मराठी व्याकरण – परीक्षेत विचारलेले प्रश्न

क्रियापद

क्रियापद या शब्दजातीतील घटकावर ३ ते ४ प्रश्न विचारले जातात.

या घटकात पुढील उपघटकांचा समावेश होतो.

१) क्रियापदाचे प्रकार
२) क्रियापदाचे काळ
३) क्रियापदाचे अर्थ व क्रियापदाचा आख्यात विचार.

राज्यसेवा मुख्य परीक्षा

योग्य जोड्या जुळवा. (राज्यसेवा २०१६)

अ) मांजराने उंदीर खाऊन टाकला १) अकर्तृक क्रियापद
ब) शिंक्याचे तुटले २) द्विकर्मक क्रियापद
क) विदुषक मुलांना हसवितो ३) सहायक क्रियापद
ड) मुलांनी चावणाऱ्या कुत्र्याला खडे मारले ४) प्रयोजक क्रियापद

अ ब क ड

१) २ १ ३ ४

२) ४ ३ १ २

३) २ ४ ३ १

४) ३ १ ४ २

2) पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (राज्यसेवा २०१५)
‘गुरुजी विदयार्थ्यांना व्याकरण शिकवितात.’

1)अकर्मक क्रियापद
२) द्विकर्मक क्रियापद
३) संयुक्त क्रियापद
४) सकर्मक क्रियापद

3) खालीलपैकी कोणत्या वाक्यात आज्ञार्थी क्रियापद आले आहे. (राज्यसेवा २०१४) १)

1)देवा, सर्वाना सुखी ठेव
२) आता पाऊस थांबावा
3)पाऊसआला तरी सहल जाणारच
४) परीक्षेत मला प्रथम श्रेणी मिळाली.

PSI मुख्य परीक्षा

४) त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. या वाक्यातील आधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे ? (PSI 2014)

१) प्रयोजक क्रियापद
२) शक्य क्रियापद
३)अनियमित क्रियापद
४) गौण क्रियापद

५) जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मूळ धातूंना काय म्हणतात ? (PST 2014)

१) सिद्ध शब्द २) साधित शब्द ३) उपसर्ग घटित ४) प्रत्यय घटित

६)शिक्षक विदयार्थ्यांना प्रश्न विचारतात.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (PSI 2014)
१) शक्य क्रियापद २) द्विकर्मक क्रियापद ३) प्रयोजक क्रियापद ४) अकर्तृक क्रियापद

७) संयुक्त क्रियापद म्हणजे (PST 2013)

१) कृदंत + धातुसाधित
२) प्रयोजक क्रियापद + शक्य क्रियापद
३) धातू + क्रियादर्शक पद
४) धातूसाधित + सहायक क्रियापद

८) संस्कृतमध्ये क्रियापदाला —म्हणतात. (PSI 2014)
१) आख्यात २) कार्यपद ३) कृदन्त ४) उद्देश्य

९) वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. (PSI 2014)
चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला.

१) संयुक्त प्रयोजक
२) साधित क्रियापद
३) प्रयोजक क्रियापद
४) शक्य क्रियापद

STI मुख्य परीक्षा

१०) पुढीलपैकी सिध्द शब्दांचा गट कोणता? (STI – 2015)

१) कर, पाह, आण
२) करा, पाहणी, ने आण
३) बोलाचाली, जाऊन, येथून
४) चाल, आणणावळ, सुकर

११) ‘त्यांना शक्ती प्राप्त होवो’ या वाक्यातील आख्यात ओळखा. (STI – 2015)

१) विध्यर्थ २) आज्ञार्थ ३) वाख्यात ४) ताख्यात विध्यर्थ

१२) मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वत: करीत नसून दुसऱ्याकडून करवून घेतो अशा.अर्थाच्या क्रियापदाला -म्हणतात.
(STI – 2014)

१)शक्य क्रियापदे
२) प्रयोजक क्रियापदे
३)अनियमित क्रियापद
४) भावकर्तृक क्रियापदे

१३) पर्यायी उत्तरांतील- वाक्यातील कृदंत असलेले वाक्य ओळखा. (STI – 2015)
१) तो हळूहळू चालतो
२) तो बसत बसत म्हणाला
३) त्याच्या मागोमाग गेला
४) छी छी, किती घाणेरडा हा शर्ट!

