Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 8 December 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
८ डिसेंबर चालू घडामोडी
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल:
- जनआंदोलन आणि व्यापक निषेधानंतर चीनने बुधवारी करोना निर्बंध शिथिल केले. चीन सरकारने लागू केलेले शून्य कोविड धोरण रद्द करण्याच्या दिशेनेही सरकारने पावले उचलली आहेत. या धोरणामुळे अर्थव्यवस्था आणि जनजीवनावर विपरित परिणाम झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
- चीनमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असल्याने सरकारने ‘शून्य कोविड धोरण’ लागू केले. या धोरणामुळे टाळेबंदी आणि विविध निर्बंध लादण्यात आल्याने जनतेने संताप व्यक्त केला. चिनी सरकारच्या या धोरणामुळे बीजिंग, शांघायसह अनेक प्रमुख शहरांमधील लाखो नागरिकांना त्यांच्या सदनिका किंवा घरात बंदिस्त राहावे लागते.
- त्याशिवाय अनेकांना रोजगारासाठी घराबाहेर पडण्यासही बंदी असल्याने या दडपशाहीला जनतेने तीव्र विरोध केला.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ‘कर्णाटक बँके’तून:
- सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतनासाठी राज्य सरकारने तीन खासगी बँकांना परवानगी देण्याचा आदेश बुधवारी प्रसृत केला. त्यात ‘कर्णाटक बँक’, जम्मू -काश्मीर बँक आणि वाराणसीत मुख्यालय असलेल्या ‘उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक’ यांचा समावेश आहे. सीमावाद तापला असताना ‘कर्णाटक बँके’बाबतच्या सरकारच्या निर्णयावरून वादाचे संकेत आहेत.
- राज्य सरकारचे बँकिंग व्यवहार हाताळण्यासाठी नव्याने तीन बँकांना परवानगी देण्यात आली आहे. या तीन बँकांशी राज्य सरकारने अलिकडेच करार केले असून, यासंदर्भातील शासकीय आदेश बुधवारी प्रसृत करण्यात आला. तीनपैकी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ही मुंबई आणि राज्यात तरी फारशी परिचित नसून, राज्यात तिचे अस्तित्वही तुरळक आहे. या बँकेचे मुख्यालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये आहे.
- महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नावरून उभय राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले आहे. कर्नाटक सरकारच्या दंडेलीविरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘कर्णाटक बँके’ला राज्य सरकारचे वित्तीय व्यवहार हाताळण्यास परवानगी देण्याचा आदेश काढला.
अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन:
- ज्येष्ठ अर्थतज्ञ, डॉ. जे. एफ. पाटील यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. अशक्तपणा आल्याने त्यांना येथील खाजगी रुग्णालयात चार दिवसापूर्वी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
- शिक्षण, अर्थशास्त्र, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात डॉ. जयकुमार फासगोंडा पाटील तथा जे. एफ.पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली. ते मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख , इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष, भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे उपाध्यक्ष होते.
- त्यांची मराठी, इंग्रजी भाषेतील अर्थशास्त्राची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
कर्जे महाग!; रिझव्र्ह बँकेकडून रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ:
- रिझव्र्ह बँकेने बुधवारी अपेक्षेप्रमाणे व्याजदरात वाढ केली. रेपो दर ३५ आधार बिंदूंनी म्हणजे ०.३५ टक्क्यांनी वाढवून तो ६.२५ टक्क्यांवर नेणारी चालू वर्षांतील मे महिन्यापासून ही सलग पाचवी वाढ आहे. त्यामुळे गृह, वाहन आदी कर्ज आणखी महागणार आहे. महागाई दर निश्चित केलेल्या मर्यादेपर्यंत खाली आला नाही तर पुढेही व्याजदरवाढ केली जाईल, असे बँकेने स्पष्ट केले.
- रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारपासून तीन दिवस चाललेल्या बैठकीअंती पतधोरण समितीने (एमपीसी) रेपो दरात वाढीचा निर्णय पाच विरुद्ध एक अशा बहुमताने घेतला. रिझव्र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत मेपासून आतापर्यंत एकूण २२५ आधार बिंदूंची दरवाढ केली आहे. आधी चारवेळा केलेली दरवाढ ही ‘एमपीसी’च्या सहाही सदस्यांच्या पूर्ण सहमतीने झाली होती.
- रेपो दरातील ताज्या वाढीमुळे कर्जदारांवरील मासिक हप्तय़ांचा बोजा आणखी वाढणार आहे. विशेषत: घर, वाहन आणि शैक्षणिक कर्जाचे व्याजदर वाढणार असून, पर्यायाने सर्वसामान्यांच्या उत्पन्नातील अतिरिक्त हिस्सा त्यावर खर्च होणार आहे. एकीकडे महागाईची झळ आणखी काही काळ सोसावीच लागेल, असे संकेतही रिझव्र्ह बँकेने दिले आहेत, तर दुसरीकडे कर्जाच्या मासिक हप्तय़ात वाढीचा बोजाही सर्वसामान्यांवर येणार आहे.
