भारताच्या १५ व्या राष्ट्रपती महणून त्यांची निवड झाली आहे
जन्म | २० जून १९५८ |
जन्म स्थान | ओडिशातील मयूर भंज जिल्यातील बडीपोसी गावात झाला. |
वडिलांचे नाव | बिरांची नारायण तुडू. |
शिक्षण | १९७९ भुवनेश्वर च्या रमदेवी विद्यपीठातून कला शाखेत पदवी. |
विवाह | श्याम चरण मुर्मु. |
राजकीय पक्ष | BJP |
मूळ गाव | मयूरभंज, ओडिशा |
वांशिकता | संथाल जमात |
पुरस्कार | 2007 मध्ये सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून नीलकंठ पुरस्कार |
द्रौपदी मुर्मू या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत
भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाले ल्या पहिल्या आदिवासी महिला आहेत
भारताच्या इतिहासातील दुसऱ्या महिला राष्ट्रपती झाल्या आहेत .( पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील )
वैयक्तिक आयुष्य
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला
त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे
द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसातील संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत
इ.स. १९७९ मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला विद्यापीठातून द्रौपदी मुर्मू यांनी कला शाखेतील पदवी प्राप्त के ली.
द्रौपदी मुर्मू यांनी श्याम चरण मुर्मू यांच्याशी लग्न केले
द्रौपदी मुर्मू यांनी दोन मुलगे आणि एक मुलगी असून पैकी दोन्ही मुले मरण पावले आहेत
कारकीर्द सुरवात
ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली
द्रौपदी मुर्मू यांनी राजकारणात येण्यापूर्वी शाळे त शिकवायला सुरुवात के ली.
त्यांनी रायरंगपूर येथील श्री अरबिं दो इं टिग्रल एज्युके शन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले .
त्यांनी ओरिसा सरकारच्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक देखील काम के ले आहे .
ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली
राजकीय कारकीर्द
- 1997 मध्ये, द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश केला
- 1997 मध्ये राज्य एसटी मोर्चाच्या उपाध्यक्षा होत्या.
- रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवकपदी त्यांची निवड झाली
- 2000 मध्ये त्या रायरंगपूर नगर पंचायतीच्या अध्यक्षा झाल्या.
- 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2000 पर्यंत, जेव्हा भाजप आणि बिजू जनता दलाने युती केली तेव्हा त्या वाणिज्य आणि परिवहन विभागाच्या स्वतंत्र प्रभारी राज्यमंत्री होत्या
- 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 त्या मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकासाच्या प्रभारी होत्या.
- 2000 ते 2004 दरम्यान रायरंगपूरमधून ओडिशा विधानसभेच्या सदस्या होत्या
झारखंड राज्यपाल
- द्रौपदी मुर्मू यांनी 18 मे 2015 रोजी झारखंडच्या राज्यपाल म्हणून शपथ घेतली ,जुलै 2021 पर्यंत त्या पदावर होत्या
- त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्या.
- भारतीय राज्याच्या राज्यपालपदी नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या होत्या.
- 2007 मध्ये द्रौपदी मुर्मू यांना ओडिशा विधानसभेचा सर्वोत्कृष्ट आमदार (विधानसभा सदस्य) साठी नीलकंठ पुरस्कार मिळाला.
महत्वाचे
- मुर्मू ह्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती देखील आहेत, ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला.
- कोणत्याही भारतीय राज्याच्या पूर्णवेळ राज्यपाल बनणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला होत्या.
- 2017 मध्ये झारखंडच्या राज्यपाल म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी छोटानागपूर भाडेकरू कायदा, 1908 आणि संथाल परगणा भाडेकरार कायदा, 1949 मध्ये सुधारणा करण्यासाठी झारखंड विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकाला संमती देण्यास नकार दिला.या विधेयकात आदिवासींना त्यांच्या जमिनीचा व्यावसायिक वापर करण्याचे अधिकार देण्याची मागणी करण्यात आली आहे, तसेच जमिनीच्या मालकीमध्ये बदल होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे.
- भारताचे विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 25 जुलै रोजी संपत आहे, जेव्हा नवीन राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत.