महाराष्ट्रातील पंचायतराज (महत्वाचे प्रश्न)
महाराष्ट्रातील पंचायतराज (महत्वाचे प्रश्न)

👉 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज……..सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
स्थानिक स्वराज्य संस्था

राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
2 ऑक्टोबर 1953

बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली?
16 जानेवारी 1957

बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती?
वसंतराव नाईक समिती

वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती?
27 जून 1960

वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते?
महसूल मंत्री

वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
226

वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
जिल्हा परिषद

पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
1 मे 1962

‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
7 ते 17

ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
जिल्हाधिकारी

ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
जिल्हाधिकारी

ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
5 वर्षे

ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
पहिल्या सभेपासून

ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
तहसीलदार

सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
विभागीय आयुक्त

उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
सरपंच

सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
पंचायत समिती सभापती

पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
दोन तृतीयांश (2/3)

महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
तीन चतुर्थांश (3/4)

पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
पंचायत समिती सभापती

पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
जिल्हा परिषद अध्यक्ष

जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
संबंधित विषय समिती सभापती

जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
जिल्हा परिषद अध्यक्ष

जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
विभागीय आयुक्त

कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
ग्रामसेवक

ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
जिल्हा परिषदेचा

ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
ग्रामसेवक

ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
राज्यशासनाला

सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
विस्तार अधिकारी

गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
ग्रामविकास खाते

जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
जिल्ह्याचे पालकमंत्री

जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
जिल्हाधिकारी

जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
दहा (स्थायी+9 विषय समित्या)

जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
जिल्हा परिषद अध्यक्ष

महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
वसंतराव नाईक

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.