भारतीय जलमार्ग प्राधिकरणाने भारतातील प्रमुख बंदरांचे ३ गटात वर्गीकरण केले आहे, मोठी बंदरे, मध्यम बंदरे, लहान बंदरे.

भारताला जवळपास ७५१६.६ किमीचा समुद्र किनारा लाभला असून भारतातील महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, गोवा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल ह्या ९ राज्यांमध्ये विस्तारला आहे.

एकूण ९ राज्यांमध्ये १३ प्रमुख बंदरे असून २०० हून अधिक मध्यम व लहान बंदरे आहेत.


१३ प्रमुख बंदरांपैकी १२ सरकार चलित बंदरे असून भारतामध्ये फक्त चेन्नईमधील एन्नोर बंदर हे सहकर तत्वावर चालविले जाते.

भारतातील १२ प्रमुख बंदरे असून पश्चिम किनारपट्टीवर सहा बंदरे आहेत:

१. जवाहरलाल नेहरू बंदर (महाराष्ट्र):

पश्चिम घाटावर कोकणातील मुख्यभूमीवर वसलेले जवाहरलाल नेहरू पोर्ट हे भारतातील सर्वात मुख्य बंदर आहे. किंग ऑफ पोर्ट्स असे संबोधिले जाणारे हे अरबी समुद्रामधील मुख्य बंदर आहे.

त्याचप्रमाणे हे बंदर अंतरराष्ट्रिय कंटेनर हाताळणारे देशातील अग्रेसर बंदर आहे. ह्या बंदरातून यांत्रिक वस्तु, रसायने, खाद्य तेल, फळे, दुग्धजन्य पदार्थ ह्यांचे मोठया प्रमाणात निर्यात होते.

जवाहरलाल नेहरू बंदर हे भारतील सर्वात जास्त कंटेनर हाताळनारे बंदर आहे. हे बंदर पूर्वी न्हावा-शेवा पोर्ट नावाने ओळखले जात होते.


२. मुंबई बंदर (महाराष्ट्र):

पश्चिम मुंबईच्या मुख्यभूमीवर वसलेले मुंबई बंदर हे  भारतातील सर्वात मोठे बंदर आहे.

हे भारतातील जुन्या बंदरांपैकी एक असून मोठया प्रमाणात होणाऱ्या माल वाहतुकीसाठी सक्षम आहे, ह्या बंदरातून रसायने, कच्चे तेल त्याचप्रमाणे इतर पेट्रोलियम उत्पादने यांची मोठया प्रमाणात आयात होते.

पूर्वी आयात होणारे कंटेनर ह्याच बंदरावर येत असत परंतु मुंबईनजिक नव्याने सुरु करण्यात आलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्टवर ही वाहतूक वळविण्यात आली आहे.


३. मार्मागोवा बंदर (गोवा):

मार्मागोवा बंदर हे गोव्यातील प्रमुख बंदर असून गोव्याच्या दक्षिण भागात आहे हे एक उत्तम नौसर्गिक बंदर आहे.

मार्मागोवा बंदरातून लोहखनिज निर्मितीसाठी लागणारे कच्चे लोहखनिज व इतर कच्चा माल निर्यात केला जातो.

गोव्यातील अंतरराष्ट्रीय विमानतळ डाबोलिम, वास्को दा गामा शहराप्रमाणेच मार्मागोवा बंदर हे प्रवाश्यांचे विशेष आकर्षणाचे ठिकाण आहे.

हे नौसर्गिक बंदर सुरुवातीच्या काळातील भारतातील सर्वाधिक आधुनिक बंदर होते.


४. पनम्बुर बंदर (कर्नाटक):

पनम्बुर बंदर हे नवीन मंगलोर बंदर नावाने ही ओळखले जाते.

हे बंदर कर्नाटकमधील दक्षिण कन्नड़ा जिल्ह्यामध्ये आहे.

पनम्बुर हे नैसर्गिक बंदर असून कर्नाटकातील सर्वात मोठे बंदर आहे. पनम्बुर बंदरामधून मैग्नेशियम, ग्रेनाइट, कॉफी आणि काजू यांचे मोठया प्रमाणात निर्यात होते तर बांबू, नौसर्गिक वायु, पेट्रोलियम उत्पादने, कंटेनर यांची मोठया प्रमाणात आयत होते.

पनम्बुर बंदराच्या दक्षिणेला सुंदर असा अरबी समुद्राचा किनारा आहे आणि प्रवाश्यांची येथे सतत रेलचेल असते.


५. कोचीन बंदर (केरळ):

कोचीन हे भारतातील प्रमुख बंदरांपैकी एक असून अरबी समुद्रामध्ये वसलेल्या बंदरापैकी प्रमुख बन्दर आहे.

कोचीन येथे भारत पेट्रोलियमची कोचीन रिफायनरी असल्यामुळे नौकाविहारासाठी तयार करण्यात आलेले हे बंदर आहे.

त्याचप्रमाणे कोचीन मसाल्याच्या पदार्थांसाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध आहे.


६. कांडला बंदर (गुजरात):

कच्छच्या आखातामध्ये वसलेले हे बंदर भारतातील त्याचप्रमाणे आशिया खंडातील पाहिले विशेष आर्थिक क्षेत्र अर्थातच स्पेशल इकॉनोमिक झोन आहे.

रसायने, पेट्रोलियम उत्पादने, लोखंड यांचे येथे मोठया प्रमाणात आयात होते तर धान्य, मीठ, कापड यांचे निर्यात होते. उत्पादनाच्या बाबतीत हे देशातील अग्रेसर बंदरांपैकी एक आहे.

गुजरातमधील मुंद्रा बंदर हे भारतातील सर्वात मोठे खाजगी बंदर आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.