अंतःस्त्रावी संस्था (Endocrine System)
अंतःस्त्रावी संस्था (Endocrine System)

अंतःस्त्रावी संस्था (Endocrine System)

आपल्या शरीरात विविध ठिकाणी काही विशिष्ट अवयव रासायनिक पदार्थांची निर्मिती करतात. या रासायनिक पदार्थांनाच विकरे किंवा संप्रेरके असे म्हणतात. आपल्या शरीरात जी अवयव विकरे किंवा संप्रेरके स्रवतात त्यांना ग्रंथी असे म्हणतात. आणि अशा ग्रंथींच्या समुहापासून अंतःस्त्रावी संस्था तयार होते. अंतः स्त्रावी ग्रंथीतून स्त्रवणारे संप्रेरके सरळ रक्तात मिसळतात कारण त्यांच्या वहनासाठी माध्यम नसते. म्हणून त्यांना नलिका विरहित ग्रंथी असेही म्हणतात.

अंतःस्त्रावी ग्रंथीशिवाय आपल्या शरीरात काही विशिष्ट ठिकाणी बाह्यस्त्रावी ग्रंथी असतात. यातून स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या वहनासाठी नलिका असते. म्हणून यांना नलिकायुक्त ग्रंथी असेही म्हणतात.

अंतःस्त्रावी ग्रंथी (Endocrine Glands):

1)  पियुषिका ग्रंथी (Pitutary Gland):

  • ही सर्वात लहान अंतःस्त्रावी ग्रंथी असून आपल्या शरीरात मेंदूमध्ये आढळते. या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात. कारण, या ग्रंथीमुळे इतर ग्रंथीचे कार्य नियंत्रित केले जाते.
  •  या ग्रंथीतून सोमॅटोट्रॉपिन हे वृद्धी संप्रेरक स्त्रवत असते.
  • हे विकर जास्त प्रमाणात स्रवल्यास व्यक्ती जास्त उंच होतो, तर कमी प्रमाणात स्रवल्यास त्या व्यक्तींची उंची कमी राहते.

कार्य : आपल्या शरीरात वाढ, विकास, प्रजनन, इतर ग्रंथींचे कार्य नियंत्रण करते.

2) हायपोथॅलॅमस (Hypothalamus):

ही ग्रंथी आपल्या डोक्यामध्ये पियुषिका ग्रंथीच्या बाजुला आढळते. यातून थायरोट्रोपीन (TRH), डोपॅमाईन, वृद्धीसंप्रेरक, सोमॅटोस्टॅटिन, गोनॅडोट्रोपिन, कॉर्टिकोट्रोपीन, ऑक्झिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन (ADH) ही संप्रेरके स्रवतात.

 कार्य:

  1. थायरोट्रोपिनमुळे पियुषिका ग्रंथीतून थायरॉईड उद्दीपन संप्रेरक स्रवण्यास मदत होते.
  2. डोपॅमाईनमुळे मेंदूतील चेतापेशींचे कार्य नियंत्रित करण्यासाठी प्रोलॅक्टिन रसायन स्रवले जाते.
  3. सोमॅटोस्टॅटिनमुळे वाढ आणि विकास नियंत्रित केली जाते.
  4. व्हॅसोप्रेसिन संप्रेरकांमुळे वृक्क मालिकेतील पाण्याचे वहन नियंत्रित केले जाऊन रक्ताचे आकारमान नियंत्रित राहते.

3) पिनल ग्रंथी (Pineal Gland):

मेंदूच्या आतील भागात आढळते. यामधून मेलॅटॉनिन हे संप्रेरक स्त्रवते. हे संप्रेरक सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाल्यानंतर स्रवण्यास सुरुवात होते म्हणूनच आपल्याला झोप येते.

4) थायरॉईड ग्रंथी (Thyroid Gland):

  • ही ग्रंथी आपल्या शरीरात गळ्याच्या खालील भागात श्वसननलिकेच्या तोंडावर असते. या ग्रंथीमधून थायरॉक्झीन (Thyroxine) आणि ट्रायआयोडो थायरॉनॊईन (Tri-iodo-Thyronoine) नावाचे संप्रेरक स्त्रवत असते.
  •  या संप्रेरकाच्या कमी स्रवण्यामुळे लहान मुलांना Cretinism नावाचा रोग होतो. म्हणजे त्यामध्ये मुलगा कमी खातो, जास्त झोपतो, जीभ लांब होते इत्यादी दोष दिसून येतात.
  •  हे प्रमाण प्रौढ व्यक्तींमध्ये कमी झाल्यास Myxedemerma नावाचा रोग होतो. अशा व्यक्तीस थंडी सहन होत नाही आणि तो शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या दुर्बल बनतो.

कार्य:

  1. शारीरिक तसेच मानसिक वाढ नियंत्रित करणे.
  2. ऊर्जानिर्मिती तसेच रोगप्रतिकारक क्षमता नियंत्रित करणे.

