७ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
७ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 7 December 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

७ डिसेंबर चालू घडामोडी

तब्बल ३२२१ पुस्तकांचा वापर करत साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा:

 • कडेगाव तालुक्यातील अमरापुरच्या अभिजित कदम कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एका कलाशिक्षकांने तब्बल साडेतीन हजार चौरस फुटामध्ये पुस्तकांचा वापर करीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनोखी कोलाज प्रतिमा साकारली.
 • या माध्यमातून बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करीत ग्रंथ हेच गुरु हा संदेश दिला आहे.
 • कलाशिक्षक नरेश मारुती लोहार यांनी सलग दोन दिवस ५२० विद्यार्थी व शिक्षक यांचे सहकार्य घेऊन साडेतीन हजार चौरस फुटामध्ये ही कोलाज कलाकृती साकारली. यासाठी ३२२१ पुस्तकांचा वापर करण्यात आला. याद्वारे ग्रंथ हेच गुरु हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे.

नोटाबंदीबाबत मूकदर्शक बनणार नाही!; सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला सुनावले:

 • आर्थिक धोरणांची न्यायालयीन समीक्षा करण्यास मर्यादा असल्या तरी नोटाबंदीच्या निर्णयाबाबत आम्ही हाताची घडी घालून बसणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेची कानउघाडणी केली. निर्णयाची योग्यता नव्हे, तर तो घेण्यात आल्याची प्रक्रिया तपासली जाऊ शकते, असेही न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.
 • केंद्र सरकारने २०१६ साली घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ५८ याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. न्या. एस. ए. नाझीर यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर मंगळवारी रिझव्‍‌र्ह बँकेचे वकील जयदीप गुप्ता युक्तिवाद करताना म्हणाले, ‘‘नोटाबंदीच्या निर्णयप्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. घटनाबाह्य नसलेल्या आर्थिक धोरणांची न्यायालयीन समीक्षा होऊ शकत नाही.
 • या धोरणांमधील आर्थिक मुद्दे हे तज्ज्ञांवर सोडले पाहिजेत.’’ यावर न्यायालय म्हणाले की, ‘‘निर्णयाच्या योग्यतेबाबत बोलायचे झाल्यास नागरिकांसाठी काय योग्य आहे, याचा विचार सरकारने करावा. मात्र हे करताना सर्व प्रक्रियेचे पालन झाले आहे की नाही, हे तपासले जाऊ शकते.’’

डॉ. आंबेडकरांच्या संघर्षांने लाखो लोकांना प्रेरणा – मोदी:

 • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आदरांजली वाहिली. संसदेच्या संकुलात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 • डॉ. आंबेडकरांच्या संघर्षांने लाखो लोकांना आशा व प्रेरणा मिळाल्याचे मोदींनी ‘ट्वीट’मध्ये नमूद केले. त्यांनी म्हटले, की महापरिनिर्वाणदिनानिमित्त मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतो व त्यांच्या देशासाठी केलेल्या अनुकरणीय सेवेचे स्मरण करतो. भारताला इतके व्यापक संविधान देण्याचे त्यांचे प्रयत्न कधीही विसरता येणार नाही.

‘सिटी ऑफ जॉय’चे लेखक डॉमिनिक लापिएर यांचे निधन:

 • कोलकाता शहरानजीकच्या मुर्दाड वस्त्यांतील जगण्याच्या विविधांगी विरोधाभासाची कहाणी ‘सिटी ऑफ जॉय’मधून मांडणारे लेखक, भटके पत्रकार आणि सामाजिक दातृत्वाचा मोठा ठसा उमटविणारे फ्रेंच साहित्यिक डॉमिनिक लापिएर यांचे वृद्धापकालाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे २००८ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 • ‘फ्रिडम अ‍ॅट मिडनाईट’, ‘इज पॅरिस बर्निग’, ‘फाइव्ह पास्ट मिडनाईट इन भोपाल’ ही सहलेखक म्हणून लिहिलेली त्यांची पुस्तके प्रचंड गाजली. मात्र त्यांची जगभर ओळख झाली ती कोलकाता शहराला केंद्र करून येथील गरिबी, हलाखीच्या जगण्यात आनंद शोधणाऱ्या व्यक्तींवरच्या ‘सिटी ऑफ जॉय’ कादंबरीमुळे. या कादंबरीवर आधारलेल्या याच नावाच्या चित्रपटाचेही कौतुक झाले.
 • फ्रान्समध्ये जन्मलेले लापिएर तेराव्या वर्षी वडिलांसह अमेरिकेत गेले. अठराव्या वर्षी त्यांना अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. भटकण्याचा आणि लिहिण्याचा छंद त्यांना अमेरिकी वास्तव्यात लागला. पुढे फ्रान्समध्ये परतल्यानंतर त्यांनी काही काळ लष्करी सेवा केली. लॅरी कॉलिन्स या अमेरिकी पत्रकार- लेखकासह त्यानी अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण केले.

भारताला विजय अनिवार्य:

 • पहिल्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर भारताच्या आघाडीच्या फळीवर दडपण असून बुधवारी होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यांचा खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल. तसेच पहिला सामना गमावल्यामुळे भारताला या सामन्यात विजय अनिवार्य आहे.
 • पहिल्या सामन्यात बांगलादेशने आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या गडय़ासाठी ५० हून अधिक धावांची भागीदारी रचून विजय नोंदवला होता. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला, पण बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजांना बाद करताना त्यांना अडचणी आल्या. मात्र, गोलंदाजांमुळे भारताला किमान झुंज देता आली; परंतु भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी पूर्णपणे निराशा केली. केएल राहुलचा अपवाद वगळता इतर भारतीय फलंदाज अपयशी ठरले.
 • भारताने २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्ध अखेरची द्विदेशीय मालिका खेळली होती. त्या वेळी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारताला तीन सामन्यांच्या मालिकेत १-२ अशी हार पत्करवी लागली होती. यंदाही पहिला सामना गमावल्यामुळे भारतीय संघावर दडपण आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशचे फिरकी गोलंदाज शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले. त्यांनी दुसऱ्या सामन्यातही अशीच कामगिरी केल्यास भारताला पुनरागमन करणे अवघड होईल.

टीम इंडियाला मिळाला नवीन प्रशिक्षक; राहुल द्रविडच्या निकटवर्तीयाची BCCI कडून निवड:

 • टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळावा यासाठी मागील काही दिवसांपासून अनेक स्तरावर चर्चा सुरु आहे. अखेरीस आता बीसीसीआयने याबाबत निर्णय घेत राहुल द्रविडच्याच स्वीय सहकाऱ्याची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. याबाबत बीसीसीआयने स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकपदी ऋषिकेश कानिटकर यांची निवड केल्याचे समजत आहे. यासह रमेश पोवार हे आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारतील असेही सांगण्यात आले आहे.
 • टीम इंडियाच्या सिनियर महिला संघाच्या फलंदाजीच्या प्रशिक्षक पदी ऋषिकेश कानिटकर यांची निवड झाली आहे. येत्या ९ डिसेंबर पासून टीम इंडियाचा महिला संघ हा ऑस्ट्रेलियासह टी २० मालिका खेळणार आहे. पाच सामन्याच्या मालिकेची पूर्वतयारी करताना बीसीसीआयने ऋषिकेश कानिटकर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. महिला संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारताना कानिटकर यांनी हा आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याचे म्हंटले आहे. भारताच्या महिला संघात अनेक गुणी व अष्टपैलू खेळाडू आहेत ही जबाबदारी निभावताना आपल्यालाही बरंच शिकायला मिळणार आहे असेही कानिटकर म्हणाले आहेत.
 • दरम्यान, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदी रमेश पोवार यांची नेमणूक करण्यात आल्याची सुद्धा आज बीसीसीआयने घोषणा केली. यापूर्वी व्ही व्ही एस लक्ष्मण या पदी कार्यरत होते. लक्ष्मणने यंदा राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यात प्रशिक्षक पद भूषवले होते.

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन:

 • संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सर्वपक्षीय बैठक झाली.
 • वाढती महागाई, बेरोजगारी आणि चीन-भारत सीमेवरील परिस्थितीवर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली. तर संसदेचे संकेत व नियमानुसार हे मुद्दे विचारार्थ घेण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले.
 • यावेळी बिजू जनता दलाकडून महिला आरक्षण विधेयक, तर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून (शिंदे गट) लोकसंख्या नियंत्रण विधेयक लोकसभेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश:

 • कोणीही उपाशीपोटी झोपू नये याची दक्षता घेण्याची आपली संस्कृती असल्याचे निदर्शनास आणूत देत, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सरकारला बजावले की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याखाली (एनएफएसए) पुरविले जाणारे अन्नधान्य हे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे.
 • न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्या. हिमा कोहली यांच्या पीठाने केंद्राला निर्देश दिले की, ईश्रम पोर्टलवर नोंदल्या गेलेल्या स्थलांतरित मजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या संख्येचा ताजा आराखडा न्यायालयात सादर करण्यात यावा.
 • न्यायालय म्हणाले की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याखाली केला जाणारा अन्नधान्याचा पुरवठा हा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, याची दक्षता घेणे हे केंद्राचे काम आहे.

ऋषिकेश कानिटकर फलंदाजी प्रशिक्षकपदी:

 • महिलांच्या ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला दोन महिनेच शिल्लक असताना भारताचा मुख्य प्रशिक्षक रमेश पोवारची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) बदली करण्यात आली आहे.
 • भारताचा माजी खेळाडू ऋषिकेश कानिटकरची फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.
 • कानिटकरने यापूर्वी भारताच्या 19 वर्षांखालील पुरुष आणि भारत-अ संघांचे प्रशिक्षकपद भूषवले आहे.
 • आता 9 डिसेंबरपासून मायदेशात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून तो महिला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळेल.
 • तसेच पोवार ‘एनसीए’मध्ये फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करेल.
 • यासह रमेश पोवार हे आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारतील असेही सांगण्यात आले आहे.

ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमारने केला नवा विक्रम:

 • फिफा विश्वचषकाच्या 16व्या फेरीच्या सामन्यात ब्राझीलने दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव केला.
 • या विजयासह पाच वेळचा चॅम्पियन ब्राझील संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.
 • अंतिम आठमध्ये ब्राझीलचा सामना 2018च्या विश्वचषक उपविजेत्या क्रोएशियाशी होणार आहे.
 • विश्वचषकाच्या किमान तीन आवृत्त्यांमध्ये गोल करणारा नेमार हा ब्राझीलचा तिसरा खेळाडू ठरला आहे.
 • नेमारने 2014, 2018 आणि 2022 विश्वचषकामध्ये गोल केले आहेत.
 • नेमारच्या आधी पेले आणि रोनाल्डो नाझारियो या महान फुटबॉलपटूंनी ही कामगिरी केली आहे.
 • या बाबतीत पेले नेमार आणि रोनाल्डोच्या पुढे आहेत.
 • नेमारने रोनाल्डो, अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि पेरिसिक यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
भारतीय लष्कर ध्वज दिन

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

७ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.