दीनदयाल उपाध्याय संचार कौशल विकास योजना
दीनदयाल उपाध्याय संचार कौशल विकास योजना

दीनदयाल उपाध्याय संचार कौशल विकास योजना

25 मे, 2017 रोजी दळण-वळण राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या द्वारे पंडित दीनदयाल उपाध्याय दूरसंचार कौशल्य उत्कृष्ट पुरस्कार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय संचार कौशल्य विकास प्रतिष्ठान योजना लागू करण्यात आली.

उद्देश – दूरसंचार क्षेत्रासाठी कुशल श्रम पुरवठा उपलब्ध करणे.

प्रमुख घटक

पंडित दीनदयाल उपाध्याय संचार कौशल विकास प्रतिष्ठान योजनेच्या पहिल्या टप्प्यात अंतर्गत 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील 10 हजार व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येईल.

पहिल्या टप्प्या अंतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, पंजाब आणि हरियाणा राज्यांचा समावेश करण्यात आला आहे.

दूरसंचार विभाग नवीन योजनेअंतर्गत भविष्यात 1000 पेक्षा अधिक संचार कौशल्य विकास प्रतिष्ठान स्थापन करेल.

ज्या व्यक्ती उत्कृष्ट प्रदर्शन करतील अशा व्यक्तींना दीनदयाल उपाध्याय दूरसंचार कौशल उत्कृष्टता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.

पंडित दीनदयाल उपाध्याय दूरसंचार कौशल उत्कृष्ट पुरस्कार निवडीसाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल.

योजनेचे उदघाटन करत्यावेळी संचार राज्यमंत्री मनोज सिंह ने म्हंटले की डिसेंबर 2018 पर्यंत देशातील सर्व ग्रामपंचायती ब्रॉडबँड सेवांशी जोडल्यानंतर 60 कोटी सामान्य जनतेपर्यंत दूरसंचार सेवा पोहोचेल.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.