Marathi Llanguage History
Marathi Llanguage History

शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच ‘शब्दसिद्धी’ असे म्हणतात.

सिद्ध शब्द

भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात.

उदा: ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी.

सिद्ध शब्दांचे तीन प्रकार पडतात.

1. तत्सम   2. तदभव   3. देशी

शब्दांचे खालील प्रकार पडतात.

तत्सम शब्द

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना ‘तत्सम शब्द ‘ असे म्हणतात.

उदा:
राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.

तदभव शब्द

जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना ‘तदभव शब्द’ असे म्हणतात.

उदा: घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.

देशी/देशीज शब्द

महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना ‘देशी शब्द’ असे म्हणतात.

उदा: झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.

परभाषीय शब्द

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ‘ परभाषीय शब्द’ असे म्हणतात.

तुर्की शब्द

कालगी, बंदूक, कजाग

इंग्रजी शब्द

टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.

पोर्तुगीज शब्द

बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.

फारशी शब्द

रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता.

अरबी शब्द

अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.

कानडी शब्द

हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.

गुजराती शब्द

सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.

हिन्दी शब्द

बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली.

तेलगू शब्द

ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.

तामिळ शब्द

चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.

सधीत शब्द

सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून साधित शब्द तयार होतो.

साधित शब्दांचे पुढील चार प्रकार पडतात
अ) उपसर्गघटित   ब) प्रत्ययघटित    क) अभ्यस्त    ड) सामासिक

अ) उपसर्गघटित शब्द

शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात.

उदा. अनुभव, अपयश, अधिकार, अवगुण अधिपती, उपहार, आकार, साकार, प्रतिकार, प्रकार इ.
वरील शब्दांमध्ये अनु. अप, अधि, अव, अधि, उप, आ, सा, प्रति,प्रइ. उपसर्ग लागलेली आपल्याला दिसतात. असे उपसर्ग लागून तयार होणार्याि शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात.

ब) प्रत्ययघटित शब्द

धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्याा शब्दांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात.

उदा. जनन, जनक, जननी, जनता इ.
वरील शब्दांना न,क, नी ता ही प्रत्यय लागलेली आपल्याला दिसतात असे प्रत्यय लावून तयार होणार्याा शब्दांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात.

क) अभ्यस्त शब्द

एखाधा शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. अभ्यसतचा अर्थ दुप्पट करणे असा होतो.

उदा. आतल्या आत, शेजरीपाजारी, किरकिर इ.

अभ्यस्त शब्दांचे खालील तीन प्रकार पडतात.
1. पूर्णाभ्यस्त   2. अंशाभ्यस्त   3. अनुकरणवाचक

1. पूर्णाभ्यास शब्द

एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात.

उदा. बारीक बारीक, कळाकाळा, आतल्या आत, हळहळ, वटवट, कळकळ, मळमळ, बडबड, समोरासमोर, हळूहळू, पुढेपुढे, पैसाच पैसा, मजाच मजा, हिरवेहिरवे इ.

2. अंशाभ्यस्त शब्द

जेव्हा पूर्ण शब्द हा जोडशब्दात जशाच्या तसा पुन्हा येतो एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या जोडशब्दांना अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात.

उदा. अदलाबदल, उलटसुलटा, शेजारीपाजारी, बारीकसारीक, लाडीगोडी, सोक्षमोक्ष, जिकडेतिकडे, गोडधोड, गडबड, जाळपोळ, दगडबिगड, किडूकमिडूक, घरबीर इ.

3. अनुकरणवाचक शब्द

ज्या शब्दांमध्ये एखाधा ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक/नादानुकारी शब्द असे म्हणतात.

उदा. किरकिर, खडखडाट, रिमझिम, गुणगुण, घणघण, कडकडाट, टिकटिक, गडगड इ.

ड) सामासिक शब्द

जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांमधील परस्पर संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणार्याध शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात.

उदा. पोळपाट, देवघर, दारोदार इ.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

  1. Hello Manisha ,
    whatever you mentioned above information and slides which is copy from youtube channel. That all details mine.
    do you know that copy right violation you did it.
    I took all your screen shot where you uploaded my channel information.
    you can see my youtube channel “Ganesh D Chavan” your all information me please mind it.
    if possible contact me on 9960187595 otherwise i will call you.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *