आनंदीबाई जोशी

आनंदीबाई गोपाळ जोशी

जन्म :- यमुना ३१ मार्च, इ.स. १८६५ पुणे, महाराष्ट्र

मृत्यू :- २६ फेब्रुवारी १८८७ (वय वर्ष २१)

राष्ट्रीयत्व :- भारतीय

नागरिकत्व :- भारतीय

शिक्षण :- एम.डी.

प्रशिक्षण संस्था :- विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ़ पेन्सिल्व्हानिया

आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६१ रोजी पुण्यात त्यांच्या आजीळी झाला.

आनंदीबाईचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते

जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या.

वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह व्याने २० वर्षांनी मोठे असणारे गोपाळराव जोशी यांच्याशी झाला

गोपाळराव जोशी हे मूळचे संगमनेर जिल्हा अहमदमार येथील रहिवासी होते.

लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.

वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले.

आनंदीच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आणि तिला डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली.

गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला, कलकत्त्याला गेल्यावर तिने संस्कृत आणि इंग्रजी वाचणे आणि बोलणे शिकले.

गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते.

नंतर त्याची अलिबाग येथे आणि नंतर कोलकाता(कोलकाता) येथे बदली झाली.

ते एक पुरोगामी विचारवंत होते आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता.

आपल्या काळातील इतर पती आपल्या पत्नींना स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत, या उलट गोपाळराव हे आपल्या तरुण पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल मारहाण करत, कारण पत्नीने वैदयकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह होता. ते स्वतः लोकहितवादींची शतपत्रे वाचत.

आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले.

लोकहितवादींच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचा त्याची निश्चय केला.

आनंदीबाई जोशी : वैद्यकीय शिक्षण

आनंदीबाईच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती, आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य नव्हते.

मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.

पुढे आनंदीबाईची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित म्हणजे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ‘विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानियामध्ये प्रवेश मिळाला.

तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईची प्रकृती साहाय्य खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर जोडप्याचे त्यांना लाभले.

सरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डाॅक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले.

तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले, आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदु धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे.

आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली.

भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.

कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईना एम.डी.ची पदवी मिळाली.

एम.डी.साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’.

एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले. हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले; पंडिता रमाबाई होत्या.

‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून आनंदीबाईंची प्रशंसा केली.

एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात आल्या , तेव्हा त्यांचे स्वागत व अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.

वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला होता.

पुढे काही महिन्यातच म्हणजे २६ फेब्रुवारी, इ.स. १८८७ रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला.

केवळ २१ वर्षाच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला.

दुदैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही.

मात्र ‘चूल आणि मूल’ म्हणजेच आयुष्य असे समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला.


एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच आनंदी-गोपाळ हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते .


जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही हे या जोडप्याने समाजाला सिद्ध करून दाखवले आह असे म्हणता येऊ शकेल. समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच.

सवतः डॉक्टर होऊनही कुणा देशभगिनीवर उपचार करण्याची संधी आनंदीबाईंना मिळालीच नाही.

तिकडे अमेरिकेत मात्र कारपेंटर यांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात (Grave-yard) त्यांचे लहानसे थडगे बांधले.

त्यावर ‘आनंदी जोशी, एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या. परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री’ अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक केले.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.