
चिंतामणी नागेश रामचंद्र राव हे सी. एन. आर. राव या नवाने ओळखले जातात, एक भारतीय रसायन वैद्यानिक आहेत आणि त्यानी पदार्थाची घन अवस्था व संचारात्मक रसायन शास्त्र या मुख्य क्षेत्रामध्ये काम केले आहे. सध्या ते प्रधानमंत्री कार्यालयात प्रधानमंत्र्यांचे प्रमुख वैद्यानिक तज्द्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ राव यांनी जगातील ६० विश्वविद्यालयातून डॉक्टरेट ही मानद पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी १५०० शोध लावले असून त्यानी ४५ वैद्यानिक पुस्तके लिहली आहेत. |
२०१३ मध्ये त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. सी. वी. रमन व अब्दुल कलाम यां नंतरचे ते तीसरे वैद्यानिक आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. |
आरंभिक जीवन: बेंगलोर मधील कन्नड परिवारमध्ये राव यांचा जन्म झाला असून नागम्मा नागेश राव ह्या त्यांच्या आई तर हनुमंत नागेश राव हे वडील आहेत. राव यांनी १९५१ मैसूर विश्वविद्यालयातून पदवीधर झाले तर काशी हिंदू विश्वविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९५८ मध्ये त्यांनी पर्ड्यू विश्वविद्यालयातून पी. एच. डी. पदवी प्राप्त केली. १९६१ ला त्याना मैसूर विश्वविद्यालयातून त्यांना डी. एस. सी. पदवी मिळाली. १९६३ मध्ये राव आयआयटी कानपुर मध्ये शिक्षण रुपाने कार्यरत झाले व तेथेच त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली. |
व्यवसायिक जीवन: राव सध्या जवाहरलाल नेहरु वैद्यानिक संशोधन केंद्राचे (बेंगलोर) अध्यक्ष आहेत, ज्याची स्थापना त्यानी स्वत: १९८९ मध्ये केली होती. येथे ते मुख्य संशोधन प्राध्यापक म्हणून कार्य करतात. त्याचप्रमाणे जानेवारी २००५ मध्ये त्यांची प्रधानमंत्र्यांचे प्रमुख वैद्यानिक सल्लागार म्हणुन निवड झाली. राव सध्या अंतरराष्ट्रीय पदार्थ विद्यान केंद्राचे संचालक आहेत. |
पुरस्कार आणि सन्मान: १६ नोव्हेंबर २०१३ ला त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी त्यांना भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मा विभूषण त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारने त्यांना कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. सन २००० मध्ये रॉयल सोसायटीने ह्यूज पदक देऊन त्यांचा गौरव केला. सन २००४ मध्ये घन अवस्थेमधील रसायन शास्त्र व पदार्थ विद्यान या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे भारत सरकारद्वारे संस्थापित भारतीय विद्यान अवार्ड भेटणारे पाहिले व्यक्ती बनले. |
विवाद: राव यांच्यावरती साहित्याची चोरी केल्याचा व चोरी होउ देण्याचा आरोप आहे. त्यांनी २०११ मध्ये त्यांच्या अडवांस मटेरियल्स या मासिकामध्ये त्यांनी याबाबत माफ़ी मागितली |