5) पॅरा थायरॉईड ग्रंथी  (Para-Thyroid Gland):

ही ग्रंथी आपल्या शरीरात थायरॉईड ग्रंथींच्या मागे आढळते. या ग्रंथीतून पॅरा-थायरॉईड संप्रेरके स्रवतात.

कार्य:

  1. पॅरा थायरॉईड संप्रेरकांमुळे आपल्या शरीरात रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढविण्यास मदत केली जाते.

6) आद्यांत्र ग्रंथी (Adrenal Gland):

ही ग्रंथी शरीरात लहान आतड्यामधे आढळते. या ग्रंथीतून सिक्रेटीन आणि कोलेसिस्टोकायनिन ही संप्रेरके स्रवतात.

कार्य:

  1.  सिक्रेटीन संप्रेरकामुळे बायकार्बोनेट क्षारांची निर्मिती होते व त्यामुळे आतड्यात आम्लारीधर्मी परिस्थिती निर्माण होते.
  2. कोलेसिस्टोकायनिन संप्रेरकांमुळे स्वादुपिंडातून पाचक विकरे स्रवले जातात तसेच पित्ताशयातून पित्त स्रवले जाते.

7) जठर ग्रंथी (Stomach Gland): 

ही ग्रंथी आपल्या शरीरात अन्ननलिकेत आढळते. या ग्रंथीतुन न्यूरोपेप्टाइड, सोमॅटोस्टॅटिन, हिस्टॅमाईन आणि एन्डोथेलिन ही संप्रेरके स्रवतात.

कार्य: 

  1. न्यूरोपेप्टाइडमुळे आहारात वाढ होते. सोमॅटोस्टॅटिनमुळे मृदू स्नायूंचे आकुंचन तसेच आतड्यातील रक्तप्रवाह नियंत्रित केला जातो.
  2. हिस्टॅमाईनमुळे गॅस्ट्रिक आम्लचे स्रवण नियंत्रित केले जाते.

8) यकृत ग्रंथी (Liver Gland):

ही  शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून जठराच्या बाजूला असते. या ग्रंथीतील हिपॅटोसाईट्स पेशीतून सोमॅटोमेडीन (IGF), अन्जिओ टेंसिनोजन, थ्रोम्बोपायोटिन आणि हेपसिडीन ही संप्रेरके स्रवतात.

कार्य:

  1. सोमॅटोमेडीन (IGF), संप्रेरकामुळे पेशींची वाढ आणि विकास नियंत्रित केला जातो.
  2. थ्रोम्बोपायोटिन मुळे रक्तपट्टिकांच्या निर्मितीत मदत केली जाते.
  3. हेपसिडीनमुळे लोह क्षाराचे अवशोषण वाढते.

9) स्वादुपिंड ग्रंथी (Pancreatic Gland):

ही ग्रंथी आपल्या शरीरात स्वादुपिंडामध्ये आढळते. ही ग्रंथी आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स या ऊतींपासून बनलेली असते. ही ग्रंथी अंतःस्त्रावी तसेच बाह्यस्त्रावी आहे. या ग्रंथीतील बीटा पेशी इन्सुलिन नावाचे संप्रेरक स्त्रवतात. तर अल्फा पेशी ग्लुकॅगॉन तसेच सोमॅटोस्टॅटिन नावाचे संप्रेरके स्त्रवतात.

कार्य:

  1. इन्सुलिनमुळे आपल्या शरीरात रक्तातील ग्लुकोजचे अवशोषण करून त्याचे चयापचय नियंत्रित केले जाते.
  2. जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते, तेव्हा ग्लुकॅगॉनमुळे यकृतामधून रक्तात ग्लुकोज मिसळला जातो.
  3. सोमॅटोस्टॅटिनमुळे इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन यांचे स्रवण वाढविले जाते.

10) वृक्क ग्रंथी (Renal Gland):

आपल्या शरीरात दोन वृक्क ग्रंथी आपल्या दोन्ही वृक्कामध्ये असतात. त्यातून रेनिन, एरिथ्रोपायोटीन, कॅल्सीट्रायॉल संप्रेरके स्त्रवतात.

कार्य:

  1. एरिथ्रोपायोटीनमुळे तांबडया रक्तपेशींची निर्मिती वाढविली जाते.
  2. कॅल्सीट्रायॉल हे जीवनसत्व D-3 चे एक स्वरूप असून त्यामुळे कॅल्शिअम आणि फॉसफरस यांचे अवशोषण वाढविले जाते.

11)  वृषण ग्रंथी (Testes Gland):

ही ग्रंथी पुरुषांमध्ये उदरगुहेबाहेर वृषणकोशात आढळते. या ग्रंथीतून टेस्टोस्टेरॉन/ अँड्रोजेन, इस्ट्राडायॉल आणि इनहिबीन ही संप्रेरके स्त्रवतात.