ASo मुख्य परीक्षा

१४) खालीलपैकी रीति भूतकाळाचे वाक्य कोणते ? (ASO 2016)

१) तो रोज व्यायाम करत असतो.
२) तो रोज व्यायाम करतो
३) तो रोज व्यायाम करत होता
४) तो रोज व्यायाम करत असे

१५) ”सुधाने निबंध लिहिला असेल’ या वाक्याचा काळ ओळखा. (ASO 2015)

१) रीती भविष्यकाळ
२) पूर्ण भविष्यकाळ
३) अपूर्ण भविष्यकाळ
४) साधा भविष्यकाळ

१६) पर्यायी उत्तरांतील ‘विध्यर्थी क्रियापद असलेले वाक्य कोणते? (ASO 2015)

१) माझ्याच्याने ते काम होणार नाही
२) अवकाळी पाऊस आला
३) सर्वांनी पंक्तीत येऊन बसा
४) अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे

१७) पुढे दिलेल्या वाक्यांतून साधित क्रियापद असलेल्या वाक्याचा अचूक पर्याय निवडा.(ASO2015)

१) विदयार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे
२) शिक्षक मलांना शिकवतात
३) सचिनने चौकार मारला
४) जुन्या आठवणीने माझे डोळे पाणावले.

१८) ‘तो घोड़्यास पळवतो’ या वाक्यातील पळवतो क्रियापदाचा उपप्रकार कोणता?(ASO 2014)

१)शक्य क्रियापद
२) प्रयोजक क्रियापद
३)सिद्ध क्रियापद
४) सहाय धातू

१९) ‘मी निबंध लिहीत असे’ या वाक्यातील काळ ओळखा. (ASO 2013)

१) अपूर्ण भूतकाळ
२) रीती वर्तमानकाळ
३) रीती भूतकाळ
४) रीती भविष्यकाळ

२०) ‘कर’ या धातूपासून ‘मी करी’ या एकवचनी पद्यरुपाचे अनेकवचनी रीतीभूतकाळात रुपांतर कसे होईल, बरोबर पर्याय निवडा- (ASO 2013)
१) आम्ही करु
२) मी करीन
३) मी करुन
४) आम्ही करावे

२१) खाली दिलेल्या शब्दाप्रमाणे योग्य पर्यायी उत्तर शोधा. ‘क्रियापद वाक्य’ (ASO 2013)

१)आशुतोषच्या डोळ्यांत पाणी आले
२) आशुतोषचे डोळे पाणीगत आहे
३) आशुतोषचे डोळे पाणीदार आहेत
४) आशुतोषचे डोळे पाणावले

२२) क्ष’ आणि ‘ज्ञ’ गटातील अनुक्रमे क्रियापदाचा काळ क्रियापदाचा काळ आणि क्रियापदाची आख्याते दिली असून पर्यायी उत्तरांतील एक उत्तर योग्य असून त्या उत्तरांतील चारही योग्यरीत्या जुळविल्या आहेत. असे ते पर्यायी उत्तर कोणते ? (ASO 2013)

‘क्ष’ (काळ) ‘ज्ञ’ (आख्यात)
अ) भविष्यकाळ १) त आख्यात
ब) विध्यर्थ २) ऊ आख्यात
क) संकेतार्थ ३) ईलाख्यात
ड) आज्ञार्थ ४) वाख्यात

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

१) १ ४ २ ३

२) १ ३ २ ४

३)३ ४ १ २

४)२ १ ३ ४

२३) जा, ये, उठ, बस, खा, पी वगैरे धातूंपासून जी क्रियापदे तयार होतात त्यांना -.म्हणतात.(ASO 2014)

१) सिद्ध क्रियापद
२) साधित क्रियापद
३) संयुक्त क्रियापद
४) द्विकर्मक क्रियापद

कर सहायक परीक्षा

२४)’सूज्ञास अधिक सांगणे न लगे.’ या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.(कर सहायक २०१६)

१) अनियमित
३)प्रयोजक
२) शक्य
४) भावकर्तृक क्रियापद

२५) पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये प्रयोजक क्रियापद आहे ? (कर सहायक २०१६)
१) मला अजिबात पहाटे लवकर उठवत नाही.
२)संतांना लोकांचे दुःख पाहवत नव्हते.
३) ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, अशी आख्यायिका आहे.
४) दिवसभर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन देऊन शेवटी त्याला बोलवेना.

२६) दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (कर सहायक २०१५)

‘आईने मुलीला लाडू दिला.’

१) अकर्मक क्रियापद
२) उभयविध क्रियापद
३)द्विकर्मक क्रियापद
४) विधानपूरक

२७) पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (कर सहायक २०१५)
घरी परतताना आम्हाला नदीकाठी सांजावले.

१)शक्य क्रियापद
२) प्रयोजक क्रियापद
३) अकर्तृक क्रियापद
४) उभयविध क्रियापद

पोलीस उप-निरीक्षक विभागीय परीक्षा

२८) पुढीलपैकी अनियमित क्रियापदे कोणती ? (D PSI2013)

१) करवते, बसवते, चालवते
२) सांजावले, मळमळले, उजाडले
३)आहे, पाहिजे, नलगे
४) हसतो, बसतो, चालतो

महाराष्ट्र वनसेवा परीक्षा

२९) ‘ताईने मुलाला निजविले’ या वाक्यातील ‘निजविले’ या क्रियापदास काय म्हणतात? (वनसेवा २०१४)

अ) प्रयोजक क्रियापद
क) गौण क्रियापद
ब) शक्यार्थ क्रियापद
ड) सहायक क्रियापद

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ बरोबर
३) क बरोबर ड बरोबर
२) अ चूक ब बरोबर
४) ड चूक क बरोबर

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा

३०) खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमानकाळ ओळखा. (कृषी सेवा २०१६)

१) मी जात आहे
२) मी गेलो आहे
३) मी जाणार आहे
४) यापैकी कोणतेही उत्तर नाही.

३१) वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला-म्हणतात(कृषी सेवा २०१६)

१) क्रिया विशेषण
२) क्रियापद
३)धातू
४) प्रत्यय

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा

३२) वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरुन कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो, तेव्हा त्यास – – – – – क्रियापद असे म्हणतात.

१) स्वार्थी
२) आज्ञार्थी
३) विद्यार्थी
४) संकेतार्थी

लिपिक टंकलेखक परीक्षा

३३) ज्या क्रियापदाला दोन कर्मे लागतात अशा क्रियापदाला काय म्हणतात?

१) उभयविध
२) द्विकर्मक
३) विधानपूरक
४) अपूर्णविधान

३४) ‘आई त्या मुलाला हसविते’ हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडते?

१) प्रयोजक
२) शक्य
३)अनियमित
४) सहायक

३५) योग्य जोड्या लावा.

अ) बसला १) ई आख्यात
ब) बसे २) वाख्यात
क) बसावा ३) ऊ आख्यात
ड) बसू ४) ताख्यात

५) लाख्यात

अ ब क ड

१) २ ५ ३ १

२) ४ २ १ ५

३)५ १ २ ३

४)१ ३ ५ ४

लिपिक/ टंकलेखक परीक्षा

३६) ‘मी घरी पोचण्यापूर्वीच सांजावले’ या वाक्यातील ‘सांजावले’ या क्रियापदास काय म्हणतात ? (लिपीक २०१४)

१)अनियमित क्रियापद
२) प्रयोजक क्रियापद
३) भावकर्तृक क्रियापद
४) सिध्द क्रियापद

३७)’आई त्या मुलाला हसविते’ हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या क्रियापदाचे आहे?(लिपीक २०१४)

१)शक्य क्रियापद
२) प्रयोजक क्रियापद
३)अनियमित क्रियापद
४) सिध्द क्रियापद

३८) अ) बाळ, एवढा लाडू खाऊन टाक. (लिपीक २०१४)

ब) बाळ, एवढा लाडू खाऊन जा.

१) क्रमांक अ चे विधान संयुक्त क्रियापदाचे आहे.
२) क्रमांक ब चे विधान संयुक्त क्रियापदाचे आहे.
३) क्रमांक अ व ब चे विधान संयुक्त क्रियापदाचे आहे.
४) क्रमांक अ व ब चे विधान संयुक्त क्रियापदाचे नाही.

संयुक्त क्रियापद मधील धातुसाधित मुख्य क्रिया दर्शविते तर सहाय्यक क्रियापद विधानाचा अर्थ पूर्ण करतो.

