वन बंधू कल्याण योजना
वन बंधू कल्याण योजना

वन बंधू कल्याण योजना

  • केंद्र सरकार द्वारे आदिवासींच्या कल्याणासाठी वन बंधू कल्याण योजना (VKY) लागू करण्यात आली.
  • ही योजना आंध्रप्रदेश, ओरिसा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगाना, झारखंड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील एका – एका ब्लॉकमध्ये प्राथमिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत केंद्र सरकारद्वारे आदिवासींच्या विविध योजनांच्या विकासासाठी प्रत्येक ब्लॉकला 10 -10 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे.
  • या योजनेअंतर्गत विविध राज्यातील ब्लॉक ची निवड संबंधित राज्याच्या शिफारसी द्वारे आणि जिथे साक्षरता प्रमाण सर्वात कमी आहे.
  • ही योजना प्रामुख्याने पायाभूत सुविधांमधील कमतरता दूर करणे आणि अनुसूचित जाती-जमाती व इतर सामाजिक गटांमध्ये मानव विकास निर्देशांक संबंधी अंतर कमी करण्यावर काम करते.
  • वन बंधू कल्याण योजना केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा परिणाम केंद्रित स्वरूपात एकत्रित आणण्यात लक्ष देईल.
  • या योजनेअंतर्गत सुरुवातीस अशा ब्लॉकवर लक्ष केंद्रित केले जात आहे ज्याची एकूण लोकसंख्या मध्ये कमीत कमी 33%  टक्के भागीदारी आदिवासी लोकांची आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.