लॉर्ड लिटन (१८७६-१८८०)
लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता. म्हणून डिझरायलीने त्याची भारताच्या व्हाइसरॉयपदी १८७६ मध्ये नेमणूक केली.
त्याच्या काळात १८७६-७७ मध्ये मद्रास, मुंबई, पंजाब या भागात दुष्काळ पडला.
या काळात दुष्काळाने ५० लाख व्यक्ती मृत्यू पावल्या व २० लाख हेक्टर जमीन नापीक झाली.
व्हाइसरॉयने दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनेच्या हेतूने स्ट्रची दुष्काळ निवारण समिती नेमली. (अहवाल १८८०).
तिचा अहवाल स्वीकारून सरकारने १८८३ साली दुष्काळ संहिता जाहीर केली.
लिटनच्या उद्दाम धोरणामुळे दुसरे अफगाण युद्ध उद्भवले.
१८७७ साली पहिला दिल्ली दरबार भरवण्यात येऊन राणी व्हिक्टोरियाने भारत सम्राज्ञी हा किताब धारण केल्याचे जाहीर केले.
त्याच्यावर देशी वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवल्याने देशी वृत्तपत्रांवर र्निबध टाकणारा देशी कायदा मार्च, १८७८ मध्ये पास करून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी केली.
अमृतबझार पत्रिका (शिशिर घोष आणि मोतीलाल घोष ) हे देशी वृत्त तेव्हापासून इंग्रजी भाषेत सुरू आहे.
१८७८ मध्ये शस्त्रबंदी कायदा करून विनापरवाना शस्त्र बाळगण्यास बंदी.
लिटनच्या काळात भारतीय मुलकी सेवा कायदा १८७९ पास केला.
आयसीएस परीक्षेचे वय २१ वरून १९ वर्षांवर आणले.
त्याविरुद्ध सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची (आयसीएस पास प्रथम भारतीय व्यक्ती) इंडियन असोसिएशनच्या वतीने जनजागरण मोहीम.