बेटी बचाव, बेटी पढाओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींच्या जन्मदरात समानता यावी, लिंगभेद – भेदभाव मिटावा, मुलींना समानतेने व निर्भयपणे जगता यावे यासाठी त्यांना संरक्षण मिळावे त्याचबरोबर त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी ही योजना 22 जानेवारी 2015 रोजी सुरू केली आहे.
मुख्य उद्देश :– स्त्रीभ्रूणहत्या थांबविणे व मुलींना संरक्षण देणे
उद्दिष्टे:-
लिंगनिवडस प्रतिबंध करणे
बालिकांचा जन्मदर वाढविणे
मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे
मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन व खात्री देणे
पाच वर्षाखालील लिंगभेदामुळे झालेले रूप बालमृत्यू 2017 पर्यंत चार गुणांनी कमी करणे
24 जानेवारीला बालिका दिवस साजरा करणे
2015 पर्यंत वेगळा स्वच्छतागृह पुरविणे
माध्यमिक शाळेतील मुलींचे प्रमाण 2017 पर्यंत 79% करणे
बेटी बचाव बेटी पढाव योजना ची लक्ष्य
शिशु लिंग गुणोत्तराचे ओळख करून भ्रुणहत्या थांबविणे
मुलगा-मुलगी भेदभाव कमी करणे
मुलींचे शिक्षण प्रमाण वाढविणे
मुलींच्या जालना वेळी आनंद साजरा करणे
ती बचाव बेटी पढाव योजना हरियानातील लिंग गुणोत्तर सर्वात कमी हजारी 835 असल्यामुळे हरियाणा राज्यातील पानिपत येथून सुरू करण्यात आली आहे.
बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गत पाच जणांची निवड करण्यात आली आहे ज्यांचे बाललिंग्गुणोत्तर प्रमाणे हे हजार मुलांमागे 918 मुलींपेक्षा कमी आहे
बेटी बचाव बेटी पढाव योजना प्राथमिक स्वरूपात देशातील 100 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली.
या योजनेसाठी फिल्म अभिनेत्री माधुरी दीक्षित ची जाहिरात प्रतिनिधी (ब्रँड ॲम्बेसिडर) म्हणून निवड करण्यात आली.
बेटी बचाव बेटी पढाव योजनेचे बोधचिन्ह श्री राघवेंद्र हैदराबाद यांनी तयार केले आहे.
बेटी बचाव बेटी पढाव योजनेत मुलांच्या प्रमाणात मुलींचे प्रमाण अधिक लिंगगुणोत्तर प्राप्त करणाऱ्या गावाला एक कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
बेटी बचाव बेटी पढाव योजनेत आणखी एक योजना सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली
बेटी बचाव बेटी पढाव योजना महिला आणि बाल कल्याण मंत्रालय व मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय संयुक्तपणे राबवित आहेत.
गर्भवती महिलांची नोंद घेणे, ग्रामपंचायतीने नवीन जन्मलेल्या मुलींची नोंद ठेवणे, बालविवाहांना पंचायतींना जबाबदार धरणे, अशी पावले या अभियानाअंतर्गत उचलली जाणार आहेत.
बाल लिंग गुणोत्तर कमी असणाऱ्या 100 जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये 2017 पर्यंत शौचालय सुविधा उपलब्ध करणे.
बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे बीड, जळगाव, औरंगाबाद, वाशिम, कोल्हापूर, सांगली, जालना, अहमदनगर, बुलढाणा, उस्मानाबाद असे दहा जिल्हे निवडण्यात आले आहेत.
बेटी बचाव बेटी पढाव नावावर पोस्ट टिकीट उपलब्ध करण्यात आले आहे.
29 एप्रिल 2016 रोजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी बेटी बचाव बेटी पढाव योजनेचा विस्तार करून यामध्ये देशातील आणखी जिल्ह्यांचा समावेश केल्याने सध्या योजना 161 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.