व्याकरण :
भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व त्याच्या परस्परांशी असलेला संबंध ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.
वर्ण विचार :
ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.
१) स्वर : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .
- ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .
- दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.
- स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात . उदा– अं,आ:
- सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे . उदा– अ,आ /इ ,ई /उ ,ऊ .
- विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर. उदा– अ ,इ /आ ,ई /अ ,उ .
- सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय . उदा- अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ .
२) व्यंजन :ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .
- महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.
- अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.
- स्पर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प
- अंतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.
- उष्ण व्यंजन :श ,ष ,स
- नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .
३) वर्णाची उच्चार स्थाने :
- कंठ्य :क,अ,आ.
- तालव्य :च,इ,ई,
- मूर्धन्य :ट ,र,स.
- दंत्य : त,ल,स
- ओष्ठ्य :प,उ,ऊ .
- अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,
- कंठ तालव्य :ए ,ऐ.
- कंठ ओष्ठ :ओ,औ.
- दान्तोष्ठ : व .
वर्ण
अर्धस्वर:
य्,र्,ल्,व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ,ऋ,लृ,उ, या स्वरांच्या उच्चरस्थानासारखीच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे. म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. अर्धस्वर एकूण चार आहेत, स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम य,व,र,ल असा आहे.
उष्मे:
श्,ष्,स यांना उष्मे म्हणतात. वरील वर्णाचा उचार करतांना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते,. त्यामुळे त्यांना उष्मे घर्षक असे म्हणतात.
महाप्राण :
ह् वर्णाचा उच्चार करताना फुफ्फूसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण असे म्हणतात.
,ख्,घ्,छ,झ्,ठ,ढ,थ्,ध,फ,भ्,श्,ष्,स, या वर्णात ह, या वर्णाची छटा असल्याने त्यांना सुध्दा महाप्राण असे म्हणतात. मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहीतांना H अक्षर वापरावे लेगते त्या सर्व वर्णाना महाप्राण म्हणातात. बाकीचे अल्पप्राण आहेत.
उदा. ख – kh महाप्राण, ग – g अल्पप्राण ,
अपवाद : स – s महाप्राण, च – ch अल्पप्राण
क्,ग्,ङ,च्,ज्,त्र,ट,ड,ण्,त्,द,न्,प्,ब्,म्,य,र,ल्,व्,ळ, या व्यंजनाना अल्पप्राण असे म्हणतात. या वर्णात ह, ची छटा नसते,
स्वतंत्र वर्ण :
ळ, हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जातो, तो इतर भाषेकडून घेतलेला नाही.
OM OK
या वर्ण माहीती वरून मला याचा अभ्यास करणे सोपे झाले Thank you so much