सागरमाला प्रोजेक्टची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे 14 एप्रिल 2016 रोजी मुंबई येथे झालेल्या मेरीटाइम इंडिया कार्यक्रमावेळी करण्यात आली.
सागरमाला प्रोजेक्ट अंतर्गत निळ्या क्रांतीतील महत्त्वपूर्ण बदलाबरोबर बंदर आधारित विकास वाढीस चालना देण्यात येणार आहे.
सागरमाला प्रोजेक्ट उद्देश
योजनेचा प्रमुख उद्देश बंदराच्या जवळ प्रत्यक्ष अप्रत्यक्षविकासास प्रोत्साहन देणे
बंदरापर्यंत मालाची गती सुरक्षा व कमी खर्चात ने-आण करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे
याअंतर्गत प्रतिकृती बरोबर विकासाच्या नवीन क्षेत्रात विकास करणे व महत्त्वपूर्ण प्रतिकृतीस प्रोत्साहन देणे
मुख्य बाजारापर्यंत संपर्क वाढविणे त्याचबरोबर रेल्वे क्षेत्रीय व रस्ते सेवांमध्ये सुधारणा करणे
भारताच्या जीडीपीमध्ये वाणिज्यिक वस्तूंचे व्यापार प्रमाण 42% आहे, ते वाढवून 70 -75% करणे
सागरमाला प्रोजेक्ट अंतर्गत क्षेत्र
बंदरांचे आधुनिकीकरण
- पाच-सहा नवीन बंदरांची निर्मिती करणे
- बंदरांची क्षमता वाढविणे
- बंदरांची खोली वाढविणे
बंदरांच्या मध्ये संपर्क
- किनारपट्टी क्षेत्र वाहतूक मजबूत बनविणे
- भारतीय रेल्वे मंत्रालयाने 20 हजार कोटी रुपयांची पोर्ट रेल्वे संपर्क बनवून mall भाडे खर्च कमी करण्यास प्रोत्साहन दिले आहे
बंदर आधारित विकास
- किनारपट्टी रेषे बरोबर औद्योगिक आणि निर्यात विकासास गती देणे
- किनार पट्टी रेषेजवळील किनारपट्टी आर्थिक क्षेत्राबरोबर बंदर विकास साध्य करणे
किनारपट्टी सामुदायिक विकास
- मासेमारी करणारे व इतर किनारपट्टी समुदायास रोजगार उपलब्ध करणे
- भारतीय किनारपट्टीजवळील द्वीपांचा बेटांचा विकास करणे
इतर क्षेत्र
- किनारपट्टी पर्यटन व मनोरंजन संबंधी कार्यक्रमास प्रोत्साहन देणे
- छोटी समुद्री जहाज किनारपट्टी जहाज वाहतूक व अंतर्देशीय जलमार्ग वाहतूक वाढीस लागणे
- जहाज निर्माण, जहाज दुरुस्ती व जहाज पूर्ण बांधणीस प्रोत्साहन देणे
- लॉजिस्टिक पार्क गोडाऊन समुद्री सेवा निर्माण करणे
- Sagarmala project अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ शिपिंग द्वारे 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल
- Sagarmala project अंतर्गत 6 मोठ्या बंदरांचा विकास करण्यात येईल
- Kerala व्हिजन इंटरनॅशनल सी बोर्ड