Commercial-Cash-Crops-Sugarcane
Commercial-Cash-Crops-Sugarcane

नगदी पिके (Cash crops)

 

अर्थव्यवस्थेला सर्वात जास्त पैसा पुरवणारे हे पीक आहे

कापूस, हळद

कापूस

राज्यातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळपास 18 पर्सेंत क्षेत्र कापूस या नगदी पिकांखालील आहे जे सर्वाधिक आहे

25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान कापसासाठी योग्य असते 50 सेंटिमीटर पाऊस आवश्यक असते

कापूस कृष्णा भीमा गोदावरी यांच्या खोऱ्यात काळ्या मृदेत घेतल्या जाते

भारतातील एकूण कापूस उत्पादनात 16% उत्पादन महाराष्ट्रात होते

  1. भारतात प्रथम गुजरात
  2. दुसरा पंजाब
  3. तिसरा महाराष्ट्र

प्रमुख जाती

लक्ष्मी, वरलक्ष्मी, धनलक्ष्मी, कंबोडिया, सावित्री, ज्योती, देवराज

महाराष्ट्रात कापूस पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांचा उतरता क्रम

  1. जळगाव
  2. औरंगाबाद
  3. यवतमाळ

महाराष्ट्रात कापूस उत्पादनात सर्वाधिक उत्पादन उत्पन्न असणाऱ्या जिल्ह्यांचा उतरता क्रम टनामध्ये

  1. जळगाव
  2. यवतमाळ
  3. धुळे

 

महाराष्ट्रात कापूस उत्पादनात सर्वाधिक उत्पादन उत्पन्न असणाऱ्या जिल्ह्यांचा उतरता क्रम हेक्टरी उत्पादन

  1. सोलापूर
  2. गडचिरोली
  3. जळगाव

 

रोगांचा प्रादुर्भाव

करपा (बुरशीचा रोग आहे), पांढरी माशी, तुडतुडे, फळकूज, मर

ऊस

महाराष्ट्राच्या पश्चिम पठारी प्रदेशात प्रमुख नगदी पीक म्हणजे ऊस होय

ऊस या नगदी पिकाच्या वाढीसाठी बारा ते अठरा महिन्याचा काळ लागतो

तापमान 20 ते 30 डिग्री सेल्सिअस ची गरज असते

पाऊस 100 ते 150 सेंटीमीटर पर्जन्याचे आवश्यकता असते

ऊस तोडी च्या वेळेस सरळ स्वच्छ सूर्यप्रकाश व कडून असल्यास उसातील साखरेचे प्रमाण वाढते

संपूर्ण भारतात ऊस गाळाच्या मृदेवर घेतल्या जाते ही मृदा महाराष्ट्रात नसल्यामुळे हे पीक महाराष्ट्रात आर्या रेगुर मृदेवर घेतले जाते

ऊस पीक बारमाही असल्याने हे पीक सिंचनाची सुविधा असणाऱ्या ठिकाणी घेतल्या जाते

कृष्णा नदीच्या खोऱ्यात उसाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते

प्रमुख जाती

कृष्णा, संजीवनी, महालक्ष्मी, संपदा, शरद

 

महाराष्ट्रातील ऊस पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांचा उतरता क्रम

  1. सोलापूर
  2. कोल्हापूर
  3. पुणे

महाराष्ट्रात ऊस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन असणारे प्रमुख जिल्ह्यांचा उतरता क्रम टनामध्ये

  1. सोलापूर
  2. कोल्हापूर
  3. पुणे

महाराष्ट्रात ऊस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्ह्यांच्या उतरता क्रम हेक्टरी उत्पादन

  1. सांगली
  2. पुणे
  3. कोल्हापूर

रोगांचा प्रादुर्भाव

खोड किडे, पांढरी माशी, हुमणी, पाकोळी, काळी किड

 

राज्यानुसार उत्पादन

  1. यूपी
  2. महाराष्ट्र
  3. कर्नाटक
  4. तामिळनाडू

 

तंबाखू

दक्षिण महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात घेतले जाते

सर्वाधिक उत्पन्न: कोल्हापूर

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.