सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samridhi Yojana - SSY) - https://www.mpsctoday.com/

योजनेची सुरवात

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी, 2015 रोजी हि योजना सुरु केली.

उददेश –

१) मुलीच्या संदर्भात कुटुंबाचा दृष्टिकोन बदलणे, त्याचबरोबर तिच्या (मुलीच्या) नावाने बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडणे.
२) मुलीच्या उच्च शिक्षणाची आणि विवाहविषयक आर्थिक गरज भागविणे.

 • सुकन्या समृद्धी योजना हरियाणातील पानिपतमध्ये BBBP योजनेबरोबर सुरु करण्यात आली असून SSY हि BBBP योजनेचाच एक भाग आहे.
 • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी बँक खाते उघडले जाणार आहे. हे खाते न्यूनतम 1000 रुपयांत उघडता येते.
 • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत बँक खात्यातील जमेवर 9.1% व्याज दिले जाईल. या खात्यातील रकमेवर उत्पन्न करातून सूट देण्यात आली आहे.
 • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत व्यापारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाती उघडली जातील. या खात्यामध्ये एका वर्षात 1.5 लाखापर्यंत रक्कम जमा केली जाऊ शकते.
 • सुकन्या समृद्धी योजनेतील 50% रक्कम मुलीच्या वयाच्या 18 वर्षानंतर व उर्वरित रक्कम 21 वर्षानंतरच काढता येऊ शकते.
 • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत एक पालक आपल्या केवळ दोन मुलींकरिता हे खाते उघडू शातो आणि दोघींच्या खात्यात एका वर्षात 1.50 लाखापेक्षा अधिक रक्कम जमा करता येणार नाही; मात्र दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्यास 3 मुलींकरिता हे खाते उघडले जाऊ शकते.
 • सुकन्या समृद्धी योजना हि योजना मुलींच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.
 • सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीचे पासबुक काढताना खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
  ) मुलीचा जन्म दाखला
  ब ) ओळखपत्र
  क ) निवासी दाखला
 • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत मुलीच्या परिपक्वतेनंतर यामध्ये जमा झालेली रक्कम हि संबंधित मुलीच्याच मालकीची होते.
 • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत भारतात हे खाते कुठेही काढता येऊ शकते. तसेच सोयीनुसार खाते कुठेही स्थनांतरीत करता येऊ शकते.
 • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत खातेधारक मुलगी वयाच्या 10 वर्षानंतर स्वतःचे आपले खाते हाताळू शकते.
 • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत किमान 1000 रुपये दरवर्षी न भरू शकल्यास त्या वर्षासाठी 50 रु. दंड आकारला जाईल; मात्र दंडाच्या रकमेसह 14 वर्षापर्यंत कधीही हे खाते पुन्हा सुरु करण्याची यामध्ये तरतूद आहे.
 • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत मुलीच्या पालकांना मुलीच्या जन्मानंतर वयाच्या 10 वर्षापर्यंत हे खाते केव्हाही उघडता येऊ शकते.
 • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत ज्या मुलीच्या नावे खाते आहे ती मुलगी देशातील कोणत्याही भागात (शहर / गाव) गेली तर तिथे तिचे खाते हस्तांतरित करता येते.
 • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत मुलीच्या नागे खाते उघडल्यानंतर भरलेली रक्कम मुलगी 14 वर्षाची होईपर्यंत ठेवणे बंधनकारक राहील.
 • सुकन्या समृद्धी योजना सुरु करण्याच्या एक वर्ष अगोदर ज्या मुली 10 वर्षाच्या झाल्या आहेत, अशा मुलीही या योजनेस पात्र ठरतील.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.