जपानमधील क्योटो शहरात जगातील प्रमुख देशांची जागतिक तपमानवाढ व प्रदुषण नियंत्रण यासाठी बैठक झाली या बैठकीला क्योटो प्रोटोकॉल असे संबोधले जाते. सध्याचे तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून त्यामुळे जर पृथ्वीवर असमतोल निर्माण झाल्यास त्याला केवळ मानवजात जवाबदार आहे. ही तमानवाढ मुख्यत्वे हरितवायू परिणामामुळे होत आहे.


जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अमुलाग्र प्रयत्न होण्याची गरज आहे. क्योटो प्रोटोकॉल हा त्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

या प्रोटोकॉलमध्ये अनेक देशांनी मान्य केले आहे की ते २०१५ पर्यंत आपापल्या देशातील हरितवायूंचे उत्सर्जन १९९० च्या पातळीपेक्षा कमी आणतील.

कराराप्रमाणे अनेक देशांनी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु जर्मनी वगळता बहुतेक देशांना या कराराचे पालन करणे अवघड जात आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे हरितवायूंचे उत्सर्जन एवढ्या लवकर कमी करणे म्हणजे आर्थिक प्रगतिला खिळ घालणे. तसेच अमेरिकेसारख्या सर्वात जास्त उत्सर्जन करणाऱ्या देशाने अजूनही या करारावर स्वाक्षरी केलेली नाही

त्यामुळे एकंदरित जागतिक तापमानवाढ सध्यातरी अटळ दिसत आहे. जागतिक तापमानवाढीस मुख्यत्वे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, यूरोप, चीन, जपान हे देश आहेत.

याचे मुख्य कारण त्यांचे मोठ्या प्रमाणावरील उर्जेचा वापर व मोठ्या प्रमाणावरील हरितवायूंचे उत्सर्जन परंतु जागतिक तापमानवाढीस सर्वात जास्त फटका एकंदरित उष्ण कटिबंधीय देशांना जास्त बसणार आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.