mpsc today logo
mpsc today logo

भारत हा शेतिप्रधान देश असून देशामध्ये महाराष्ट्र शेती मध्ये अग्रेसर आहे. महाराष्ट्रमध्ये ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, तांदूळ ही धान्यपीके तर उस, कापूस, भुईमुग ही नगदी तर मुग, मटकी, तूर व इतर डाळी कडधान्य पिकवली जातात.

महाराष्ट्रातील शेतीसंपत्तीबद्दल थोडी अधिक माहिती:

पडवल हे उन्हाळी चार्याचे पीक महाराष्ट्रमध्ये घेतले जाते
महाराष्ट्राच्या जास्त पर्जन्याच्या प्रदेशामध्ये भात हे पीक घेतले जाते 
पूर्व महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यात संत्र्याच्या बागाखलील क्षेत्र सर्वात जास्त आहे
गहू हे ठंड हवामानातील पीक आहे
काजूचे पीक हे जांभ्या मृदेत चांगले वाढते
कापसाची काळी मृदा रेगुर या नावाने ओळखली जाते
ज्वारी पीकाखालील क्षेत्र व उत्पादन यामध्ये महारष्ट्र राज्य अग्रेसर आहे
ज्वारीच्या पिकासाठी लागणारे हवामान म्हणजे उच्च तापमान व कमी पाऊस
रत्नागिरी जिल्हा हापुस या प्रकारच्या आंब्यांसाठी प्रसिद्द आहे
मृदेतील घटकांचा आलटून पालटुन वापर होऊन मृदेची सुपीकता टिकून रहाते म्हणून शेतकरी पिकांची फेरपालट करतात
 
जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो
कपसाचा दर्जा हा धाग्यांच्या लांबीवरुन ठरतो
महाराष्ट्रातील बाजरीच्या लागवडीखालील क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक येतो
गांडूळामुळे जमिनीचे जैविक गुणधर्म सुधरतात म्हणून कृषीव्यवसायात गांडूळ शेती वरदान ठरली आहे
पीक संयोग म्हणजे, प्रमुख पीक व दुय्यम पीक यांच्यात क्षेत्रीय संबंध प्रस्थापित करणे होय
पाला पाचोळा शेतात पसरून टाकणे म्हणजे खब भाजने होय
महाराष्ट्रातील खरीब हंगामात सर्वात अधिक क्षेत्र तृणधान्ये पिकाखाली असते
महाराष्ट्राच्या एकूण जलसिंचन क्षेत्रपैकि सुमारे ५६% क्षेत्र विहिरीच्या पाण्याने भिजविले जाते
नाइट्रोजनाचे व सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण महाराष्ट्राच्या मृदेत अल्प असल्यामुळे महाराष्ट्रात नाइट्रोजनयुक्त खतांना जास्त मागणी असते
महाराष्ट्रमध्ये पिकांना पुरेसा पाणीपुरवठा नसल्यामुळे येथे दर हेक्टरी उत्पादन कमी आहे
शेती व पशुपालन हे महत्त्वाचे मिश्र शेतीचे उदाहरण आहे
बागायती शेती म्हणजे केवळ एकच प्रकारच्या पिकाचे उत्पादन
जगतिकीकरणामुळे कापसाच्या किंमती खाली आल्यामुळे विदर्भातील अनेक शेतकरी आत्महत्येच्या आहारी गेले
अतिरिक्त जलसिंचनामुळे पानथळ प्रदेशाची निर्मिती होते
महाराष्ट्रात ज्वारी पिकविणारा प्रदेश प्रामुख्याने गोदावरी-भीमा नदीच्या खोरे भागात आहे
पावसाळ्यात वाढणारी पीके म्हणजे खरीप पीके तर हिवाळ्यात वाढणारी पीके म्हणजे रब्बी पीके
पाणीपुरवठा करुण दिली जाणारी शेती म्हणजे बागायती शेती

कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते पीक प्रामुख्याने घेतले जाते किंवा कोणत्या पिकाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे,

महाराष्ट्रात एकूण ज्वारीच्या क्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे
महाराष्ट्रात ज्वारीचे सर्वात कमी क्षेत्र भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात आहे
महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे क्षेत्र ६०% तर खरीप ज्वारीचे क्षेत्र ४०% आहे
महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे क्षेत्र नांदेड़ जिल्ह्यात तर रब्बी ज्वारीचे क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त आहे
त्याचप्रमाणे ज्वारीच्या हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांक बुलढाणा जिल्ह्याचा तर हेक्टरी उत्पादनात सर्वात शेवटचा क्रमांक सोलापूर जिल्ह्याचा
महाराष्ट्रमध्ये ज्वारीचे सर्वात कमी उत्पादन धुळे-नंदुरबार जिल्ह्यात होते
भारतामध्ये महाराष्ट्राचा ज्वारीच्या क्षेत्र व उत्पादनमध्ये ४० ते ४५ टक्के वाटा आहे
महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे क्षेत्र कोकणात ठाणे जिल्ह्यात तर सर्वात कमी क्षेत्र बुलढाणा जिल्ह्यात आहे
तांदळाचे सर्वात जास्त उत्पादन ठाणे जिल्ह्यात तर सर्वात कमी उत्पादन अकोला व वाशीम जिल्ह्यात होते
महाराष्ट्रात भाताचे सर्वात जास्त हेक्टरी उत्पादन कोल्हापूर होते
भारतीय पातळीवर भाताच्या क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ३ टक्के आहे
महाराष्ट्रात गव्हाचे सर्वात जास्त क्षेत्र व सर्वात जास्त उत्पादन अहमदनगर जिल्ह्यात होते
महाराष्ट्रात बाजारीचे सर्वात जास्त हेक्टरी उत्पादन जालना जिल्ह्यात होते
भारतीय बजारीच्या २३% उत्पादन महाराष्ट्रात होते
महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊसाचे क्षेत्र व उत्पादन कोल्हापूर जिल्ह्यात आहे
महाराष्ट्रात ऊसाचे सर्वात जास्त हेक्टरी उत्पादन सांगली जिल्ह्यात तर सर्वात कमी हेक्टरी उत्पादन बीड जिल्ह्यात आहे
महाराष्ट्रात कापसाचे क्षेत्र सुमारे भारताच्या ३४% तर एकूण उत्पादनाच्या १५% आहे
महाराष्ट्रात तेलबियांचे सर्वात जास्त क्षेत्र नागपूर जिल्ह्यात आहे
महाराष्ट्रात नारळाचे सर्वात जास्त उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे
महाराष्ट्रात आंब्यांचे सर्वात जास्त उत्पादन रत्नागिरी जिल्ह्यात आहे
महाराष्ट्रात केळीचे सर्वात जास्त उत्पादन जळगाव जिल्ह्यात आहे
महाराष्ट्रात काजूचे सर्वात जास्त उत्पादन कोकण विभागात तर सिंधुदुर्ग जिल्हा कोकणात काजू उत्पादनात अग्रेसर आहे
महाराष्ट्रात संत्र्याचे सर्वात जास्त क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे
महाराष्ट्रात सर्वात जास्त द्रक्षांचे क्षेत्र नाशिक जिल्ह्यात तर आहे
सज्यात सर्वात जास्त मोसंबीचे क्षेत्र जालना जिल्ह्यात आहे
महाराष्ट्रात सोलापुर जिल्ह्यात डाळिंब उत्पादनात अग्रेसर आहे
महाराष्ट्रात फळांचे सर्वात जास्त क्षेत्र रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे
महाराष्ट्रात सर्वात जास्त फळ बागमध्ये क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.