निर्मल भारत अभियान - https://www.mpsctoday.com/

सुरुवात :- भारत सरकारद्वारे 2002 मध्ये सुरू करण्यात आलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाचे 2012 मध्ये नाव बदलून निर्मल भारत अभियान करण्यात आले

उद्देश शौचालय बांधून व त्याद्वारे उघड्यावरील उत्सर्गाची पद्धत पूर्णपणे बंद करून आरोग्य व स्वच्छतेचे प्रोत्साहन देणे

निर्मल भारत योजनेअंतर्गत स्वतंत्र शौचालय बांधण्याकरिता दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्रोत्साहन मदत दिली जाते

आता दारिद्र रेषेवरील अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंबे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी घर असलेले भूमिहीन मजूर शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे यांच्यासाठी योजना लागू केली आहे

प्रति सौचालय बांधकामाची किंमत 5500 ( रुपये 6000 डोंगराळ व अति दुर्गम भागासाठी) निर्धारित केली आहे व त्यावरील केंद्रशासनाच्या वाटा 3:2 ( रुपये 3700 डोंगराळ व अति दुर्गम भागासाठी) राज्य शासनाचा वाटा 1400 व लाभार्थ्यांची योगदान 900 याप्रमाणे आहे

या अभियानांतर्गत नोव्हेंबर 2012 पर्यंत 71.72 लाख स्वतंत्र कौटुंबिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे

निर्मल भारत अभियानांतर्गत केंद्र व राज्य सरकार यांच्या शाळा व अंगणवाड्यांच्या शौचालयाच्या खर्चातील हिस्सा 70:30% या प्रमाणात आहे प्रति शौचालयाची शाळेकरिता किंमत 35,000 (38,500 दुर्गम भागासाठी) व अंगणवाडी करिता रुपये 8000 ( रुपये 10, 000 दुर्गम भागासाठी) निर्धारित केली आहे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.