कार्य:

  1. टेस्टोस्टेरॉनमुळे पुरुषांमध्ये शारीरिक परिपक्वता निर्माण होऊन शुक्रपेशींच्या निर्मितीसाठी मदत केली जाते.

12)  अंडाशय ग्रंथी (Ovary Gland):

ही ग्रंथी स्त्रियांमध्ये उदरगुहेमध्ये दोन्ही बाजूंना आढळते. यामधून प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन ही संप्रेरके स्त्रवतात.

कार्य:

  1. प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांमुळे स्त्रियांमध्ये अंडपेशी, प्रसूती, मासिकपाळी आणि दुग्धनिर्मिती इ. क्रिया नियंत्रित केल्या जातात.
  2. इस्ट्रोजन संप्रेरकामुळे स्त्रियांमध्ये शारीरिक परिपक्वता तसेच गुणधर्म निर्माण होतात.

बाह्यस्रावी ग्रंथी (Exocrine Glands):

बाह्यस्त्रावी ग्रंथी आपल्या शरीरात विशिष्ट पदार्थाचे स्रवण करतात. तसेच त्यांच्या वहनासाठी नलिका असते या ग्रंथी आपल्या शरीराच्या आत किंवा शरीराच्या पृष्ठ भागावर असतात.

१) घाम ग्रंथी (Sweat Gland):

या ग्रंथी आपल्या शरीरात त्वचेमध्ये असून नलिकांच्या स्वरूपात असतात. यांच्यामधून घामाचे उत्सर्जन होते. घामामध्ये रक्तद्रव्यातून उत्सर्जित झालेल्या सोडीयम क्लोराईडचे द्रवरूप क्षार असतात. घामग्रंथीचे इक्राइन आणि अँपोक्राइन हे दोन प्रकार पडतात.

A) इक्राइन घाम ग्रंथी (Eccrine Gland): या ग्रंथी आपल्या शरीरात सर्व ठिकाणी असून विविध भागात त्यांची घनता भिन्न असते. या ग्रंथींचा उपयोग शरीरामध्ये प्राथमिक अवस्थेत प्रशीतक म्हणून होतो.

B) अँपोक्राइन घाम ग्रंथी (Apocrine Gland): या ग्रंथी आपल्या आकाराने मोठया असून बहुदा काखेत, कान आणि पापण्यामध्ये आढळतात. यामधून घाम आणि तेलकट स्रावाचे उत्सर्जन होत असते.

२) लाळ ग्रंथी (Salivary Gland):

या ग्रंथी आपल्या घशामध्ये आढळतात. या ग्रंथीमधून लाळ स्रवली जाते. तसेच अमायलेज/टायलिन नावाचे विकर स्त्रवले जाते. त्या विकरामुळे पिष्टमय पदार्थांचे विघटन होऊन माल्टोजमध्ये रूपांतर केले जाते. लाळ ग्रंथीचे कर्णमूल ग्रंथी, अधोहनू ग्रंथी आणि अधोजीव्हा ग्रंथी हे तीन प्रकार पडतात.

A) कर्णमूल ग्रंथी (Parotid Gland):  हा लाळ ग्रंथीचा मुख्य प्रकार आहे यातून लाळ स्रवली जाते. लाळेमुळे अन्नपदार्थ ओलसर बनून घास गिळण्यास मदत होते.

B) अधोहनू ग्रंथी (Submandibular Gland): या ग्रंथी लाळ ग्रंथीचा मुख्य भाग असून जबडयाच्या खाली असतात. या ग्रंथीतून म्युकस आणि सिरस स्त्राव स्रवला जातो. हे स्त्राव 70% लाळ तयार करतात.

C) अधोजीव्हा ग्रंथी (Sublingual Gland): ही ग्रंथी लाळ ग्रंथीचा मुख्य प्रकार असून जिभेच्या आत आढळतो यातून म्युकस हा पदार्थ स्त्रवतो. लाळेमध्ये या स्रावाचे प्रमाण 5% असते.

३) सस्तनी ग्रंथी (Mammary Gland):

  • अशा प्रकारच्या ग्रंथी सस्तनी वर्गातील मादी सजीवांना असतात
  • सस्तनी ग्रंथीतून दुग्धनिर्मिती होते व त्यामुळे नवजात शिशूचे पोषण होते.
  • या ग्रंथी पोकळ असून त्यात वायुकोष असतात. वायुकोषामध्ये दूध स्रवणाऱ्या घनाकृती पेशी असतात व त्या पेशींभोवती बाह्यअभिस्तर पेशींचे आवरण असते.
  • ‘विविध वायुकोश एकमेकांना जोडून पिशवीसारखी रचना तयार करतात व त्यामध्ये लॅक्टीफेरस नलिका असतात.
  • गरोदरपणात या ग्रंथींमधून प्रोलॅक्टिन, इस्ट्रोजन, आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकात वाढ होऊन दुग्ध निर्मितीची सुरुवात होते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *