१८५७ चा उठाव हा १० मे १८५७ रोजी मेरठ मधील लष्करी छावनीतील बंडापासून सुरु झाला आणि लवकरच तो उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरला. हा लढा १८५७ चे स्वतंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वतंत्र्यलढा, शिपयांचे बंड अशा इतर नावांनीही ओळखला जातो. जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व तो तब्बल ९० वर्ष चालला आणि १९४७ ला भारत स्वातंत्र्य झाला.
भारतामधील ब्रिटिश सत्तेचे विस्ताराचा संक्षिप्त इतिहास: ईस्ट इंडिया कंपनीने १७५७ मध्ये रॉबर्ट क्लाइवच्या नेतृत्त्वाखाली प्लासीची लढाई जिंकली. लढाईनंतर झालेल्या करारामध्ये ब्रिटिशांना बंगालमध्ये कर मुक्त व्यापर करण्याचा अधिकार मिळाला.
१७६४ मध्ये बक्सरच्या लढाईमध्ये इंग्रजी फ़ौजेने नवाब, बादशहा आणि मीर कासिमाच्या संयुक्त फौंजाचा फज्जा उडविला. अशाप्रकारे प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला तर बक्सारच्या लढाईतील विजयाने हा पाया मजबूत केला गेला. ह्याचा प्रभाव असा झाला की कंपनीने संपूर्ण भारतामध्ये आपला प्रभाव निर्माण करण्यात सुरुवात केली.
१८३९ मध्ये महाराजा रणजीत सिंह यांच्या मृत्यु नंतर पंजाब कमजोर झाले आणि यातूनच १८४८ मध्ये दूसरे ब्रिटिश विरुद्ध शीख युद्ध झाले.
१८४९ मध्ये कंपनीने पंजाब प्रांत ही आपल्या अधिपत्याखाली आणले. १८५३ मध्ये शेवटचे मराठा पेशवा बाजीराव यांचे दत्तक पुत्र नानासाहेब यांचा वार्षिक खर्च ही कंपनीने बंद केला.
१८५४ मध्ये बरार तर १८५६ मध्ये अवध प्रांतही कंपनीने आपल्या ताब्यात घेतले.
उठावाची पार्श्वभूमी: यामध्ये १८५७ पूर्वी भारतात ब्रिटाशांविरुध्ध झालेल्या उठावांचा समावेश आहे,
- १७६३ ते १७८० या काळातील संन्याशांचे बंड
- १७६५ ते १७८६ या काळात चुआर येथे झालेले दोन उठाव (मिदनापुर, बांकुरा जिल्हा, पश्चिम बंगाल)
- महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी रामोश्यांना एकत्रित करून इंग्रजांविरुध्ध केलेला उठाव (यासाठी त्यांना १८३२ साली फाशी देण्यात आली)
- आंध्र प्रदेशातील पाळेगारांचा उठाव
- १८४४ मधील कोल्हापुर येथील उठाव
- उत्तर भारतातील जाटांचे त्याचप्रमाणे राजपूतांचे आणि बुंदेल्याचे उठाव
- विदर्भ आणि खानदेशातील आदिवासींचे उठाव
- छोटा नागपूर भागातील कोलामांचा उठाव
- बिहारमधील संथालांचा उठाव