३९) ‘तो काम करीत आहे’ या संयुक्त वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? (लिपीक)

१) संयुक्त क्रियापद
२) प्रयोजक क्रियापद
३)शक्य क्रियापद
४) उभयविध क्रियापद

४०) धातू म्हणजे —–
१) शब्दाचे सामान्यरुप
२) शब्दयोगी अव्ययाचा प्रकार
३) क्रियाविशेषण अव्यय
४) प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द

४१) पुढीलपैकी कोणत्या वाक्यात द्विकर्मक क्रियापद आहे ? (लिपीक २०१५)

अ) गवळी धार काढतो
ब) आजीने नातीला गोष्ट सांगितली

१) अ बरोबर
२) अ व ब बरोबर
३) ब बरोबर
४) अ व ब चूक

४२) ‘रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत. या वाक्यात कोणत्या प्रकाराचा अर्थ आहे?

(लिपीक २०१५)

१) आज्ञार्थ
२) विध्यर्थ
३) संकेतार्थ
४) स्वार्थ

४३) दिलेल्या वाक्यांतील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (लिपीक २०१५)

‘तिने घराची खिडकी उघडली
तिच्या घराची खिडकी उघडली.

१) विधानपूरक
२) उभयविध क्रियापद
३)अकर्मक क्रियापद
४) द्विकर्मक क्रियापद

४४)’ ‘कावळ्याने कोळिणीच्या टोपलीतला मासा वरच्यावर लांबवला.’

या वाक्यातील क्रियापद पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ? (लिपीक २०१६)
१) साधित २) सिद्ध ३) प्रयोजक ४) शक्य

४५) ‘क्रियापदावरुन एक गोष्ट दुसरीवर अवलंबून आहे, अशा प्रकारचा बोध होतो, तेव्हा त्यास—–क्रियापद म्हणतात.’ वरील वाक्यातील गाळलेला शब्द कोणता?(लघुटंकलेखक -२०१५)

१) विध्यर्थी २) संकेतार्थ ३) आज्ञार्थी ४) स्वार्थी

४६) पर्यायी उत्तरांतून ‘ई – आख्याताचा’ क्रियापदाचा काळ कोणता ते सांगा?(लघुटंकलेखक २०१५)

१) वर्तमानकाळ
२) भूतकाळ
३) रीतिभूतकाळ
४) भविष्यकाळ

४७) खालील वाक्याचा काळ ओळखा. (लघुटंकलेखक २०१५) सोमवारी काय तो निर्णय कळेल.

१) भूतकाळ
२) वर्तमानकाळ
३) भविष्यकाळ
४) रीतीवर्तमान काळ

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) मुख्य -२०११

४८) ‘पावसासोबत गारा पडतील’ या विधानातील काळ ओळखा.

१) रीति भविष्यकाळ
२) अपूर्ण भविष्यकाळ
३) पूर्ण भविष्यकाळ
४) संभवसूचक भविष्यकाळ.

लिपिक/टंकलेखक परीक्षा – २०११

४९) ‘गोलंदाजी करावी ती कुंबळेनेच’ यातून काय सूचित होते?

१) योग्यता
२) शक्यता
३) तर्क
४) कर्तव्य

५०) धातू ओळखण्याचे अक्षर कोणते?

१) नी
२) णा
३) ने
४) णे

५१) ‘मी पुस्तक वाचत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.

१) रीती भूतकाळ भूतकाळ
२) रीतीवर्तमानकाळ
३) साधा भूतकाळ
४) पूर्ण भूतकाळ

क्रियापदे कृती बरोबरच गती, स्थिती व स्थित्यंतर देखील दाखवितात.

कृतीवातक धातू सकर्मक असतात. उदा : दे, घे, वाच, ने, आण, लिही इ.

गतीवातक धातू अकर्मक असतात. उदा. ये, जा, पळ, धाव, चाल, उतर इ.

स्थिती त स्थित्यंतरवातक धातू अकर्मक असतात. उदा. अस, नस, रहा, लाज, हस, भी इ.

क्रियापद स्पष्टीकरण

१) अ)मांजराने उंदीर खाऊन टाकला
या वाक्यातील खाऊन टाकला हे संयुक्त क्रियापद असून खाऊन हे धातूसाधित आहे तर टाकला हे सहायक क्रियापद आहे.
ब) शिंक्याचे तुटले या वाक्यात तुटणारे कोण ? उत्तर मिळत नाही म्हणून हे क्रियापद अकर्तृक आहे.
क) विदूषक मुलांना हसवितो.

