प्रधानमंत्री रोजगार योजना
प्रधानमंत्री रोजगार योजना

योजनेची सुरुवात – 2 ऑक्टोबर, 1993

योजनेत कार्यवाही – आठवी पंचवार्षिक योजना

उद्देश – शिक्षित बेरोजगार तरुणांना व्यापारिक देवाण-घेवाणीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करणे.

या योजनेअंतर्गत 18 ते 35 वर्षे वयोगटातील (पूर्वेकडील राज्यात 18 ते 40 वर्षे वयोगट, एससी/ एसटी, शारीरिक अपंग व महिला यांच्यासाठी 10 वर्षे अधिक) तरुणांना जे 8वी पर्यंत शिक्षित आहेत, त्यांना व्यापारिक देवाण-घेवाणीसाठी 1 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करण्याची व्यवस्था करण्यात आली.

या योजनेंतर्गत 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी भागीदारीत व्यवसाय सुरू केल्यास, त्यास 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करण्याची व्यवस्था करण्यात आली.

या योजनेंतर्गत 1 लाखापर्यंतच्या योजनेसाठी कोणत्याही जमिनीची, गॅरंटी ची आवश्यकता असणार नाही.

ही योजना केंद्रीय उद्योग मंत्रालयाद्वारे कार्यान्वित केली जात आहे.

या योजनेंतर्गत अनुसूचित जाती /जमाती साठी 22.5% व इतर मागास समाजासाठी 27% आरक्षण देण्यात आले आहे.

1 एप्रिल, 1994 पासून ही योजना शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांसाठी सुरू करण्यात आली.

15 ऑगस्ट, 2008 रोजी ही योजना प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आली.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.