आशा
आशा

आशा

ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आशा ओळखल्या जातात.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आशांचा उपयोग होतो. आशा एक प्रशिक्षित (आरोग्य) कर्मचारी असून आदिवासी व बिगर आदिवासी भागातील जनता व सरकारी कर्मचारी यांच्या दुव्याचे काम करतात.

बिगर – आदिवासी भागात 1500 लोकसंख्येमागे एक तर आदिवासी भागांमध्ये 1000 हजार लोकसंख्येमागे एक ‘आशा’ नियुक्त करण्यात येते.

‘आशां’ना ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, लसीकरण यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे ताप, हगवन,  लहान मोठ्या जखमा यावरील प्राथमिक स्वरूपाचे उपचार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते.

ग्रामीण महिलांची प्रसूती, स्तनपान, लसीकरण, गर्भप्रतिबंधक उपाय योजना, जननेंद्रियांची संबंधित जंतुसंसर्ग, लैंगिक संबंधातून होणारे जंतुसंसर्ग, नवजात अर्भकाची काळजी इत्यादी आरोग्यविषयक बाबींसंबंधी मदत व मार्गदर्शन करण्यास आशा सदैव तत्पर असतात.

‘आशा’ ची ठळक वैशिष्ट्ये

 • आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आशा ओळखले जातात.
 • आशा एक प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी म्हणून असून आदिवासी व बिगर आदिवासी भागातील जनता व सरकारी कर्मचारी यांच्यात दुव्याचे काम करतात.
 • समाजात आरोग्यविषयक कोणतेही प्रश्न उद्भवल्यास प्रथम आशाला कळवले जाते.
 • राज्यातील 15 आदिवासी व  31 बिगर आदिवासी जिल्ह्यांमध्ये आशा कार्यरत आहेत.
 • आशाला मिळणारे प्रोत्साहन पर वेतन / भत्ते हे तिच्या कार्य (दर्जा) करण्यावर अवलंबून आहे.

आशा नियुक्ती

आदिवासी क्षेत्र

आदिवासी भागांमध्ये कार्य करणाऱ्या आशाचे किमान 8 वी पर्यंत शिक्षण झालेली असावे.

आदिवासी भागांमध्ये कार्य करणाऱ्या आशा 20 – 45 वयोगटातीलअसाव्यात.

आदिवासी भागांमध्ये कार्य करणाऱ्या आशा विवाहित असावी.

बिगर आदिवासी क्षेत्र

बिगर आदिवासी भागांमध्ये कार्य करणारे आशाचे किमान 10 वीपर्यंत शिक्षण झालेले असावे.

बिगर आदिवासी भागांमध्ये कार्य करणाऱ्या आशा 25 – 45 वयोगटातील असावे

बिगर आदिवासी भागांमध्ये कार्य करणारीआशा विवाहित असावी.

आशाला मदत करणारी यंत्रणा

 1. एका जिल्ह्यासाठी 1 DCM (District Community Mobiliser)
 2. एका आदिवासी भागा साठी 1 BCM (Block Community Mobiliser)
 3. आदिवासी भागात प्रत्येकी 10 आशांसाठी 1 Block Facilitator
 4. बिगर आदिवासी भागात प्रत्येकी PHC साठी 1 Block Facilitator
 5. आशांना मदत करण्यासाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर प्रत्येकी एका सल्लागार समितीची निर्मिती केलेली आहे

आशांचे प्रशिक्षण

 1. ग्रामसभेद्वारे निवड झाल्यानंतर व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर आशा प्रशिक्षणासाठी पात्र ठरते.
 2. प्रशिक्षण हे 7+4+4+4+4 असे एकूण 23 दिवस पाच सत्रात विभागलेले आहे.
 3. प्रथम सात दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आशाला तिच्या कार्यकुशल त्यावर आधारित प्रोत्साहनपर वेतन-भत्ते प्राप्त होत असतात.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.