व्हाइसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक (१८७२-१८७६)

१८५३ मध्ये लॉर्ड नॉर्थब्रुक हा चार्ल्स वुडचा सचिव होता.

१८७२ मध्ये नॉर्थब्रुक व्हाइसरॉय झाला.

लॉर्ड नॉर्थब्रुक हा अनियोजित खाजगी आर्थिक व्यवहार आणि मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कर्ता होता.

बिहार, बंगाल प्रांतात दुष्काळ निवारणार्थ (१८७३-७४) ब्रम्हदेशातून तांदूळ आयात केला.

बंगाल-बिहार दुष्काळ निवारणार्थ नॉर्थब्रुकने ६६ लक्ष पौंड खर्च केले.

त्याच्या काळात पंजाबातील कुका चळवळीचा सामना करावा लागला.

त्याच्याच कारकिर्दीत मुंबईत १८७५ साली आर्य समाज व थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली.

नॉर्थब्रुकची कारकीर्द अफगाण संदर्भात विरोधी धोरणामुळे प्रसिद्ध आहे.

इंग्लंड सत्ताधीशांच्या मतभेदामुळे एक वर्ष आधी मुदतपूर्व राजीनामा दिला.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.