शिवनेरी किल्ला ३५०० फूट उंचीचा असून हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. भारत सरकारने या किल्ल्याला २६ मे १९०९ मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला आहे.
किल्ल्याच्या चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे.
किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर (शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते) व जीजाबाई आणि बाल शिवाजी यांची प्रतिमा आहे.
शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे.
जुन्नरमध्ये शिरताच शिवनेरीचे दर्शन होते.
१६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुठुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
शिवनेरी किल्ल्याचा आकार पिंडिसारखा आहे. हा किल्ला १६३७ पर्यंत मराठ्यांचा अधिपत्त्याखाली होता तर १६३७ ते १७१६ पर्यंत मुघलांकडे होता.
१७१६ ते १८२० पुन्हा मराठे तर १८२० ते १९४७ ब्रिटिश राज आता हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात आहे.
इतिहास:
जुन्नर हे शहर ईसवी सन काळापासून प्रसिद्ध असून जीर्णनगर, जुन्नेर अशा नावाने ओळखले जात होते.
सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर शहर परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
नानेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग असून या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे, यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरुन फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे.
यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गांवरील दुर्गाची निर्मिती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता स्थिरावल्यावर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतल्या.
सातवहनानंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट सत्तेखाली होता.
११७० ते १३०८ च्या सुमारास यादवानी आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरुप प्राप्त झाले.
नंतर १४४३ मध्ये मलिक-उल-माजूर याने यादवांचा पराभव करून किल्ला सर करून किल्ला बहमनी राजवटीखाली आणला.
१४७० मध्ये मलिक-उल-माजुर याचा प्रतिनिधी मलिक महमंद याने किल्ल्याची नाकेबंदी करून किल्ला सर केला.
१४९३ मध्ये त्याने राजधानी शिवनेरीहून अहमदनगरला हलवली.
१५६५ मध्ये सुलतान मुर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला शिवनेरीमध्ये कैद करुन ठेवले.
यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला.
जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वर त्यांच्यासोाबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन आले.
शिवरायांचा जन्म ह्याच गडावर झाला.
१६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला.
१६५० मध्ये मोगलांविरुद्ध जुन्नरमधील कोळ्यांनी बंड केले परंतु मोगलांनी बंड मोडून काढले.
१६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
१६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात आले.
४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला आणि नंतर पेशव्यांकडे हस्तांतरित केला.