National Rural Livlihood Mission – NRLM
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान
योजनेची सुरुवात –
3 जून, 2011
योजनेत कार्यवाही –
अकरावी पंचवार्षिक योजना
उद्देश –
ग्रामीण भागांमध्ये दारिद्र्य निवारण करणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. ही योजना राजस्थानच्या बंसवारा जिल्ह्यात सुरू करण्यात आली.
या योजनेत केंद्र शासन हिस्सा 75% तर राज्य शासन 25% आहे.
ग्रामीण भागातील गरिबातील गरीब विधवा व परित्यक्ता महिला, अपंग, अनुसूचित जाती /जमाती, अल्पसंख्यांक, वयोवृद्ध, आदिवासी इत्यादी सारखे दुर्लक्ष घटकांची लोकसहभागातून गरिबी निर्धारण या प्रक्रियेतून करण्यात येणार आहे.
या अभियानात संवेदनशील सहाय्यक रचना, सर्वसमावेशक सामाजिक सहभाग, दारिद्र्यरेषेखालील रोजगारीचे उन्नती करण, मागणी आधारित योजना, प्रशिक्षण क्षमता बळकटीकरण, फिरता निधी व अर्थसहाय्य, व्याजदरासाठी अनुदान, अन्य योजनांचे एकत्रीकरण व समन्वय आणि कौशल्यवृद्धी, नोकरी देणारे प्रशिक्षणाचे विशेष प्रकल्प हे घटक महत्त्वाचे आहेत.
बचत गट सक्रिय राहण्याच्या दृष्टीने बचत गटातील सदस्यांनी कायम दिलेल्या दशसूत्री चा अवलंब केला जातो.
सामाजिक विकासासाठी नियमित आरोग्याची काळजी घेणे, शिक्षण विषयक जागरुकता वाढविणे, पंचायतराज संस्थांनी बरोबर नियमित सहकार्य, शासकीय योजनांमध्ये नियमित सहभाग, शास्वत उपजीविकेसाठी उपाययोजना या पंचसूत्रीचा अवलंब होतो.
स्वयंसहाय्यता गटास जर सामुहिक व्यवसाय सुरू करायचा असेल तर कर्ज मागणी करता येऊ शकते.गटातील वैयक्तिक सदस्याला देखील व्यवसाय कर्ज मिळणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबासाठी ‘एक कुटुंब एक नोकरी’ निर्माण करणारे स्वयंरोजगार व कौशल्य वृद्धि व्यवसाय प्रशिक्षण देणे. शिवाय कुशल मनुष्यबळ निर्माण करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अभियाना व्यवस्थापक (ग्रामीण विकास यंत्रणा) किंवा तालुका अभियान व्यवस्थापक (तालुका पंचायत समिती) यांच्याकडे संपर्क साधावा.