ड ) मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले.
कोणाला मारले – कुत्र्याला,
काय मारले- खडे.
खडे प्रत्यक्ष कर्म, कुत्र्याला अप्रत्यक्ष कर्म म्हणून क्रियापद द्विकर्मक आहे.

या वाक्यात हसव या साधित धातूचा कर्ता (विदूषक) हस या सिध्द धातूच्या कर्त्याला क्रिया करण्याची प्रेरणा देतो म्हणून (हसवितो) क्रियापद प्रयोजक आहे.

शिकवितात.

२) १) गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात
२)काय शिकवतात – व्याकरण – प्रत्यक्ष कर्म
३)कोणाला शिकवितात – विद्यार्थ्यांना- अप्रत्यक्ष कर्म.पर्याय क्र.२

३)
१)देवा, सर्वांना सुखी ठेव – वाक्याच्या शेवटी मूळ धातू आल्यास क्रियापद आज्ञार्थी असते.
२)आता पाऊस थांबावा – क्रियापदावरुन इच्छा, शक्यता, योग्यता, कर्तव्य इ अर्थ व्यक्त झाल्यास क्रियापद विद्यार्थी असते.
मूळ धातू + वा/वी/वे = विध्यर्थी क्रियापद

३) पाऊस आला तरी सहल जाणारच
जर-तर वाक्य जोडले असता क्रियापद संकेतार्थी असते.

४)परीक्षेत मला प्रथम श्रेणी मिळाली.

भूतकाळी क्रियापद – क्रियापदाच्या रुपावरुन काळाचा बोध होत असेल तर त्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद म्हणतात. पर्याय क्र.१


४) बसव या साधित धातूवरुन कर्त्याच्या अंगी क्रिया करण्याचे सामर्थ्य आहे हे कळते अशा क्रियापदाला शक्य क्रियापद म्हणतात. पर्याय क्र.२

९) चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला. स्थिर हा शब्द विशेषण असून त्यापासून स्थिरावला हे विशेषण साधित क्रियापद बनले आहे.

विशेषण क्रियापद

दूर दुरावला
लांब लांबविली
उंच उंचावला पर्याय क्र.२

१०) आण, कर, पाह-हे मूळ धातू आहेत, मूळ धातूंना सिध्द धातू असे म्हणतात. पर्याय क्र.१

-११) त्यांना शक्ती प्राप्त होवो. यातून आशीर्वाद व्यक्त होतो.
क्रियापद आज्ञार्थी आहे.पर्याय क्र.२

१३) बसत – बसत – कृदन्त
कृदन्त / धातूसाधित – मूळ धातूला प्रत्यय लागून अपुरी क्रिया दाखविणाऱ्या शब्दाला धातूसाधित किंवा कृदन्त म्हणतात.
पर्याय क्र.२

१४) १)मूळ धातू + त + असतो = रीती वर्तमान काळ
२)मूळ धातू + त = साधा वर्तमान काळ
३) मूळ धातू + त + होता = अपूर्ण भूत काळ
४) मूळ धातू + त + असे = रीती भूत काळ पर्याय क्र.४

१५) मूळ धातू + ल + असेल = पूर्ण भविष्यकाळ पर्याय क्र.२

१६) मूळ धातू + वा / वी / वे = विध्यर्थी क्रियापद पर्याय क्र.४


१७) १) केला पाहिजे – संयुक्त क्रियापद
२)शिकवितात – सकर्मक क्रियापद
३)मारला – सकर्मक क्रियापद
४)पाणावले – नाम साधित क्रियापद (पाणी – नाम) पर्याय क्र.४

१८) पळव या साधित धातूचा कर्ता (तो) सिध्द धातूचा कर्ता (घोडा) या कर्त्याला क्रिया करण्याची प्रेरणा देतो म्हणून त्यास प्रयोजक क्रियापद म्हणतात. पर्याय क्र.२

२०) कर या धातूचा विविध कर्त्यांनुसार रीतीभूत काळ.

१) मी करत असे/मी करी
२) आम्ही करत असू/आम्ही करु
३) तू तो करत असे/तो करे
४) ते करत असत/ते करत पर्याय क्र.१

२१) १) पाणी – नाम
२) पाणीगत – क्रियाविशेषण
३)पाणीदार – विशेषण
४) पाणावले – क्रियापद पर्याय क्र.४

२४) १)नलगे – अनियमित क्रियापदे.
२) ज्या क्रियापदांना काळाचे व अर्थाचे प्रत्यय लागत नाहीत त्यांना अनियमित क्रियापदे म्हणतात.
उदा. नव्हे, नको, नये, नलगे, आहे, पाहिजे. पर्याय क्र. १

२५) पर्याय १, २, ४ शक्य क्रियापदे (नकारार्थी)
३- प्रयोजक प्रयोजक. पर्याय क्र.३

२७) १) करवते, बसवते, चालते – शक्य / प्रयोजक
२)सांजावले, मळमळते, उजाडले – भावकर्तृक / अकर्तृक
३) आहे, पाहिजे, नलगे – अनियमित क्रियापद
४) हसतो, बसतो, चालतो – सिद्ध क्रियापदे.पर्याय क्र.३

३८)
१) खाऊन टाक एकच क्रिया – संयुक्त क्रियापद.
२) धातूसाधित व सहायक क्रियापद दोघे मिळून एकच क्रिया दर्शवित असतील त्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात.
३)खाऊन जा-दोन क्रिया-संयुक्त क्रियापद नाही.
४)खाऊन – धातूसाधित क्रियाविशेषण, जा मुख्य क्रियापद पर्याय क्र.१

४२) वाहने न्यावीत-अनेक वचनात विध्यर्थी क्रियापदांना वीत प्रत्यय लागतो. पर्याय क्र.२

४३) १)तिने घराची खिडकी उघडली – सकर्मक क्रियापद
तिच्या घराची खिडकी उघडली – अकर्मक क्रियापद
पर्याय क्र.२

४)४ लांब (विशेषण) लांबविला (विशेषण साधित क्रियापद) पर्याय क्र.१

६) काळ व अर्थ आख्यात
वर्तमान काळ प्रथम ‘त’ आख्यात
भूतकाळ ल आख्यात
रिती भूतकाळ ई आख्यात
भविष्यकाळ ईल आख्यात
आज्ञार्थ ऊ आख्यात
विध्यर्थ व आख्यात
संकेतार्थ द्वितीय त आख्यात पर्याय क्र.३

  • संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात.
    काळ व अर्थ हे विकार फक्त क्रियापदानांच होतात.
    क्रियापदांना होणाऱ्या या विकारांना आख्यात विकार असे म्हणतात
    आख्यात विचार मो.के.दामले यांनी मराठी भाषेत आणला.
    मराठी भाषेत सात आख्याते मानली जातात.

काळ

राज्यसेवा मुख्य परीक्षा

१) काळ आणि त्यांच्या व्याख्या यांच्या जोड्या लावा. (राज्यसेवा २०१६)

व्याख्या काळ
अ) वाक्यातील क्रिया पुढे होईल असा बोध होतो तेव्हा १) भूतकाळ
ब) वाक्यातील क्रिया पूर्ण झाली, की २) वर्तमानकाळ
क) वाक्यातील क्रिया चालू असल्याचे दर्शविते तेव्हा ३) रीति भूतकाळ
ड) वाक्यातील क्रिया भूतकाळी तरीही, वरचेवर होत असे, असा बोध ४) भविष्यकाळ

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

१) ४ १ २ ३

२) ३ २ १ ४

३) २ ३ ४ १

४) १ ४ ३ २

२) पुढील विधाने वाचून योग्य उत्तरे लिहा. (राज्यसेवा २०१६)

अ) क्रियापदांना काळ व अर्थ यांचे विकार होतात.
ब) कधी कधी वर्तमान काळाच्या किंवा भूतकाळाच्या क्रियापद रूपावरून भविष्यकाळाचा आशय व्यक्त होतो.
क) संकेतार्थी क्रियापदे भूतकाळी असतात.

पर्यायी उत्तरे
१) फक्त ब व क चूक
२) फक्त ब बरोबर
३) फक्त क चूक
४) फक्त ब व क बरोबर

पोलीस उपनिरीक्षक विभागीय मुख्य परीक्षा

३) पुढील संयुक्त वाक्य कोणत्या काळात आहे ? (D.PSI 2013)

‘पुरस्कार समितीकडून सर्व पुस्तकांचे अवलोकन करण्यात येईल व पुरस्कार प्राप्त लेखकांची नावे जाहीर करण्यात येतील.’

१) रीति वर्तमानकाळ
२) भूतकाळ
३) वर्तमानकाळ
४) भविष्यकाळ

STI मुख्य परीक्षा

४) ‘तो नेहमीच उशिरा येतो’ या वाक्याचा काळ ओळखा. (STI 2016)

१) रीति वर्तमानकाळ
२) संनिहित भविष्यकाळ
३) रीती भविष्यकाळ
४) संनिहित वर्तमानकाळ

५)’मी ग्रंथ वाचत जाईन’ या वाक्याचा काळ ओळखा. (STI – 2015)

१) रीति भूतकाळ
२) रीति वर्तमानकाळ
३) रीती भविष्यकाळ
४) पूर्णरीति भविष्यकाळ

६).सूर–पारब्यांचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही’ या वाक्याचा प्रकार व काळ ओळखा.
खालील अचूक पर्याय निवडा. (STI – 2014)
१) नकारार्थी – भूतकाळ
२) नकारार्थी – भविष्यकाळ
३)नकारार्थी – वर्तमानकाळ
४) यापैकी एकही नाही

ASO मुख्य परीक्षा

७) खालीलपैकी रीति भूतकाळाचे वाक्य कोणते ? (ASO 2016)

१) तो रोज व्यायाम करत असतो.
२) तो रोज व्यायाम करतो.
३)तो रोज व्यायाम करत होता.
४) तो रोज व्यायाम करत असे.

८)सुधाने निबंध लिहला असेल’ या वाक्याचा काळ ओळखा. (ASO 2015)

१) रीती भविष्यकाळ
२) अपूर्ण भविष्यकाळ
३) पूर्ण भविष्यकाळ
४) साधा भविष्यकाळ

९)’मी निबंध लिहित असे’ या वाक्यातील काळ ओळखा. (ASO 2013)

१) अपूर्ण भूतकाळ
२) रीती वर्तमानकाळ
३) रीती भूतकाळ
४) रीती भविष्यकाळ

१०) ‘कर’ या धातूपासून ‘मी करी’ या एकवचनी पदयरुपाचे अनेकवचनी रीतिभूतकाळात कस होईल, बरोबर पर्याय निवडा. (ASO 2013)

१) आम्ही करू
२) मी करीन
३) मी करुन
४) आम्ही करावे

११) ‘क्ष’ आणि ‘ज्ञ’ गटातील अनुक्रमे क्रियापदाचा काळ आणि क्रियापदाची आख्याते दिली असून पर्यायी उत्तरांतील एक उत्तर योग्य असून त्या उत्तर मधील चारही जोड्या योग्य रित्या जुळविण्या आहेत, असे ते पर्यायी उत्तर कोणते? (ASO 2013)


‘क्ष’ काळ ज्ञ’ आख्यान

अ) भविष्यकाळ १) द्वितीय त आख्यात
ब) विध्यर्थ २) ऊ – आख्यात
क) संकेतार्थ ३) ईल-आख्यात
ड) आज्ञार्थ ४) व आख्यात

कर सहायक परीक्षा

१२) पर्यायी उत्तरांतून ‘ई – आख्याताचा’ क्रियापदाचा काळ कोणता ते सांगा? (कर सहायक २०१६)
१) वर्तमानकाळ
२) भूतकाळ
३) रीती भूतकाळ
४) भविष्यकाळ

कृषि सेवा परीक्षा

१३) खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखा.

१) मी जात आहे
२) मी गेलो आहे
३) मी जाणार आहे
४) यापैकी नाही

मूळ धातू-क्रियापदाचे प्रत्ययरहित रूप म्हणजेच मूळ धातू (सिद्ध धातू) होय.

लिपिक/टंकलेखक परीक्षा

१४)’मी निबंध लिहितो’ या वाक्याचा रीती भूतकाळ लिहा. (लिपीक २०१३)

१) मी निबंध लिहित असे.
२) मी निबंध लिहिला होता
३) ‘मी निबंध लिहित होतो
४) मी निबंध लिहिला

१५) पुढील वाक्यातील वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा. (लिपीक २०१३)
१) सूर्य पूर्वेस उगवतो
२) तुम्ही पुढे व्हा मी येतो
३) मी बसलो तोच तुम्ही हजर
४) गुरुजी आत शाळेत जातील

१६) ‘मी उदयापासून सकाळी लवकर- ? (लिपीक २०१३)
रीती भविष्यकाळ वाक्य करण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय वापरावा लागेल’
१) उठेन
२) उठणार
३) उठत जाईन
४) उठीन

लघुटंकलेखक परीक्षा

१७) खालील पर्यायी उत्तरांतील ‘इच्छादर्शक भविष्यकाळ’ असलेले विधान कोणते?
(लघुटंकलेखक २०१५)

१) तू मदत देशील तर मी आभारी होईन.
२) सगळेच शहाणे कसे असतील
३) गुरुजी आत शाळेत असतील
४) मला दोन रुपये हवे होते.

काळ स्पष्टीकरण

२) अ) काळ व अर्थाचे विकार फक्त क्रियापदांनाच होतात.
ब) कधी कधी वर्तमान काळाच्या किंवा भूतकाळाच्या क्रियापद रूपावरून भविष्यकाळाचा आशय व्यक्त होतो.
उदा. -तुम्ही बसा, मी येतोच. (वर्तमानकाळ)
तुम्ही बसा, मी आलोच. (भूतकाळ)
क) संकेतार्थी क्रियापदे भविष्यकाळी असतात.
पर्याय क्र.३

३)

प्रकार वर्तमानकाळभूतकाळभविष्यकाळ
साधा
मूळ धातू+त
 
मूळ धातू+ल
 
मूळ धातू+ईल
अपूर्ण
मूळ धातू+त+आहे
मूळ धातू+त+होतामूळ धातू+त+ असेल
 
पूर्णमूळ धातू+ल+आहे
मूळ धातू+ल+होतामूळ धातू+ल+असेल
 
रीती
 
मूळधातू+त+असतो
मूळ धातू+त+असे मूळ धातू+त+राहीन/जाईन

पर्याय क्र.४

४)साध्या वर्तमानकाळाच्या वाक्यात, नित्य, नेहमी, नियमित इ. शब्द आल्यास त वाक्याचा काळ रीती वर्तमानकाळ असतो. पर्याय क्र.१

५) मूळ धातू + त + राहीन / जाईन
पर्याय क्र. ३

६) मूळ धातू + ल + नाही पर्याय क्र.१

७) मूळ धातू + त+ असे. पर्याय क्र.४

८) मूळ धातू + ल +असेल. पर्याय क्र.३

९)मूळ धातू + त +असे. पर्याय क्र.३

१०) १) रीती भूतकाळ दोन प्रकारे होतो.
२) मी काम करत असे / मी काम करी
३) आम्ही काम करत असू/आम्ही काम करु
४) तो येत असे/तो येई. पर्याय क्र.१

११)

काळ व अर्थ
आख्यात
वर्तमानकाळ
(प्रथम) त आख्यात

भूतकाळ
ल आख्यात
भविष्यकाळ
ईल आख्यात
रीती भूतकाळ
ई आख्यात
आज्ञार्थ
ऊ आख्यात
विध्यर्थव आख्यात
संकेतार्थ
 
(द्वितीय) त आख्यात

पर्याय क्र.३ 

१३) मूळ धातू + त + आहे पर्याय क्र.१

१४) मूळ धातू + त + असे पर्याय क्र.१

१५) मूळ धातू + त.पर्याय क्र.१

१६) मूळ धातू + त + जाईन/राहीन पर्याय क्र.३

प्रथम त-त्यात – वर्तमानकाळी क्रियापदांचा आख्यात प्रथम-त-आख्यात असतो.
ल-आख्यात भूतकाळी क्रियापदांचा आत्यात ल-आत्यात असतो.
ई-आख्यात-रीतिभूतकाळी क्रियापदांचा आख्यात ई-आख्यात असतो.
ईल-आख्यात भविष्यकाळी क्रियापदयांचा आख्यात ईल-आख्यात असतो.
ऊ-आख्यात – आज्ञार्थी क्रियापदांचा आख्यात ऊ-आख्यात असतो.
व-आख्यात विध्यर्थी क्रियापदांचा आख्यात व-आख्यात असतो.
द्वितीय त-आख्यात – संकेतार्थी क्रियापद यांचा आख्यात द्वितीय त-आख्यात असतो.
ल-आख्यात – भूतकाळी क्रियापदांचा आख्यात ल त्यात असतो.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.