१७५७ ते १८५७ या शतकाच्या काळात इंग्रजांनी आपला साम्राज्यविस्तार करताना अनेक सत्ताधीश, जहागिरदार, जमींदार तसेच सामान्य शेतकरी, कारागीर यांना दुखविले. १८५७ पूर्वीदेखील अशा असंतुष्टाचे उद्रेक होत होतेच, मात्र डलहौसीच्या आक्रामक विस्तारवादी धोरणामुळे यात भर पडली आणि १८५७ मध्ये कंपनी सरकारविरुद्ध व्यापक उठाव झाला.

१८५७  च्या उठावाची पार्श्वभूमी:यामध्ये १८५७ पूर्वी भारतात इंग्रजाविरुद्ध झालेल्या उठावांच्या मलिकांची थोड़ी चर्चा

१७६३ ते १७८० या काळातील बंगाल प्रांतातील सन्याशांचे व फकिरांचे बंड. १७ वर्षे चाललेल्या या बंडास शेतकर्यांचा पाठिंबा मिळाला
बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत सन्याश्यांच्या उठावाचे वर्णन आढळते
१७६५ ते १७८६ या काळात बंगालमधील मिदानपुर जिल्ह्यात चुआर येथे आदिवासींचे दोन उठाव झाले
महाराष्ट्रात उमाजी नाइक यांनी रामोशांना एकत्रित करुण इंगरजविरुद्ध केलेला उठाव
आंध्र प्रदेशातील पाळेगारांचे उठाव १८४४ मधील कोल्हपुए येथील गडकरी लोकांचा उठाव
उत्तर भारतातील जाटांचे, राजपूतांचे, बुंदेल्यांचे उठाव
विदर्भ, खानदेशातील आदिवासींचे उठाव
छोटा नागपुर भागातील कोलामांचा उठाव (१८२७)
बिहार मधील संथालाचा उठाव (१८५५)
मलबारमधील मोपला शेतकर्यांचा उठाव
 
ओरिसातील गोंडांचा उठाव (१८०७-१८१७)
बंगालमधील पागलपंथी व फरेजी अनुयायांचे बंड
वेल्लोरचे बंड: कंपनीच्या लष्करविषयक धोरणांमुळे असंतुष्ट झालेल्या भारतीय सैनिकांनी १८०६ मध्ये मद्रास प्रांतातील ‘वेल्लोर’ येथे मोठा उठाव केला. इंग्रजांविरुद्ध त्यांच्याच सेनेतील भारतीय सैनिकांचा हा पहिला मोठा उठाव होय.
१८२४ मध्ये बराकपुर छावणीतील भारतीय शिपयानीही अशाच उठावाचा प्रयत्न केला. हे सर्व उठाव दडपले गेले असेल तरी इंग्रजांविरुद्ध सातत्याने संघर्षाची भावना जागृत ठेवण्याचे काम या उठावनी केले.
असाममधील अहोम सरदारांचे बंड (१८२८-१८३३)

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.