मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा – II

प्रश्न १: हरि-हर या शब्दात कोणते चिन्ह वापरले?

१) प्रश्नचिन्ह*
२) उद्गारवाचक चिन्ह
३) संयोगचिन्ह
४) अवतरण चिन्ह

उत्तर: ३

प्रश्न २: ‘कर्णमधुर’ याचा विरूध्दार्थी शब्द कोणता?

१) कर्णपटू
२) कमाल
३) कृपण
४) कृश

उत्तर:  १

प्रश्न ३: पुढील वाक्प्रचार व अर्थाच्या जोड्यांमधून अयोग्य जोडी ओळखा

१) पालथ्या घागरीवर पाणी – निष्फळ श्रम
२) त्राटिका – कजाख बायको
३) कळीचा नारद- भांडणे लावणारा
४) उंबराचे फूल – नेहमी भेटणारी व्यक्ती

उत्तर: ४

प्रश्न ४: दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते, तेथे माझी निर्मिती होते.

१) यमक
२) उत्प्रेक्षा अलंकार
३) उपमा अलंकार
४) अनुप्रास अलंकार

उत्तर: ३

प्रश्न ५: आमच्या गावचे पाटील कर्णासारखे दानशूर आहेत. यातील अलंकार ओळखा

१) उपमा
२) उत्प्रेक्षा
३) दृष्टांत
४) रूपक

उत्तर: १

प्रश्न ६: ‘मराठी भाषा गुदमरते आहे.’ विधेय ओळखा

१) मराठी
२) भाषा
३) गुदमरते आहे
४) यांपैकी नाही

उत्तर: ३

प्रश्न ७: होकार, प्रतिकार, करू, करून यांसारखे शब्द बनवितात त्यांना ………. म्हणतात

१) तत्सम शब्द
२) प्रत्यय
३) सिध्द शब्द
४) साधित शब्द

उत्तर: ४

प्रश्न ८: संकटात सापडलेली मी देवाची प्रार्थना करीत होते. या वाक्यातील काळ ओळखा?

१) साधा भूतकाळ
२) पूर्ण भूतकाळ
३) अपूर्ण भूतकाळ
४) रीति भूतकाळ

उत्तर: ३

प्रश्न ९: ‘ईण’ प्रत्यय लागून तयार झालेले स्त्रीलिंगी प्राणीवाचक शब्द ओळखा

१) वानर
२) माळी
३) सुतारीण
४) बेडकी

उत्तर: ३

प्रश्न १०: समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात?

१) अनेक शब्द, पदे
२) एक शब्द व अनेक पदे
३) दोन शब्द किंवा पदे
४) ठराविक शब्दच असतात

उत्तर: ३

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *