१२ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१२ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 12 December 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१२ डिसेंबर चालू घडामोडी

फुटबॉल जगतावर क्रोएशियाने कशी उमटवली स्वतंत्र मोहोर: 

 • युरोपियन फुटबॉल वारसा जपत असतानाही क्रोएशिया फुटबॉल विश्वातील एक छोटा देश. पण, या देशाची फुटबॉल विश्वातील कामगिरी मोठी. यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत या संघाने बलाढ्य ब्राझीलला पराभूत केले. क्रोएशियाच्या या फुटबॉलमधील अतुल्य कामगिरीवर आणि फुटबॉलपटूंच्या सुवर्णपिढीवर प्रकाशझोत….
 • ब्राझीलविरुद्ध क्रोएशियाने सामना बरोबरीत कसा नेला – सामना संपण्यासाठी केवळ १० मिनिटे होती. नेयमारच्या प्रेक्षणीय गोलने ब्राझीलने जवळपास विजय निश्चित केला होता. सामन्यातील ९० मिनिटांचा वेळ संपत चालला होता. क्रोएशियाच्या असंख्य चाहत्यांना मैदानावर उपस्थित पाठिराख्यांना पराभव दिसत होता. मैदानावर लढणाऱ्या खेळाडूंनी जिद्द सोडली नव्हती. अखेरच्या काही मिनिटांत क्रोएशियाच्या खेळाडूंनी ब्राझीलच्या बचाव फळीवर हल्ला करायला सुरुवात केली.  ब्राझीलच्या खेळाडूंनाही एक वेळ विचार करायला भाग पाडले. पण, त्यापूर्वीच क्रोएशियाच्या खेळाडूंनी आपले काम चोख बजावले होते. जबरदस्त गोल करत त्यांनी आपल्या आव्हानात जान आणली. सामना बरोबरीत सुटला आणि  पेनल्टी शूट-आऊटमध्ये गेला.
 • क्रोएशियाच्या विजयात गोलरक्षक लिवाकोविचची कामगिरी किती निर्णायक ठरते – विश्वचषक स्पर्धा आणि पेनल्टी शूट-आऊट हे समीकरण क्रोएशियासाठीच तयार केलेले असावे. कारण, त्यांनी बाद फेरीतल्या चारही लढती पेनल्टी शूट-आऊटमध्येच जिंकल्या आहे. ब्राझीलविरुद्धचा विजयही असाच पेनल्टी शूट-आऊटमध्ये मिळविला. या वेळी क्रोएशियासाठी पुन्हा एकदा लिवाकोविच देवदूत म्हणून अवतरला. पेनल्टी शूट-आऊटमध्ये गोलरक्षकासाठी कमालीची एकाग्रता आणि चपळता खूप महत्त्वाची असते. लिवाकोविचकडे जणू ती ठासून भरलेली आहे. मुख्य म्हणजे लिवाकोविचची देहबोलीदेखील तेवढीच लवचीक आहे. प्रतिस्पर्धी खेळाडू कुठल्या  दिशेने किक घेणार हे तो आधीच जाणतो आणि त्याच दिशेने झेपावत किक अडवतो. त्यामुळे क्रोएशियाच्या वाटचालीत गोलरक्षक लिवाकोविचचा वाटा मोठा आहे हे स्पष्ट होते.  

भुपेंद्र पटेल घेणार आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; पंतप्रधान मोदींसह राजकीय दिग्गज राहणार उपस्थित: 

 • यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने १५६ जागांसह ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भाजपा गुजरातमध्ये सातव्यांदा सत्ता स्थापन करणार असून आज भुपेंद्र पटेल २५ मंत्र्यांसह दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथग्रहण सोहळ्याला पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील.
 • गांधीनगरमध्ये हा शपथग्रहण सोहळा पार पडणार असून यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. या ठिकाणी तीन भव्य व्यासपीठ आणि हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. तसेच देशभरातील २०० साधू-संतानाही या सोहळ्यासाठी खास निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती आहे.
 • या सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित राहणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जुन्या निवृत्तिवेतन योजनेचा निर्णय!; हिमाचल प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांची ग्वाही: 

 • येथे झालेल्या सोहळय़ात हिमाचल प्रदेशचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून सुखविंदर सिंह सुखू यांचा रविवारी शपथविधी उत्साहात झाला. मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 • शपथविधीनंतर सुखू यांनी सांगितले, की आम्ही पारदर्शक आणि प्रामाणिक सरकार देऊ. राज्यातील जनतेला निवडणूक प्रचारात दहा आश्वासने दिली आहेत. त्यांची आम्ही निश्चित पूर्तता करू. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत जुनी निवृत्तिवेतन योजना (ओपीएस) लागू करू.
 • सिमला येथे रविवारी झालेल्या एका समारंभात मुकेश अग्निहोत्री यांनी हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तथापि इतर कोणीही मंत्रिपदाची शपथ घेतली नाही. राज्यात १२ सदस्यीय मंत्रिमंडळ बनवता येते.
 • सुखू यांनी स्वच्छ व प्रामाणिक सरकारचे आश्वासन देताना सांगितले, की काँग्रेसने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. ते म्हणाले, की आम्हाला केवळ सत्तेसाठी सत्ता नको होती. आम्हाला व्यवस्था बदलायची आहे. मला थोडा वेळ द्या. कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. नवीन व्यवस्था आणि नवीन विचार आणण्यासाठी संघर्ष करणे आवश्यक आहे.

एअर इंडियाच्या ताफ्यात नवी ५०० विमाने: 

 • टाटा समूहाने एअर इंडियाचा ताबा घेतल्यानंतर या विमान सेवा कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार एअर बस आणि बोईंग या विमाननिर्मिती कंपन्यांकडून सुमारे पाचशे जेटलायनर विमाने खरेदी करण्याची तयारी एअर इंडियाने केली असल्याचे समजते.
 • या ऐतिहासिक विमान खरेदीचा करार लवकरच होण्याची शक्यता आहे, असे हवाई वाहतूक क्षेत्रातील सूत्रांनी रविवारी रॉयटर्सला सांगितले आहे. हा खरेदी करार काही हजार कोटी डॉलरचा असेल.  यात सुमारे चारशे अरुंद आकाराचे जेट आणि शंभर रुंद आकाराचे जेट खरेदी केले जातील. यात एअरबस ए-३५० आणि बोईंग ७८७ आणि ७७७ यांचा समावेश असेल.
 • येत्या काही दिवसांतच या कराराला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याबाबत एअर बस आणि बोईंग यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. टाटा समूहाकडूनही यावर तातडीने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

आरोग्य वार्ता : भारतीयांना सर्वात चांगली झोप: 

 • रात्री सर्वात चांगली झोप भारतीयांना येते. त्यानंतर सौदी अरेबिया आणि चीनचा क्रमांक आहे. ‘ग्लोबल मार्केट रिसर्च’ने या संदर्भात एक सर्वेक्षण केले आहे. यामध्ये १२ देशांतील १८ वर्षांवरील ११ हजार ६ नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. जगभरातील ६२ टक्के प्रौढांनी रात्री चांगली झोप येत नाही, असे सांगितल्याचे या सर्वेक्षणातील अहवालात नमूद केले आहे. 
 • अनिद्रेच्या सवयीबद्दल सर्वात वाईट स्थिती दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांची आहे. त्यानंतर जपानचा क्रमांक येतो. सर्वेक्षणानुसार प्रौढ व्यक्ती रात्री सरासरी सुमारे पावणेसात तास झोपतात. तर सुट्टीच्या दिवशी रात्री ते पावणेआठ तास झोपतात. दहापैकी चार जणांच्या म्हणण्यानुसार गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या झोपेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.
 • झोप आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे या सर्वेक्षणात याबाबत विचार करून त्यावर परिणाम करणारे मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार चिंता, पर्यावरण, कामाचे वेळापत्रक, आरोग्याचे प्रश्न यांचा त्यामध्ये समावेश असल्याचे नमूद केले आहे.

एलॉन मस्क १५० कोटी ट्विटर अकाउंट डिलीट करणार, तुमचंही अकाउंट होणार बंद: 

 • टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी ट्विटरची कमान हातात घेतल्यापासून मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. एकीकडे कंपनीत कर्मचाऱ्यांच्या नोकर कपातीचा प्रश्न ऐरणीवर आहे. तर दुसरीकडे मस्क एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. यावेळी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचा ट्विटर युजर्सला मोठा धक्का बसणार आहे. मस्क यांनी ट्विटरवर मोठी घोषणा केली आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर १५० कोटी अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं मस्क यांनी म्हटलं आहे.
 • याबाबत माहिती देताना त्यांनी म्हटलं, १५० कोटी ट्विटर अकाउंटला लवकरच बंद करण्यात येईल, जे अकाउंट अनेक वर्षांपासून सक्रीय नाहीत. अशा अकाउंटला प्लॅटफॉर्मवरून काढून टाकून नवीन युजरसाठी जागा बनवण्यात येईल. या १५० कोटी अकाउंटला काढून टाकण्याचं काम वेगानं सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे ट्विटर युजरची चिंता वाढली आहे. या लिस्ट मध्ये आपला अकाउंट आहे का? असा प्रश्न युजर्सला पडला आहे.
 • एलॉन मस्क यांनी ट्विटरवर स्पष्ट सांगितलं की, ज्या १५० कोटी अकाउंटला बंद करण्यात येणार आहे, त्यामध्ये दिर्घकाळापासून सक्रीय नसलेल्या अकाउंटचा समावेश करण्यात येईल. म्हणजेच, मागील काही वर्षांपासून ज्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट शेअर करण्यात आली नाही, तसंच कोणत्याही प्रकारचं सक्रीय सहभाग दिसला नाही, अशांना इनअॅक्टिव्ह करुन बंद करण्यात येईल.
 • तुमचाही अकाउंट होणार बंद – बंद करण्यात येणाऱ्या १५० कोटी ट्विटर अकाउंटमध्ये तुमच्याही अकाउंटचा समावेश आहे का? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच सतावत असेल. मात्र, जे अकाउंट सक्रीय नाहीत, अशा अकाउंटलाच बंद करण्यात येणार आहेत. तसेच जे अकाउंट अनेक वर्षांपासून लॉग इन करण्यात आले नाहीत, त्यांनाही बंद करण्यात येणार आहे.

पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जुन्या निवृत्तिवेतन योजनेचा निर्णय:

 • हिमाचल प्रदेशचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून सुखविंदर सिंह सुखू यांचा रविवारी शपथविधी उत्साहात झाला.
 • मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 • राज्यातील जनतेला निवडणूक प्रचारात दहा आश्वासने दिली आहेत.
 • पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत जुनी निवृत्तिवेतन योजना (ओपीएस) लागू करू.

एअर इंडियाच्या ताफ्यात नवी 500 विमाने:

 • टाटा समूहाने एअर इंडियाचा ताबा घेतल्यानंतर या विमान सेवा कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे.
 • त्यानुसार एअर बस आणि बोईंग या विमाननिर्मिती कंपन्यांकडून सुमारे पाचशे जेटलायनर विमाने खरेदी करण्याची तयारी एअर इंडियाने केली असल्याचे समजते.
 • या ऐतिहासिक विमान खरेदीचा करार लवकरच होण्याची शक्यता आहे.
 • यात सुमारे चारशे अरुंद आकाराचे जेट आणि शंभर रुंद आकाराचे जेट खरेदी केले जातील.
 • यात एअरबस ए-350 आणि बोईंग 787 आणि 777 यांचा समावेश असेल.

भारतीय महिला संघाची सरशी:

 • स्मृती मानधना आणि रिचा घोष यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने रविवारी दुसऱ्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळविला.
 • या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
 • नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 1 बाद 187 अशी मजल मारली होती.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१२ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.