराड विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीशी तीन वर्षांचा करार सुध्दा करण्यात आला आहे. प्रशिक्षणासाठीची पाच विमाने विमानतळावर आणण्यात आली आहेत.
- अजूनही मोठ्या क्षमतेची विमाने आणण्यात येतील. यातील दोन विमाने दोन आसनी तर एक विमान चार आसनी आहे. यासाठी विमानतळावर बाजूला एअरक्राफ्ट हँगर केला असून, नाईट लॅंडिंगही करण्यात आले आहे. या विमानतळाची विस्तारवाढ झाल्यानंतर या ठिकाणी राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल. स्थानिकांसह देशभरातून सुमारे २५ विद्यार्थ्यांना सध्या इथे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांचा कालावधी दोन वर्षांचा आहे. प्रशिक्षित व्यावसायिक पायलट बनवण्यासाठी दोनशे तासांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खाजगी विमान कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आता प्रत्यक्षपणे प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आल्यामुळे याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होणार असल्याचा विश्वासही दमानिया यांनी दिला आहे.
जपानमध्ये विद्यार्थ्यांऐवजी शाळेत जाणार रोबो; घरबसल्या विद्यार्थी करणार अभ्यास
- अनेक लहान मुलांना शाळेत जायला आवडतं नाही. अशा मुलांना जर कोणी असा पर्याय दिला की तुमच्या ऐवजी दुसरे काणी शाळेत जाऊ शकते तर त्यांना नक्कीच ही कल्पना आवडेल. पण हे कसं शक्य आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या ऐवजी दुसरा कोणी कसा काय शाळेत जाऊ शकतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, जपानमध्ये लवकरच असा पर्याय विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांऐवजी शाळेमध्ये रोबो हजेरी लावणार आहे आणि विद्यार्थी घरबसल्या शाळेत काय शिकवले जात याची माहिती मिळवू शकतात.
टॅब्लेटच्या मदतीने रोबोवर नियंत्रण केले जाईल
- जपानमधील एका शाळेने विद्यार्थी गैरहजर असताना त्यांच्या जागी रोबोट्स वापरण्याची योजना आखली आहे जेणेकरून रोबोच्या मदतीने गैरहजर विद्यार्थीघरबसल्या अभ्यास करू शकतील. मायक्रोफोन, स्पिकर्स आणि कॅमेरा असलेले हे रोबोट्स आणि विद्यार्थी एकमेकांसह संवाद साधू शकतात. विद्यार्थ्यांना ३ फूट लांब रोबो शाळेच्या मैदानातही नेता येणार आहे. टॅब्लेटच्या मदतीने विद्यार्थी रोबो नियंत्रित करू शकतात. यामध्ये स्पीकर लावण्यात आले असून, त्याच्या मदतीने विद्यार्थी घरून जे काही बोलेल ते रोबोट ऑडिओच्या स्वरूपात वर्गात सादर करेल. नुकताच त्याचा यशस्वी प्रयोगही झाला. कुमामोटो शहरातील शाळातील वर्गात नोव्हेंबरमध्ये रोबो उपलब्ध होतील यासाठी नियोजन केले जात आहे.
अभ्यासाचे नुकसान टाळणे आहे उद्देश्य
- या नवीन उपक्रमाचा उद्देश गैरहजर विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आहे. शाळेतीतल सर्व कामे विद्यार्थ्यांना घरबसल्या रोबोटच्या माध्यमातून करता येणार आहेत. कोविड १९ नंतर, जपानमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली आहे. अनेक मुलांना गुंडगिरीमुळे तर अनेकांना रॅगिंगमुळे शाळेत जायचे नसते. त्यामुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अधिक पर्याय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे.
रोबोट विद्यार्थ्यांची मानसिक भीतीही दूर करेल
- रोबोद्वारे संवाद साधणे हे पूर्णपणे वास्तववादी(realistic) नाही, परंतु इतरांशी संवाद साधण्यास जे विद्यार्थ्यी घाबरतात त्यांना किमान वास्तवाची ( reality) जाणीव करून दिली जाऊ शकते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मानसिक भीतीही दूर होण्यास मदत होणार आहे. खरेतर, जपानमध्ये २०२१ मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या २४४,९४० वर पोहोचली आहे जी विक्रमी नोंद होती.
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
९ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ८ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- ७ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- ६ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- ५ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- ४ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |