NATIONAL SOCIAL ASSISTANCE PROGRAMME
NATIONAL SOCIAL ASSISTANCE PROGRAMME

योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 1995

योजनेत कार्यवाही आठवी पंचवार्षिक योजना

उद्देश समाजातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना लाभ प्राप्त करून देणे

या योजनेत पुढील योजना समाविष्ट आहेत

  1. राष्ट्रीय वृद्धावस्था पेंशन योजना (NAOPS)

65 वर्षापेक्षा अधिक वयाच्या सर्व व्यक्तींना 75 रुपये महिना वृद्धावस्था पेंशन योजना देणे, जी सध्या वाढवून 400 रुपये महिना करण्यात आली आहे.

2) राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (NFBS)

कुटुंबातील कुटुंबप्रमुखाच्या साधारण मृत्यू झाल्यास 5,000  रुपये व अपघाती मृत्यू झाल्यास 10,000 रुपये राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत मदत म्हणून देण्यात येते.

3) राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना (NMBS)

19 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या स्त्रियांना मातृत्व पूर्व व मातृत्व नंतर पोषण आहारासाठी रुपये 500 रुपयाची वित्तीय मदत दिली जाते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.