Sahaj Yojana
Sahaj Yojana

सहज योजना (Sahaj Yojana)

सहज योजनेचि सुरवात 30 ऑगस्ट, 2015 रोजी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उदघाटन करून करण्यात आली.

 

– सहज योजनेचा उद्देश – LPG  सिलिंडर ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध करून देणे.

– सहज योजनेअंतर्गत ऑनलाईन LPG सिलेंडर बुकिंग केल्यानंतर 10 दिवसानंतर गॅस कनेक्शन ग्राहकास उपलब्ध करण्यात येईल. यामध्ये गॅस शेगडी, रेग्युलेटर, सिलिंडर टाकी इत्यादी साहित्य घरपोच उपलब्ध करण्यात येईल.

– सहज योजने अंतर्गत उपलब्ध साहित्याचे पेमेंट ग्राहक ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही मार्गानी करू शकेल.

– या योजनेअंतर्गत ग्राहक LPG सिलिंडर बुकिंग www.mylpg.in या संकेतस्थळावरून करू शकेल. यासाठी ग्राहकास आपल्या ठिकाणांचा पत्ता व ओळखपत्र स्कॅन करून फॉर्मबरोबर डाऊनलोड करणे गरजेचे राहील.

– सहज योजना प्राथमिक स्वरूपात देशातील 13 शहरामध्ये (दिल्ली, भोपाळ, अहमदाबाद, भुवनेश्वर, बंगळूर, चंदीगड, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, लखनऊ, मुंबई, पाटना व पुणे ) लागू करण्यात आली आहे.

सहज योजने अंतर्गत सध्याच्या 16.5 कोटी LPG कनेक्शनची संख्या 2018 डिसेंबरपर्यंत 10 कोटींनी वाढविण्याचे लक्ष्य केंद्र सरकारद्वारे जाहीर करण्यात आले.

– सहज LPG कनेक्शन योजनेचा लाभ देशभरातील भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी ग्राहक घेऊ शकतील.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.