“नागपूर-हैदराबादला जोडणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करा”, मुनगंटीवारांची केंद्र सरकारकडे मागणी:
- विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैदराबादशी जवळचा व्यापारी संबंध आहे. त्यामुळे नागपूर ते हैदराबाद दरम्यान ‘वंदे भारत एक्सप्रेस’ लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून ही मागणी केली.
- नागपूर हे मध्य भारतातील मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांसाठी जवळचे सगळ्यात मोठं शहर आहे. तसेच ते एक औद्योगिक शहर आहे. दुसरीकडे हैदराबाद हे दक्षिणेकडील या भागातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र आणि औद्योगिक शहर आहे.
- सध्या नागपूर आणि हैदराबादला जोडणार्या २२ रेल्वे गाड्या आहेत. पण ५७५ किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी एक वेगवान रेल्वे असणे आवश्यक आहे. नागपूर-हैदराबाद मार्गावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे सुरू झाल्यास नागपूरसोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांनाही ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा फायदा होईल, असंही मुनगंटीवार म्हणाले.
- या भागात येणारे पर्यटक, व्यापारी आणि उद्योजक यांच्या सोयीसाठी नागपूर-हैदराबाद या दोन शहरांना जोडणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रात म्हटलं आहे.
रिझव्र्ह बँकेकडून रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ:
रिझव्र्ह बँकेने बुधवारी अपेक्षेप्रमाणे व्याजदरात वाढ केली.
रेपो दर 35 आधार बिंदूंनी म्हणजे 0.35 टक्क्यांनी वाढवून तो 6.25 टक्क्यांवर नेणारी चालू वर्षांतील मे महिन्यापासून ही सलग पाचवी वाढ आहे.
त्यामुळे गृह, वाहन आदी कर्ज आणखी महागणार आहे.
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारपासून तीन दिवस चाललेल्या बैठकीअंती पतधोरण समितीने (एमपीसी) रेपो दरात वाढीचा निर्णय पाच विरुद्ध एक अशा बहुमताने घेतला.
रिझव्र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत मेपासून आतापर्यंत एकूण 225 आधार बिंदूंची दरवाढ केली आहे.
आधी चारवेळा केलेली दरवाढ ही ‘एमपीसी’च्या सहाही सदस्यांच्या पूर्ण सहमतीने झाली होती.
मीराबाईची रुपेरी कामगिरी:
- भारताची ऑलिम्पिक पदकविजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने मनगटाच्या दुखापतीवर मात करत बुधवारी जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.
- मीराबाईने एकूण 200 किलोचे वजन उचलले.
- टोक्यो ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या मीराबाईने 49 किलो वजनी गटात सहभाग नोंदवला.
- तिने स्नॅचमध्ये 87 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 113 किलो असे एकूण 200 किलो वजन उचलत रौप्यकमाई केली.
- चीनच्या जिआंग हुईहुआने 206 किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले.
- चीनच्याच होऊ झीहुआने 198 किलो कांस्यपदक जिंकले.
- जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाईचे हे दुसरे पदक ठरले.
- यापूर्वी 2017 मध्ये अॅनाहाइम, अमेरिका येथे झालेल्या स्पर्धेत मीराबाईने सुवर्णपदक पटकावले होते.
बांगलादेशची भारतावर 5 धावांनी मात:
- एकदिवसीय मालिकेत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला.
- त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील बांगलादेशने 5 धावांनी विजय मिळवत मालिका खिशात टाकली.
- या सामन्यात रोहित शर्मा् बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना दुसऱ्या षटकात झेल घेण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला.
- मात्र तरी तो फलंदाजीसाठी आला त्याने झुंजार अर्धशतक करत 28 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी ‘या’ दोन खेळाडूंना मिळाले नामांकन:
- नोव्हेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी आयसीसीने, तीन खेळाडूंना नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू (ICC Player of the Month) साठी नामांकित केले आहे.
- ज्यामध्ये दोन खेळाडू इंग्लंड संघाचे आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानचा एक खेळाडू देखील आहे.
- यामध्ये भारतीय संघाच्या एकाही खेळाडूच्या नावाचा समावेश नाही.
- या तिघांपैकी एकाला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार दिला जाणार आहे.
- या यादीत आयसीसीने इंग्लंडचा जोस बटलर, आदिल रशीद आणि पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांना स्थान दिले आहे.
अॅडम झाम्पा मेलबर्न स्टार्सचा नवा कर्णधार:
- बिग बॅश लीग 2022-23 (BBL 2022-23) या स्पर्धेला 13 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.
- आगामी हंगामासाठी मेलबर्न स्टार्सचा कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अॅडम झाम्पाची नियुक्ती करण्यात आली आहे.
- मेलबर्न स्टार्सने 7 डिसेंबर रोजी अधिकृतपणे घोषित केले की, अॅडम झाम्पा जखमी ग्लेन मॅक्सवेलच्या जागी आगामी बीबीएलच्या बाराव्या हंगामात कर्णधार म्हणून भूमिका पार पडेल.
- त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस उपकर्णधार असणार आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
८ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ७ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- ६ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- ५ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- ४ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- ३ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |