उड़ान योजना
उड़ान योजना

उड़ान योजना

सुरुवात:- 

या उडान योजनेची सुरुवात 13 नोव्हेंबर 2014 रोजी करण्यात आली.

Udaan योजनेचा उद्देश

अभियांत्रिकी सारख्या क्षेत्रातील मुलींचा सहभाग वाढावा यासाठी मुलींना प्रवेश परीक्षा पूर्व अभियांत्रिकी प्रवेश प्रशिक्षण देणे.

योजनेअंतर्गत प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दिले जाते.

Udaan योजनेचे स्वरुप

Udaan योजनेअंतर्गत merit cum means शिष्यवृत्ती योजनेच्या परीक्षेच्या माध्यमातून अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा प्रशिक्षणासाठी 1000 आर्थिक दुर्बल घटकातील मुलींची निवड करण्यात येते.

उडान योजनेअंतर्गत अकरावी-बारावी सीबीएससी मध्ये शिकणाऱ्या मुली पात्र ठरतील पात्र मुलींना दहावी मध्ये किमान 70 टक्के गुण गणित व विज्ञान मध्ये 80 टक्के गुण मिळाले असावेत.

Udaan योजनेत पात्र ठरविण्यासाठी दहावीतील गुणांबरोबर बारावीत शिकणाऱ्या मुलींना अकरावीमध्ये विज्ञान आणि गणित विषयांमध्ये 75 टक्के गुण मिळाले असावेत.

या मुलींना मोफत विज्ञान व गणिताचे शिक्षण तसेच आयआयटी-जेईई प्रवेश परीक्षांसाठी online साधने पुरविली जातील.

उडान योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना प्राधान्य देण्यात येणार आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.